नगर मनमाड रस्त्याच्या कडेला कोल्हार शिवारात असलेल्या मंगल कार्यालयाच्या वाहनतळात लग्नासाठी आलेली महिला गप्पा मारत उभी असतांना समोरून मोटरसायकल वरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी महिलेच्या गळ्यातील ४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ओरबाडून पलायन केले.ही घटना आज रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील कोल्हार शिवारातील भगवती लॉन्स येथे घडली.
Marathi Breaking News : उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार - रवी राणा - ईटीव्ही भारत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
22:13 December 05
किंमतीचे साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने ओरबाडून पलायन
22:12 December 05
गोवंडी येथील जैव वैद्यकीय प्रकल्पाचा आरोग्यावर विपरित परिणाम याचिकेतील मुद्दे रास्त आणि गंभीर उच्च न्यायालय निरीक्षण
गोवंडीतील जैव वैद्यकीय प्रकल्पातून बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायूमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. याचिकाकर्त्यांनी याचिकेतून उपस्थित केलेले मुद्दे रास्त आणि गंभीर स्वरुपाचे असून चिंता वाढवणारे आहेत असे निरीक्षण सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठाने नोंदवले आणि बृहन्मुंबई महापालिका, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य प्रतिवाद्यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.
22:12 December 05
ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत - पालकमंत्री चंद्रकांत पाटील
ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत....पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना सूचनाBody:पुणे :- ग्रामीण भागातील विविध मार्गांवरील पीएमपीएमएलची बससेवाबससेवा पुन्हा पूर्ववत करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांना दिल्या असून, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
19:52 December 05
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार - रवी राणा
मुंबई - हनुमान चालीसा प्रकरणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मानहानीचा दावा भविष्यात दाखल करणार असल्याचे आ. रवी राणा यांनी पत्रकारांना सांगितले. रवी राणा यांच्या विरोधातील वॉरंट रद्द करण्याला कोर्टाना आज निकार दिला. त्यातनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
19:46 December 05
राज्यपाल कोश्यारी आणि दानवेंच्या निषेधार्थ उदयनराजे समर्थकांनी महामार्गावर पेटवले टायर
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी पुणे बंगळुरू महामार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखली. यामुळे अर्धा तास महामार्ग ठप्प होता.
19:30 December 05
17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा
मुंबई - शिवाजी महाराज आणि इतर श्रद्धास्थानांच्याबद्दल राज्यपाल आणि इतर सत्ताधारी नेते अपमानकारक वक्तव्य करत आहेत. हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्याविरोधात 17 डिसेंबरला महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट मोर्चा काढला जाईल असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची आज घोषणा केली. ते महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते.
18:40 December 05
अक्कलकोट तालुक्यातील 28 गावांची कर्नाटकात जाण्याची मागणी
सोलापूर - अक्कलकोट तालुक्यातील 28 गावांनी ठराव करून दिले सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. आम्हाला सुविधा द्या अन्यथा कर्नाटकात जाऊ द्या अशी मागणी त्यांनी निवेदनात केली आहे.
17:41 December 05
विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान येणार गोव्यात - सावंत
पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्याला भेट देणार आहेत. ते जागतिक आयुर्वेद काँग्रेसमध्ये एम्सच्या आयुर्वेद रुग्णालयाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युनानी मेडिसिन, गाझियाबाद आणि नॅटल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी, नरेला, दिल्लीचे आभासी उद्घाटनही करणार आहेत. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचेदेखील ते उद्घाटन करतील असे गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
17:18 December 05
नबाब मलिक यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री नबाब मलिक यांचा रुग्णालयातील मुक्काम वाढला. नवाब मलिक यांच्या किडनीवरील आजारावर कुर्ल्यातील क्रीटी केयर खासगी रुग्णालयात सुरू आहे उपचार. नवाब मलिक यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरिता जे जे रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांचे वतीने तपास करण्याकरिता परवानगी मिळविण्यास विलंब झाल्याने मलिकांचा खाजगी रुग्णालयातील मुक्काम वाढला. नवाब मलिक यांच्या मेडिकल तपासणीवर आजही निर्णय झाला नाही.
17:13 December 05
रवी राणा यांचे वॉरंट रद्द करण्यास कोर्टाचा नकार
मुंबई - कोर्टाची आमदार रवी राणा यांना फटकार. आमदार रवी राणा कोर्टात हजर. 5 हजार रुपयांचा बॉण्ड, पोलीस ठाण्यात सादर करून, वॉरंट का नाही रद्द केले असा कोर्टाचा सवाल. 14 डिसेंबरला दोघांनीही हजर व्हा, कोर्टाची ठाम भूमिका. 14 ऐवजी 17 डिसेंबरला हजर राहण्याची परवानगी द्या अशी राणा यांची कोर्टाला विनंती. रवी राणा यांचे जामीनपात्र वॉरंट रद्दवर कोर्टाने नाही दिला निकाल. सत्र न्यायालयात 14 डिसेंबरऐवजी 17 डिसेंबरला हजर राहण्याचा विनंती अर्ज सादर करा, असे कोर्टाचे फर्मन. रवी आणी नवनीत राणा 17 डिसेंबरला होणार हजर. रवी राणा यांचे वॉरंट रद्द करा या वकिलांच्या विनंतीला कोर्टाने केले अमान्य.
