मुंबई - राज्यात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा उच्चांक गाठला जातोय. त्यामुळे राज्य सरकारने आपला लसीकरणाचा वेग देखील वाढवला आहे. मात्र सध्या राज्याकडे लसीचा तुटवडा असून केवळ येणाऱ्या तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा राज्याकडे उपलब्ध असल्याची धक्कादायक माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच राज्याला दर आठवड्याला 40 लाख लस उपलब्ध करून द्यावी, अशी केंद्राकडे मागणी केली आहे. मात्र सध्या केंद्र सरकार ज्या गतीने लस पुरवठा राज्याला केला जातोय, ती गती समाधानकारक नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकार विरोधात नाराजीही व्यक्त केली.
राजेश टोपे पत्रकार परिषदेत बोलताना... मंगळवारी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या सोबत चर्चा करत राज्याच्या लसीकरणाची स्थिती सांगितली. तसेच सध्या राज्याला तीन दिवस पुरेल एवढाच लस उपलब्ध असल्याची माहिती दिली आहे. सध्या राज्यात दररोज तीन लाख लोकांना लसीकरण केले जाते आहे. येणाऱ्या काही दिवसातच राज्य सरकार दिवसाला सहा लाख लोकांना लसीकरण करेल, अशा प्रकारची सुविधा राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे केंद्रसरकारने आठवड्याला 40 लाख लस महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केली आहे.सध्या राज्यात दिवसाला साडेचार लाख लोकांना लसीकरण केले जाते आहे. येणाऱ्या काळात हा आकडा अजून वाढून दिवसाला सहा लाखापर्यंत लसीकरण केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र अनेक लसीकरण केंद्रावर देण्यासाठी लस उपलब्ध नसल्याची खंत राजेश टोपे यांनी बोलून दाखवली.
20 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार वाढतो आहे - सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी त्याचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव 20 ते 40 वयोगटातील लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळलेला दिसतोय. त्यामुळे या वयोगटातील लोकांना लसीकरण करता यावं. यासाठी केंद्र सरकारने या वयोगटातील लोक लसीकरण करण्याची अनुमती द्यावी. अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा - 'एनआयए'ने सचिन वाझेला कळवा रेल्वेस्टेशनवर आणून घेतली महत्त्वाची माहिती
हेही वाचा - सध्या कोरोनाचा सामना करुयात, राजकारणासाठी उभा जन्म पडलाय -संजय राऊत