ETV Bharat / state

राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत वाढवला लॉकडाऊन; अधिसुचना जारी

महाराष्ट्रात मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. व्यवहार सुरू करताना ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्या गाईडलाईन्सचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

maharashtra government extended lockdown in state  till december end
मंत्रालय
author img

By

Published : Nov 28, 2020, 7:03 AM IST

मुंबई - राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना मिशन बिगीन अंतर्गत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्या ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहतील, अशी अधिसूचना राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी जारी केली आहे. या अधिसुचनेनुसार राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने मार्च पासून लॉकडाऊन घोषित केला. ज्या राज्यात कोरोनाचा प्रसार कमी होत आहे, त्याठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली जात आहे. त्या राज्यातील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले जात आहेत. महाराष्ट्रातही मिशन बिगीन अंतर्गत टप्प्याटप्प्याने व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. व्यवहार सुरू करताना ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. त्या गाईडलाईन्सचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.

शाळा, महाविद्यालये, रेल्वे बंद -
आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यासही परवानगी देण्यात आलेली आहे. या सर्व सवलती यापुढेही कायम राहणार आहेत. त्यासोबत कोविडबाबतचे नियम पाळण्याचे बंधन मात्र असणार आहे. या कालावधीत शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत. मुंबईतही आणखी तीन आठवडे म्हणजेच 15 डिसेंबरपर्यंत वाट बघून ट्रेन सेवा सुरू करणार असल्याची माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.