17:01 December 05
महाराष्ट्राच्या मंत्र्यांविरोधात कर्नाटकात आंदोलन

महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या बेळगावी दौऱ्याच्या विरोधात कन्नड समर्थक संघटनेने आंदोलन केले.
महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे ६ डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत.
15:26 December 05
खंडणी घेणाऱ्या चार पत्रकाराविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : उल्हासनगर मधील प्लास्टिक कारखानदाराची तक्रार करून कारखाना बंद करण्याची धमकी देऊन कारखानदाराकडून चाळीस हजार रुपये खंडणी घेणाऱ्या चार पत्रकाराविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पोलीस अधिक तपास करत आहेत.
15:01 December 05
भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येण्यावर शिक्का मोर्तब
मुंबई - उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक संपली आहे. तब्बल दोन तासांपासून बैठक सुरू होती. भीमशक्ती शिवशक्ती एकत्र येण्यावर चर्चा झाली. यावेळी महाविकास आघाडीतही वंचित आघआडी सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
14:28 December 05
सेनेगलच्या संसदेत महिला मंत्र्याला थापड मारल्याने तुफान हाणामारी
सेनेगलच्या संसदेत महिला मंत्र्याला थापड मारल्याने तुफान संघर्ष झाला. सभागृहातच एका खासदाराने महिला मंत्र्याला थप्पड मारली. यानंतर संतापलेल्या महिला मंत्र्याने मारणाऱ्यावर खुर्ची फेकली. हा वाद इतका वाढला की दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हाणामारी केली. तुंबळ लाथाबुक्क्यांनी धुलाई करण्यात आली. 2 डिसेंबरला घडलेल्या या घटनेने आता सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे.
14:23 December 05
खंडणी घेणाऱ्या चार पत्रकारांविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ठाणे : उल्हासनगरमधील प्लास्टिक कारखानदाराची तक्रार करून कारखाना बंद करण्याची धमकी देऊन कारखानदाराकडून चाळीस हजार रुपये खंडणी घेणाऱ्या चार पत्रकाराविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
14:09 December 05
मुंबईच्या बहुचर्चित धारावी पुनर्विकास संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
मुंबई - मुंबईच्या बहुचर्चित धारावी पुनर्विकास संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. माहिम नेचर पार्कला या पुनर्विकास प्रकल्पातून वगळण्यात यावे अशी मागणी त्यामध्ये करण्यात आली आहे. वनशक्ती सोबतच इतरांनी याचिका दाखल केली आहे. धारावीजवळ बीकेसी आणि माहिम खाडी दरम्यानचा पट्टा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असल्याचा याचिकेत दावा करण्यात आला आहे. मात्र हा भाग या पुनर्विकास प्रकल्पात समाविष्ट नाही अशी हमी कोर्टात एमएमआरडीएने दिली आहे. कोर्टाने राज्य सरकारला यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 जानेवारीला होणार आहे.
14:00 December 05
कर्नाटक दौऱ्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही - देवेंद्र फडणवीस
मुंबई - राज्यातील मंत्र्यांचा कर्नाटकचा दौरा हा महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता. त्यापासून आम्हाला कोणी रोखू शकत नाही. पण सध्या या कारणावरून वाद नको म्हणून आम्ही त्याकडे शांतपणे बघत आहोत. मुख्यमंत्री या संदर्भात निर्णय घेतील. अन्यथा देशात कुठेही कोणाला जाण्यापासून कोणी अडवू शकत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर ही प्रतिक्रिया दिली आहे.
13:48 December 05
काँग्रेसनेते राहुल गांधी यांना मोदींवरील टिप्पणी प्रकरणी तात्पुरता दिलासा
मुंबई - राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राफेल प्रकरणात कमांडर इन थिफ अशी टिप्पणी केली होती. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या कार्यवाहीला 25 जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. तक्रारदाराचा एक वकील कोर्टात हजर नसल्याने त्याने वेळ मागितला. राहुल गांधी यांच्या याचिकेवर उच्च न्यायालय 20 जानेवारीला पुन्हा सुनावणी करणार आहे.
