मुंबई - महाराष्ट्र सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी आंतराष्ट्रीय वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली आहे. राज्यात असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवड्यामुळे आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांगलादेश, सिंगापूर आणि इजिप्त या देशाकडून यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहता महाविकास आघाडी सरकारने आता थेट विदेशातून रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंजेक्शन आयात करण्या संदर्भाची जाहिरात महाविकास आघाडी सरकारकडून आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ही देण्यात आली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर बांगलादेश, सिंगापूर आणि इजिप्त या तीन देशाने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. या तिन्ही देशांमध्ये असलेल्या भारतीय दूतावासाकडून या संबंधीची प्राथमिक बोलणी झाली आहे. तसेच टेंडर प्रक्रियादेखील सुरू झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यासाठी केंद्र सरकारकडून लागणाऱ्या परवानग्या देखील घेतल्या जाणार असल्याचा त्यांनी सांगितले. मात्र, नेमकी या देशातून राज्याला किती रेमडेसिवीर मिळणार आहे याबद्दल त्यांनी खुलासा केला नाही. या तिन्ही देशांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरू झाल्यास राज्यातील इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याने समाधान व्यक्त केले आहे.
राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा पाहायला मिळतोय. या इंजेक्शनसाठी मेडिकलच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाईकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार देखील केला जातोय. राज्यभरात इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना, केंद्र सरकार कडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात केला जात नाही. आज झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठकीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यामध्ये कशाप्रकारे तुटवडा आहे हे मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांना सांगण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लवकरच महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा वाढवला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, नुकताच केंद्र सरकारकडून राज्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासंदर्भात पत्र समोर आले आहे. या पत्रातून राज्याला दिवसाला केवळ 26 हजार इंजेक्शनचा पुरवठा केला जाईल, अशा प्रकारची आकडेवारी समोर आली. त्यामुळे या आकडेवारीनुसार राज्याला जवळपास दहा हजार रेमडेसिवीर इंजेक्शन रोज कमी पडणार असल्याची भीती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बोलून दाखवली होती.
बांगलादेश, सिंगापूर आणि इजिप्त देशाकडून राज्यसरकार करणार रेमडेसिवीर इंजेक्शन आयात - रेमडेसिवीर इंजेक्शनची आयात
राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहता महाविकास आघाडी सरकारने आता थेट विदेशातून रेमडेसिवीर इंजेक्शन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंजेक्शन आयात करण्या संदर्भाची जाहिरात महाविकास आघाडी सरकारकडून आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये ही देण्यात आली आहे. ही जाहिरात पाहिल्यानंतर बांगलादेश, सिंगापूर आणि इजिप्त या तीन देशाने महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे.