ETV Bharat / state

Breaking News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल - शिंदे ठाकरे गट न्यूज

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Feb 24, 2023, 6:50 AM IST

Updated : Feb 24, 2023, 10:55 PM IST

22:52 February 24

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

सभासदांची 40 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार

सरसेनापती संताची घोरपडे साखर कारखान्याद्वारे सामान्य शेतकरी आणि सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल

कागल चे विवेक कुलकर्णी यांनी केली तक्रार दाखल

22:23 February 24

स्पेक्ट्रा मोटर्ससह 3 संचालकांविरुद्ध सीबीआयने केला गुन्हा दाखल

मुंबई - CBI ने Spectra Motors Ltd आणि 3 संचालकांविरुद्ध बँक ऑफ इंडियाचे नुकसान झाल्याचा आरोप करून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बनावट कागदपत्रे सादर करून कंपनीने 30 कोटी रुपयांचे कॅश क्रेडिट, 6 कोटी रुपयांचे लेटर ऑफ क्रेडिट आणि 50 लाख रुपयांची बँक गॅरंटी मिळवले असा आरोप सीबीआयने ठेवला आहे.

21:28 February 24

सांगलीच्या आष्टा येथे तिहेरी अपघात, एक ठार, दहा जण जखमी

सांगली - आष्टा येथे तीन वाहनांचा तिहेरी अपघात घडला आहे. यामध्ये एक जण ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले आहेत.बागणी रोडवरील शिंदेमळा येथे हा अपघात घडला आहे.ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न मध्ये हा अपघात घडला आहे.स्कॉर्पिओ,एर्टीगा आणि इंडिका या तीन वाहनांमध्ये हा अपघात झाला आहे,या अपघातात कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची येथील माजी सरपंच संतोष पाटील हे ठार झाले आहेत.जखमींना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

20:33 February 24

उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नाव व चिन्ह चोरले - अरविंद केजरीवाल

मुंबई - उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नाव व चिन्ह चोरले, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी शिंदेंवर केली.

19:54 February 24

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव, केंद्राची मंजूरी - फडणवीस

मुंबई - राज्यातील दोन शहरांच्या नाव बदलाला केंद्राने हिरवा कंदिल दाखवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ट्विट करुन ही माहिती दिली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये लिहितीत की, 'औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथजी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...!'

19:47 February 24

दिल्ली महापालिकेत भाजप-आप सदस्य एकमेकांशी अक्षरशः भिडले, प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली - आप आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये दिल्ली महापालिकेत आज जोरदार चकमक घडली. दोन्ही पक्षाचे नगरसेवक अक्षरशः एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांना ढकला-ढकली केली. केस ओढले. त्यातच एकजण खाली पडला. महापौर निवडीनंतर सभागृहातील कामकाजाचा आज तिसरा दिवस होता.

19:41 February 24

माहूरमध्ये लिफ्ट आणि स्काय वॉक करण्याचे माझे स्वप्न - गडकरी

नांदेड - माहूरमध्ये लिफ्ट आणि स्काय वॉक करण्याचे माझे स्वप्न आहे, असे मत केंद्रिय रस्ते निर्माण आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते विविध कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. वारंग ते महागाव रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे गडकरी म्हणाले. माहूर तुळजापूर ही शक्तीपीठे या रस्त्याने जोडली जाणार आहेत असेही ते म्हणाले.

19:30 February 24

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मुंबईत

मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत दाखल झाले आहेत. ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. विद्यमान राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने त्यांच्यामधील बातचित महत्वाची ठरणार आहे.

19:09 February 24

डझनभर तलवारी, तीक्ष्ण हत्यारांसह १० जणांच्या टोळीला अटक

धुळे - बारा तलवारी, दोन गुप्ती, एक चॉपर, एक बटनचा चाकू, दोन फाईटर, एक मारुती कंपनीची इर्टीगा असा एकूण ६ लाख २९ हजार १०० रुपयांच्या मुद्देमालसह १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय. या दहा जणांमध्ये ४ जण ट्रॅक्टर व्यावसायिक, एक पाणीपुरी व्यावसायिक तर अन्य पाच जणांमध्ये चार मजुरी करणारे, एक खासगी नोकराचा समावेश आहे.

