ETV Bharat / state

धक्कादायक..! मानवी तस्करीत महाराष्ट्र देशात अव्वल

मागील काही वर्षांपासून भारतात मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत असून 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या अहवालानुसार 2017 ते 2019 या तीन वर्षाच्या काळात मानवी तस्करीबाबत महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे नोंद झाले आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : May 22, 2021, 4:45 PM IST

Updated : May 22, 2021, 5:17 PM IST

मुंबई- गेल्या काही वर्षांपासून भारतात मानवी तस्करीच्या गुन्ह्यांमध्ये सतत वाढ होत असून महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांमध्ये मानवी तस्करीबाबतच्या गुन्ह्यांत अव्वल स्थानावर असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या अहवालानुसार मानवी तस्करीत महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडल्याचे समोर आलेल आहे. 'ईटीव्ही भारत'चे यावरील विशेष वृत्तांत....

धक्कादायक..! मानवी तस्करीत महाराष्ट्र देशात अव्वल

'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या अहवालानुसार 2017 ते 2019 या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये अनुक्रमे 2 हजार 856, 2 हजार 278, 2 हजार 260, असे गुन्हे मानवी तस्करीच्या संदर्भात देशभरात नोंदविण्यात आले होते. मानवी तस्करीमध्ये अल्पवयीन मुले-मुली व तरूणींचा सर्वाधिक मानवी तस्करीत समावेश असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात मानवी तस्करीच्या संदर्भात सर्वाधिक गुन्हे घडलेले आहेत. 2017 मध्ये महाराष्ट्रात मानवी तस्करीच्या संदर्भात 310 गुन्हे घडले असून 2018 मध्ये याचे प्रमाण 311 होते. तर 2019 मध्ये 282 एवढे मानवी तस्करीबाबत गुन्हे घडले आहेत.

आसाम

महाराष्ट्राच्या खालोखाल आसाममध्ये मानवी तस्करीच्या सर्वाधिक घटना घडलेल्या असून 2017 मध्ये 262, 2018 मध्ये 308 गुन्हे तर 2019 मध्ये 200 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे.

आंध्र प्रदेश

आंध्र प्रदेशात 2017 मध्ये 218 , 2018 मध्ये 240 तर 2019 मध्ये 245 गुन्ह्यांची नोंद मानवी तस्करीच्या बाबतीत झालेली आहे.

बिहार

बिहारमध्ये 2017 सलात 121 गुन्हे , 2018 साली 127 गुन्हे तर 2019 आली 106 मानवी तस्करीबाबत गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.

पश्चिम बंगाल

मानवी तस्करीच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये 2017 साली 357 गुन्हे घडले असून 2018 साली 172 गुन्हे तर 2019 मध्ये 172 गुन्हे मानवी तस्करीच्या संदर्भात नोंदविण्यात आलेले आहेत.

तेलंगाणा

तेलंगाणा राज्यामध्ये 2017 मध्ये 329 गुन्हे मानवी तस्करीच्या संदर्भात नोंदविण्यात आले असून 2018 मध्ये 242 तर 2019 साली 137 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

1) महाराष्ट्रात 658 आरोपींना अटक फक्त एका आरोपीचा आरोप सिद्ध

महाराष्ट्रात 2019 मध्ये मानवी तस्करीच्या संदर्भात 658 आरोपींना अटक करण्यात आलेली असून यामधील 407 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये केवळ एका आरोपीला दोषी स्थिद्ध करण्यात यश आले असून 15 आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आलेले आहे.

2) आंध्र प्रदेश राज्यात सर्वाधिक दोष सिद्धी

आंध्र प्रदेश हे असे एकमेव एकमेव राज्य आहे ज्या ठिकाणी मानव तस्करीच्या संदर्भात 825 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 512 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर सर्वाधिक 136 आरोपींना न्यायालयात दोषी सिद्ध करण्यात यश मिळाले. 455 आरोपी हे सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटलेले आहेत.

3) मध्यप्रदेश

मध्यप्रदेशमध्ये 390 आरोपींना मानवी तस्करीच्या संदर्भात अटक करण्यात आली असून 382 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यानंतर 34 आरोपींना दोषी सिद्ध करण्यात आले आहे. 76 आरोपी हे निर्दोष सुटलेले आहेत.

4) केरळ

केरळमध्ये 240 आरोपींना अटक केल्यानंतर 147 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केल्यावर 39 आरोपींवरील आरोप सिद्ध झाला असून तब्बल 40 आरोपी हे निर्दोष सुटले आहेत.

हेही वाचा - बार्ज पी -305 चा कॅप्टन राकेश बल्लव अजूनही बेपत्ता, समुद्रात मारली होती उडी

Last Updated : May 22, 2021, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.