ETV Bharat / state

देशात सर्वाधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा महाराष्ट्रात, आतापर्यंत 7 लाखहून अधिक नमुन्यांची तपासणी - सर्वाधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा महाराष्ट्रात

राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला. त्यावेळी मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोरोना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता 103 झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण 5847 एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण 4610 एवढे आहे.

corona testing laboratory in maharashtra
सर्वाधिक कोरोना चाचणी प्रयोगशाळा महाराष्ट्रात
author img

By

Published : Jun 22, 2020, 8:05 PM IST

मुंबई - देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे, सरकारने राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोगशाळांची संख्या 103 एवढी केली आहे. त्यामध्ये 60 शासकीय तर 43 खासगी प्रयोगशाळा आहेत. 26 मे ते 20 जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत 30 ने वाढ झाली असून चाचण्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

9 मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला. त्यावेळी मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोरोना चाचण्यांच्या सुविधेत दिवसेंदिवस राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता 103 झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण 5847 एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण 4610 एवढे आहे. देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असून गेल्या तीन महिन्यात सातत्याने चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले गेले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबईतील जी.टी. हॉस्पिटल येथील प्रयोगशाळांचा शुभारंभ गेल्या आठवड्यात झाला. रविवारपर्यंत 7 लाख 73 हजार 865 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 32 हजार 75 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह आलेल्या नमुन्यांचे प्रमाणे 17 टक्के आढळून आले आहे.

26 मे रोजी राज्यात 73 प्रयोगशाळा होत्या त्यावेळी प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 3 हजार 347 एवढे होते. 29 मे रोजी 77 प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 3387 होते. 5 जून रोजी राज्यात 83 प्रयोगशाळा होत्या तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 4086 एवढे होते. 12 जून रोजी 95 प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाणे 4861 एवढे होते. 21 जून रोजी 103 प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 5847 एवढे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील प्रयोगशाळांची संख्या अनुक्रमे -

मुंबई- 27(शासकीय 12, खासगी 15), ठाणे- 7(शासकीय 2, खासगी 5), नवी मुंबई- 3(शासकीय 1, खासगी 2), पुणे- 22 (शासकीय 10, खासगी 12), नागपूर- 11(शासकीय 7, खासगी 4), कोल्हापूर- 3(शासकीय 2, खासगी 1), नाशिक- 4(शासकीय 2, खासगी 2), सातारा- 2(शासकीय 1, खासगी 1), अहमदनगर – 2 (शासकीय 1, खासगी 1), पालघर (डहाणू) – 1, रत्नागिरी -1, सिंधुदूर्ग – 1,सांगली (मिरज) - 1, सोलापूर- 2, धुळे- 1, जळगाव – 1, अकोला- 1, अमरावती- 2, यवतमाळ- 1, गडचिरोली- 1, चंद्रपूर-1, गोंदिया - 1, वर्धा- 1, औरंगाबाद- 1, नांदेड- 2, बीड- 1, लातूर- 1, परभणी- 1.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.