18:40 February 24

पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा रोड शो हे इतिहासात पहिल्यांदाच पाहिले - अजित पवारांचा टोला

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात कसबा निवडणुकीसाठी रोड शो केला. त्यावर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे पाहायला मिळत आहे की, एखाद्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी रोड शो केला. राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भातही पवार म्हणाले की सध्या प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्याचबरोबर जनतेचेही लोकशाहीत न्यायालय असते. कोर्ट निर्णय देईलच. त्याचबरोबर जनता जनार्दनही निवडणुकीत त्यांचा निर्णय देईल.

18:21 February 24

शीझन खानला जामीन देऊ नये - पोलिसांचे कोर्टात उत्तर दाखल

मुंबई - तुनिशा शर्मा मृत्यू प्रकरणी आरोपी अभिनेता शीझन खान यांच्या जामिनाच्या याचिकेत वालिव पोलिसांनी आपले उत्तर दाखल केले आहे. तसेच पोलिसांनी त्यामध्ये जामिनाला विरोध केला आहे. पोलिसांच्या उत्तरानंतर कोर्टाने या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नेमणूक केली आहे. त्यानंतर सोमवारी, 27 फेब्रुवारी रोजी ऐकले जाईल.

18:17 February 24

भावानेच केली सख्या भावाची हत्या, पोलीस तपास सुरू

ठाणे - उल्हासनगर येथून एका 26 वर्षीय व्यक्तीला आपल्या मोठ्या भावाला ठार मारल्याच्या आरोपाखाली अटक केली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. उल्हासनगर पोलिस स्टेशनचे निरीक्षक चंद्रकांत गोडसे यांनी सांगितले की, आरोपीने आपल्या 28 वर्षांच्या भावाच्या डोक्यावर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

18:10 February 24

एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या शमसुद्दीन शेख या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई - पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष 11 ने एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्या शमसुद्दीन शेख या आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केले जाईल.

17:02 February 24

विदर्भ केसरी शंकर पटात धावल्या शेकडो बैलजोड्या, तब्बल 7 वर्षानंतर झाल्या स्पर्धा

यवतमाळ - येथे विदर्भ केसरी शंकर पटात शेकडो बैलजोड्या धावल्या आहेत. प्रशासनाच्या सात वर्षाच्या निर्बंधानंतर प्रशासनाकडून आता शंकर पटला परवानगी देण्यात आली. त्यामुळे बैल मालक तसेच हौशी प्रेक्षकांनी या शर्यती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

16:41 February 24

उदयनराजेंचा शायराना अंदाजाचा व्हिडिओ व्हायरल, तेरे बिना जिया जाये ना गाण्यातून जिंकली चाहत्यांची मने

सातारा - उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी मैदानावरील कार्यक्रमात खुद्द उदयनराजेंचा शायराना अंदाज पाहायला मिळाला. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर उदयनराजेंनी 'तेरे बिना जिया जाये ना' हे गाणे गात आपल्या चाहत्यांवरील प्रेम व्यक्त केले. उदयनराजेंनी गाणे गायल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

16:14 February 24

मुंबईजवळ वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, दोघांना अटक

ठाणे - पोलिसांनी मालिश पार्लरमधून देहव्यापार चालवल्याबद्दल दोन जणांना अटक केली आहे. तेथून एका महिलेची आणि अल्पवयीन मुलीची सुटका केली, असे एका अधिका सांगितले. वेश्या व्यवसायाच्या रॅकेटच्या माहितीनंतर पोलिसांनी बुधवारी मुंबईच्या बाहेरील मिरा रोडच्या नया नगर परिसरातील मालिश आणि स्पा सेंटरकडे एक बनावट ग्राहक पाठविला. त्यानंतर खात्री पटल्यावर ही कारवाई करण्यात आली.

