ETV Bharat / state

शिवाजी पार्कवर साजरा होणार महाराष्ट्र दिन, राज्यापालांसह मुख्यमंत्री राहणार उपस्थित - देवेंद्र फडवणीस

महाराष्ट्र दिन हा मुंबईसह राज्यात उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथे मुख्य सोहळा पार पडणार आहे.

कार्यक्रमासाठी सुरू असलेली तयारी
author img

By

Published : May 1, 2019, 2:25 AM IST

मुंबई - शिवाजी पार्कवर राज्य सरकारतर्फे आज १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त संपूर्ण मैदानावर महोत्सवाची तयारी सुरू आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. मराठी भाषिकांच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र रथ यावेळी होणाऱ्या संचालनात सहभागी होणार आहेत.

कार्यक्रमासाठी सुरू असलेली तयारी

महाराष्ट्र दिन हा मुंबईसह राज्यात उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथे मुख्य सोहळा पार पडणार आहे. फुलांनी सजवलेले शुभेच्छा देणारे फलक तयार करण्यात आले आहेत. मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. पार्कसमोर असलेले संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनही सजवण्यात आले आहे.

सकाळी आठ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी राज्य पोलीस विभागाकडून राज्यपाल विद्यासागर राव यांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
मुख्य सचिव यु पी एस मदन, मंत्रिमंडळातील सहकारी त्याचबरोबर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Intro:मुंबई ।
शिवाजी पार्क येथे राज्य सरकारतर्फे उद्या 1 मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आजे. यानिमित्त संपूर्ण मैदानावर महोत्सवाची तयारी सुरू आहे. राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. मराठी भाषिकांच्या विविध संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्र रथ यावेळी होणाऱ्या संचालनात सहभागी होणार आहेत .
Body:महाराष्ट्र दिन हा मुंबईसह राज्यात उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी पार्क येथे मुख्य सोहळा पार पडणार आहे. फुलांनी सजवलेले शुभेच्छा देणारे फलक यावेळी तयार करण्यात आले आहेत. मोठे मंडप उभारण्यात आले आहेत. पार्कसमोर असलेले संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनही सजवण्यात आले आहे.

सकाळी आठ वाजता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यावेळी राज्य पोलीस विभागाकडून राज्यपाल विद्यासागर राव यांना मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
मुख्य सचिव यु पी एस मदन , मंत्रिमंडळातील सहकारी त्याचबरोबर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत .Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.