मुंबई : खासदार राजन विचारे यांची सुरक्षा त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना हानी पोहोचवण्यासाठी जाणूनबुजून कमी करण्यात आलेली नाही. असे राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्रात सांगितले. एखाद्या व्यक्तीला पोलीस संरक्षण अधिकाराची बाब असेल तर ती नक्कीच दिली जाऊ शकते. खासदार राजन विचारे यांच्याकडे यापूर्वी दिवसा दोन आणि रात्री दोन हवालदार सुरक्षेसाठी होते. आता त्या जागी प्रत्येकी एकेक तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जाणून जाणूनबुजून आपली सुरक्षा कमी करण्याचे खासदार विचारे यांनी म्हटले होते.
निकटवर्तीय, कार्यकर्त्यांना सुरक्षा : विद्यमान मुख्यमंत्री शिंदे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना आणि खासगी स्वीय सहाय्यकांना अधिक सुरक्षा देण्यात आली. मला हानी पोहोचवण्यासाठी त्यांची सुरक्षा कमालीची कमी करण्यात आल्याचा आरोप विचारे यांनी केला आहे. न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि पी डी नाईक यांच्या खंडपीठासमोर राज्याने असे आरोप अयोग्य आणि निराधार असल्याचे सांगितले आहेत. विचारे यांच्या याचिकेवर राज्य सरकारने उत्तरात म्हटले आहे की, एकूण सर्व घटकांची चौकशी केली जाते आणि धोक्याची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप निश्चित केल्यानंतर पोलीस संरक्षणाची व्याप्ती आणि त्यांचा कालावधी निश्चित केला जातो.
2022 पासून संरक्षण कमी : पासून 15 ऑक्टोबर 2022 पासून खासदार राजन विचारे यांचे पोलीस संरक्षण कमी करण्यात आले आहे. या निर्णयाचा सर्व स्तरांवर विचार केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला," असे प्रतिज्ञापत्र श्रीकांत परोपकरी, उप पोलिस आयुक्त (एसबी) ठाणे, शहर यांनी दाखल केले आहे. त्यात तारखांची यादी दिली आहे. 2002 मध्ये जेव्हा सुरुवातीला सशुल्क सुरक्षा प्रदान करण्यात आली होती आणि नंतर 2009 पासून आमदार आणि नंतर खासदार म्हणून निशुक्ल करण्याक आली, असे विचारे म्हणाले. राज्य सरकारने वैध कारणाशिवाय मनमानी पद्धतीने काम केले हा विचार "निराधार" आहे. कारण ठाणे पोलीस प्रमुखांनी देखील फाइलचे पुनरावलोकन केले आणि विचारात घेतले.
सत्ताधाऱ्यांकडून सुडबुद्धीचे राजकारण : सध्या ठाण्यातील ठाकरे गटातील खासदार राजन विचारे यांना सिक्युरिटी कमी केल्यामुळे धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना सिक्युरिटी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करणारी फौजदारी याचिका वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली गेली. 15 जानेवारी रोजी या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एस. गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश डी. नाईक यांच्या खंडपीठांसमोर सुनावणी झाली. या याचिकेत प्रतिवादी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे गृहसचिव आणि ठाणे जिल्ह्याचे पोलीस आयुक्त यांची प्रतिवादी म्हणून उल्लेख आहे. राजन विचारे यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना तात्काळ सिक्युरिटी देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
कोण आहेत राजन विचारे? : नंदिनी विचारे यांचे पती राजन विचारे ठाण्याचे शिवसेनेचे खासदार आहेत. जवळपास 30 वर्षांपासून ते शिवसेनेत सक्रिय आहे. ठाण्याचे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे ते समर्थक होते. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही ते जवळचे नेते मानले जातात. राजन विचारे (1992 ते 2012) या कार्यकाळात चार टर्म शिवसेनेचे नगरसेवक म्हणून निवडून आले. तसेच, (2007 ते 2008) या काळात ते ठाणे महानगरपालिकेचे महापौर होते. (2009 ते 2014)ते ठाण्यात आमदार म्हणून निवडून आले. तसेच, ते याचिका समिती सदस्य, उद्योग स्थायी समिती सदस्य अशा विविध समित्यांमध्येही कार्यरत होते. आता ते शिवसेनेचे लोकसभेचे मुख्य प्रतोद आहेत. राजन विचारे शिंदे गटात जाणार की उद्धव ठाकरे यांना आपले समर्थन कायम ठेवणार हे अद्याप स्पष्ट नाही.