15:14 February 24

मुख्यमंत्र्यांच्या रोड शोला कसब्यात तुफान गर्दी, भाजपला विजयाचा विश्वास

पुणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 फेब्रुवारीच्या पोटनिवडणुकीपूर्वी पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात प्रचार करत आहेत. त्यांचा आज रोड शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी कसबा पेठ मतदार संघातील हजारो नागरिकांनी त्यांना प्रतिसाद दिला. यावेळी भाजपचा उमेदवार बहुमताने निवडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

15:06 February 24

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटणार ठाकरे-शिंदे वादाचे पडसाद

मुंबई - एकमेकांचे प्रतिस्पर्धी शिवसेना गटांमध्ये सुरू असलेली राजकीय आणि कायदेशीर लढाई आता विधिमंडळातही दिसणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे 27 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना शिंदे-ठाकरे गटातील संघर्ष जोरदार दिसणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला, निवडणूक आयोगाने कौल दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे गट 56 वर्ष जुन्या पक्षावर आणि त्याचे संस्थापक बाळ ठाकरे यांच्या वारशावर हक्कापासून वंचित झाला. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटणार असे दिसते.

14:55 February 24

बुलेट ट्रेन संदर्भात गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी विक्रोळी येथील गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडचा भूखंड अधिग्रहणाच्या विरोधास नकार देणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध गोदरेज अँड बॉयसने दाखल केलेल्या अपीलवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. हे प्रकरण सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा आणि न्यायमूर्ती जेबी परडीवाला यांच्या खंडपीठासमोर आले होते. न्यायालयाने नमूद केले की, याचिकाकर्त्याला भूखंडासाठी भरपाई वाढवण्याचा दावा करण्याचे स्वातंत्र्य असताना, ज्या भूखंडाचा ताबा सरकारने आधीच घेतला होता आणि बांधकाम सुरू केले होते, तो भूखंड ताब्यात न घेण्याची त्याची याचिका विचारात घेता येणार नाही.

14:37 February 24

मुलांची समस्या सौहार्दाने सोडवा - हायकोर्टाचा नवाजुद्दीन आणि पत्नीला सल्ला

मुंबई - उच्च न्यायालयाने अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या पत्नीला त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांबाबतचे मतभेद सौहार्दाने सोडवण्याचा प्रयत्न करण्याची सूचना केली आहे. सिद्दीकी यांनी त्यांच्या 12 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा यांचा ठावठिकाणा उघड करण्यासाठी त्यांची विभक्त पत्नी झैनाबला निर्देश देण्याची मागणी करणारी हेबियस कॉर्पस याचिकेसह उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर कोर्टाने हे निर्देश दिले आहेत.

13:58 February 24

मुलाचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षांचा तुरुंगवास

ठाणे - येथील विशेष न्यायालयाने नवी मुंबईतील एका 35 वर्षीय वृद्धाला एका लहान मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोषी ठरवून 10 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. आपल्या आदेशात, विशेष न्यायाधीश ए एन सिरसीकर यांनी त्या व्यक्तीला 10,000 रुपयांचा दंडही ठोठावला.

13:24 February 24

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात तब्बल 54 गाईंचा मृत्यू

कणेरी मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात तब्बल 54 गाईंचा मृत्यू तर 30 गाय गंभीर आहेत. येथील देशी गाईंना शिळे अन्न खाऊ घातल्याने तब्बल 50 ते 54 गाईंचा मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मठावरून माहिती लपवाछपवी करण्याचा प्रकार सध्या घडत आहे

13:03 February 24

'बेल' हा मूलभूत हक्क, नवाब मलिक यांच्या वकिलांचा युक्तीवाद

मुंबई - माजी मंत्री नवाब मालिक यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सुरू झाली आहे. यावेळी बेल हा नियम जेल हा अपवाद असा युक्तीवाद मलिक यांचे वकील करत आहेत. बेल हा मूलभूत हक्क आहे, असे त्यांनी सांगितले. नवाब मलिक यांच्या बाजूने वकील देसाई यांनी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या एकल खंडपीठापुढे जोरदार युक्तिवाद करुन तार्किक मुद्दे मांडले आहेत.

