ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष: देशात रेल्वे हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल - 2019 railway crimes

देशात रेल्वेच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांसदर्भात आरपी व आरपीएफकडून गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा 2019 च्या अहवालात रेल्वे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट..

maharashtra is top on the list of railway crimes according to ncerb data
देशात रेल्वे हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल
author img

By

Published : May 16, 2021, 10:54 AM IST

मुंबई - देशातील नागरिकांसाठी दळणवळणाचे मुख्य साधन असलेल्या व लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या हद्दीत वेगवेगळे गुन्हे घडत असतात. या संदर्भात जीआरपी व आरपीएफकडून गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात येते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार महाराष्ट्र हा 2019 च्या अहवालात रेल्वे हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये अव्वल स्थानावर आला आहे. 2019 या वर्षामध्ये देशभरात जीआरपी कडून तब्बल 99, 710 गुन्हे रेल्वे नोंदविण्यात आले असून उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडले आहेत. पाहूयात हा विशेष रिपोर्ट..

जीआरपीकडून नोंदविण्यात आलेले गुन्हे -

नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या 2019 च्या अहवालामध्ये महाराष्ट्र हा देशभरात रेल्वे गुन्ह्यांत घडलेल्या घटनांमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. 2017 मध्ये महाराष्ट्रात 34,076 रेल्वे हद्दीत गुन्हे घडले असून 2018 मध्ये हेच प्रमाण वाढून 51 हजार 915 झाले आहे. तर 2019 मध्ये 45,341 गुन्हे रेल्वेच्या हद्दीत सीआरपीने नोंदवले आहेत.

देशात रेल्वे हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल..

1) उत्तर प्रदेश -

महाराष्ट्रानंतर त्या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेश मध्ये रेल्वे हद्दीत 2017 मध्ये 12893 गुन्हे घडले होते. हेच प्रमाण 2018 मध्ये घटत 10892 एवढे होते. 2019 मध्ये यात आणखी घट होत 8570 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

2) बिहार -

बिहार राज्यात रेल्वे हद्दीत 2017 मध्ये 4624 गुन्हे जीआरपीने नोंदवले होते. तर 2018 मध्ये 5393 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. 2019 मध्ये 5390 गुन्हे नोंदविण्यात आले होते.

3) गुजरात -

गुजरातमध्ये 2017 मध्ये 5900 गुन्हे , 2018 मध्ये 6,162 गुन्हे तर 2019 मध्ये 6,424 गुन्हे रेल्वे हद्दीत नोंदविण्यात आलेले आहेत.

आरपीएफ कडून नोंदविण्यात आलेले गुन्हे

2019 मध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडून देशभरात एकूण 9 लाख 49 हजार 695 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

1) महाराष्ट्र -

महाराष्ट्रात रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कडून 2019 मध्ये गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत. 2019 मध्ये महाराष्ट्रात रेल्वेतील हद्दीत रेल्वे प्रोटेक्शन फोर्स करून तब्बल 2 लाख 44 हजार 866 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हेच प्रमाण 2018 मध्ये दोन लाख 23 हजार 289 एवढे होते. तर 2017 मध्ये हेच प्रमाण 2 लाख 34 हजार 826 एवढी नोंदविण्यात आलेले आहेत.

2) बिहार -

रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून 2019 मध्ये बिहार राज्यात 29,553 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

3) गुजरात -

गुजरातमध्ये 2019 या वर्षात 72,469 गुन्हे नोंदवण्यात आले.

4) उत्तर प्रदेश -

उत्तर प्रदेश मधून 2019 या वर्षात तब्बल 1 लाख 11 हजार 431 गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.