13:01 February 24

गडकरी आणि कदम यांना रामानंद तीर्थ विद्यापीठाची मानद डी लिट प्रदान

नांदेड - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे मानद डी लिट पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नितिन गडकरी यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी नांदेड विद्यापीठातर्फे त्यांचा मानद डी लिट पदवी देऊन सन्मान करण्यात आला. विद्यापीठाच्या 25 व्या दीक्षांत समारंभात हा सन्मान करण्यात आला. गडकरी यांच्यासोबतच राज्याचे माजी शिक्षणमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम यांनाही डी लिट पदवी प्रदान करण्यात आली. दीक्षांत समारंभात विविध विषयांत स्नातक झालेल्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

12:49 February 24

कणेरी मठात 54 गाईंचा मृत्यू, 30 गायी गंभीर

कोल्हापूर - कणेरी मठावर सुरू असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात तब्बल 54 गाईंचा मृत्यू झाला आहे. तर 30 गायी गंभीर आहेत. शिळे अन्न खाऊ घातल्याने मृत्यू झाल्याची इथे चर्चा आहे. गंभीर गाईंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मठावर देशी गाईंची मोठी गोशाळा आहे. गोशाळेत हजारो गायी आहेत. मठ प्रशासनाकडून लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप होत आहेत.

12:27 February 24

मासिक पाळी रजा नियमासाठीची याचिका सुप्रीम कोर्टाने काढली निकालात

नवी दिल्ली - महिला विद्यार्थिनी आणि कामगार वर्गातील महिलांसाठी त्यांच्या संबंधित शैक्षणिक संस्था आणि कामाच्या ठिकाणी मासिक पाळीच्या रजेसाठी नियम तयार करावेत अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढली. त्याचवेळी याचिकाकर्त्याला याचिकेवर केंद्राकडे विचारणा करण्याची सूचना केली आहे.

12:10 February 24

वऱ्हाड घेऊन आलेली बस जळून खाक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

सोलापूर : माढा तालुक्यातील मोडलिम्ब येथे विवाहासाठी आलेल्या खासगी बसने अचानक पेट घेतल्याने विवाह मंडपातच अग्नितांडव सुरू झाले. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी झाली नाही. मात्र बस जळून गेली आहे. काल रात्री पुणे येथून नवरदेवाचे वऱ्हाड या बसमधून आले होते. वऱ्हाडी कार्यालयात उतरले आणि थोड्याच वेळात बसने अचानक पेट घेतला. शेजारी असणारी सर्व वाहने तातडीने हलविल्याने मोठी दुर्घटना टळली.

12:04 February 24

करमुसे मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

ठाणे - आ. जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. करमुसे मारहाण प्रकरणात तीन महिन्यात चौकशी करुन नियमीत न्यायालयापुढे अहवाल सादर करा, असे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सीबीआयची चौकशीची गरज नाही असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र स्थानिक तपास यंत्रणेने लवकरात लवकर तपास करावा आणि स्थानिक न्यायालयासमोर अहवाल सादर करावा असे सांगण्यात आले

11:40 February 24

संजय राऊत यांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि 211,153(A), 500,501,504 आणि 505(2) अन्वये बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

11:23 February 24

दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी कधीही नागालँडकडे पाहिले नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी कधीही नागालँडकडे पाहिले नाही. राज्यातील स्थैर्य आणि समृद्धीला कधीही महत्त्व दिले नाही. काँग्रेसने नेहमीच दिल्लीतून रिमोट कंट्रोलवर नागालँड सरकार चालवले. दिल्लीपासून दिमापूरपर्यंत काँग्रेस कौटुंबिक राजकारणात गुंतली असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

10:27 February 24

अमरावती शहराचे पहिले महापौर देवीसिंह शेखावत यांचे निधन

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती आणि अमरावती शहराचे पहिले महापौर देवीसिंह शेखावत यांचे आज सकाळी पुणे येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. पुणे येथेच आज सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. अमरावती शहरातील त्यांचे नातेवाईक तसेच त्यांच्या विद्याभारती शिक्षण संस्थेचे अनेक पदाधिकारी पुण्याला रवाना झाले आहेत.

10:16 February 24

अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नरच्या बैठकीला बंगळुरुमध्ये प्रारंभ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास हे बंगळुरू येथे पहिल्या जी २० 'अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर'च्या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

10:15 February 24

पंजाबमध्ये अजनाळा पोलीस स्टेशनबाहेर वाढविण्यात आला पोलीस बंदोबस्त

अमृतसरमधील अजनाळा पोलीस स्टेशनबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्यांच्या समर्थकांनी काल जोरदार निदर्शने करून त्यांचे निकटवर्तीय लवप्रीत तुफानच्या सुटकेची मागणी केली.

10:13 February 24

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी बिनशर्त माफी मागितली, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा ट्विटमध्ये दावा

काँग्रेस नेते पवन खेरा यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. आम्हाला आशा आहे की सार्वजनिक जागांचे पावित्र्य राखून, यापुढे कोणीही राजकीय भाषणात असभ्य भाषा वापरणार नाही, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ट्विट केले आहे.

09:09 February 24

27 फेब्रुवारीपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार

शिवसेना गटांमध्ये सुरू असलेली राजकीय आणि कायदेशीर लढाई जोरात सुरू आहे. अशात 27 फेब्रुवारीपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होणार असल्याची चिन्हे आहेत.

08:59 February 24

आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्याविरोधात बदनामाची विधाने करू नका, कोर्टाचे आदेश

बंगळुरू सिटी सिव्हिल कोर्टाने आयपीएस अधिकारी डी रूपा यांच्यासह सर्व प्रतिवादींना आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी यांच्याविरुद्ध बदनामी विधाने करण्यापासून रोखले. रोहिणी सिंधुरी यांनी बदनामीकारक विधान करण्यास मनाई आदेश देण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता

08:58 February 24

कर्नाटक सरकारने ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या

कर्नाटक सरकारने ७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. एन शशी कुमार, पोलिस उपमहानिरीक्षक (DIGP) आणि पोलिस आयुक्त, मंगळुरु शहर यांचीदेखील बदली करण्यात आली आहे.

07:59 February 24

उत्तर कोरियाने चार सामरिक क्रूझ क्षेपणास्त्रांची घेतली चाचणी

उत्तर कोरियाने आण्विक प्रतिआक्रमण करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सराव केला. या सरावादरम्यान चार सामरिक क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.

07:58 February 24

युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या ठरावावर भारताचे संयुक्त राष्ट्रसंघात अलिप्त धोरण

युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्याच्या गरजेवर संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) ठरावावर मतदान घेण्यात आले. यावेळी भारताने अलिप्त धोरण घेतले.

06:58 February 24

क्रिप्टो चलनात पैसे गुंतवून दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन फसवणूक, पश्चिम बंगालमधून आरोपीला अटक

क्रिप्टो चलनात पैसे गुंतवून दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन येथील एका महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनीची फसवणूक केल्याप्रकरणी एका २४ वर्षीय तरुणाला पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

06:57 February 24

पॅंगोलिनच्या 30 लाख रुपये किमतीच्या कातडीसह आरोपीला अटक

पोलिसांनी अंधेरी येथून 30 लाख रुपये किमतीच्या पॅंगोलिन या संरक्षित प्राण्याच्या कातडीसह 27 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट -10 च्या अधिकार्‍यांनी रायगड जिल्ह्यातील रोहा येथील रहिवासी असलेल्या आरोपीला अटक केली.

06:54 February 24

मूळ भारतीय वंशाचे अजय बंगा होणार जागतिक बँकेचे अध्यक्ष

यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने अजय बंगा यांचे अभिनंदन केले आहे. अजय बंगा हे लवकरच जागतिक बँकेचे अध्यक्ष होणार आहेत.

06:53 February 24

आशिया बहु-ध्रुवीय बनविण्याची जबाबदारी भारतावर येते- परराष्ट्रमंत्री

जग बहुध्रुवीय, वैविध्यपूर्ण आणि लोकशाही असेल तेव्हाच आशिया वैविध्यपूर्ण आणि लोकशाही असेल आणि आशिया बहु-ध्रुवीय बनविण्याची जबाबदारी विशेषतः भारतावर येते, असे मत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी व्यक्त केले. ते पुण्यात बोलत होते.

06:34 February 24

Maharashtra Breaking News: बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू

मुंबई: ठाणे जिल्ह्यात बांधकाम सुरू असताना माती खचल्याने ढिगाऱ्याखाली अडकून दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

Last Updated : Feb 24, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.