13:42 December 05
दिव्यांगांच्या हक्कासाठी उपोषणादरम्यान 3 महिन्यांपूर्वी मुलगी दगावली आता मुलगाही गेला
सोलापूर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. दिव्यांग निधीसाठी सुरू असलेल्या उपोषणादरम्यान एका दाम्पत्याने आपल्या मुलीला तीन महिन्यांपूर्वी गमावले होते. आता याच दाम्पत्याच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. संभव रामचंद्र कुरळे (वय 10 वर्ष) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
12:55 December 05
महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येण्याची ही योग्य वेळ नाही - कर्नाटक मुख्यमंत्री
बंगळुरू - महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मंत्र्यांना पुन्हा आवाहन केले आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही त्यांना आधीच कळवले आहे की ते कर्नाटकात आले की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे कर्नाटकात येण्याची ही योग्य वेळ नाही. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे कायदेशीररित्या लढा द्यावा.
12:11 December 05
शिवशक्ती भीमशक्तीची बोलणी पुढे ढकलली, आजची ठाकरे-आंबेडकर बैठक रद्द
मुंबई - शिवशक्ती भीमशक्तीची बोलणी पुढे ढकलली आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. शिवशक्ती भीमशक्ती युतीबाबत आज बोलणी होणार होती. बोलणी अद्याप पुढे सरकली नसल्याने आजची बैठक रद्द केली आहे.
12:09 December 05
आमदार रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात हजर
मुंबई - आमदार रवी राणा मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले आहेत. राणा यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयातून जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. सत्र न्यायालयात हजर न राहिल्यास राणा दाम्पत्याविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने जारी केला होता जामिनपात्र वारंट. सदर जामिनपात्र वारंट रद्द करण्यासाठी रवी राणा कोर्टात हजर झाले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करुन शासकीय कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणानंतर खार पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला होता.
12:03 December 05
काळी टोपी गुजरातला पाठवा - पुण्यात माजी महापौर संघटनेचे राजभवन बाहेर आंदोलन
पुणे - काळी टोपी गुजरातला पाठवा अशी घोषणाबाजी करत पुण्यात माजी महापौर संघटनेच्या वतीने राजभवन बाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भाजपच्या माजी महापौरांचा देखील सहभाग होता. भाजप माजी महापौर म्हणाले तो मूर्ख माणूस आहे.
11:58 December 05
नवापूर लॉकअपमधून चार-पाच आरोपी खिडकी तोडून पळाले
नंदुरबार - नवापूर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधून चार ते पाच आरोपी खिडकी तोडून पळाल्याची माहिती आहे. सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. नवापूर पोलीस ठाण्यातील कैदेमध्ये असलेले चार-पाच आरोपी आहेत. निकर आणि बनियन घातलेल्या अवस्थेतच आरोपींनी पोबारा केला आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी नवापूर पोलीस अधिकारी व कर्मचारी रवाना झाले आहेत. दरोड्याच्या संशयात त्यांना अटक करण्यात आले होते.
11:53 December 05
नालासोपाऱ्यात चोरट्याला जमावाची अमानुष मारहाण
नालासोपारा (पालघर) - नालासोपाऱ्यात चोरट्याला नागरिकांच्या जमावाची अमानुष मारहाण. नालासोपारा वाकणपाडा परिसरातील धक्कादायक घटना. जमावाच्या मारहाणीत चोरटा रक्तबंबाळ. मोबाईल कॅमेऱ्यात मारहाणीची दृश्ये कैद.
11:34 December 05
राष्ट्रवादीच्या ऑफरवर शशी थरुर यांनी दिले उत्तर, म्हणाले...
मी तिथे जात असल्यास माझे स्वागत करणे आवश्यक आहे. मी राष्ट्रवादीत जाणार नाही. पीसी चाको यांच्याशी अशा विषयांवर चर्चा झाली नसल्याचे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सांगितले.
11:20 December 05
खासदार शशी थरूर यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर
काँग्रेसचे खासदार शशी थरूर राष्ट्रवादीत आले तर आम्ही त्यांचा मनापासून स्वीकार करू. काँग्रेस पक्षाने त्यांना नाकारले तरी शशी थरूर हे तिरुअनंतपुरमचे खासदार म्हणून कायम राहतील. काँग्रेस थरूर यांच्याकडे का दुर्लक्ष करत आहे हे मला कळत नाही, असे विधान कन्नूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे केरळ अध्यक्ष पीसी चाको यांनी केले.
10:59 December 05
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ९ वाजेपर्यंत 4.75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 4.75% पेक्षा जास्त मतदान झाले आहे. सर्वाधिक 7.05 टक्के मतदान गांधीनगरमध्ये झाले, तर महिसागरमध्ये सर्वात कमी म्हणजे 3.76 टक्के मतदान झाले.
10:05 December 05
नातवाने मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण
ओझर गावातून एक धक्कादायक घटना घडली आहे. नातवाने मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. ओझर गावातील ही घटना आहे. विवेक उर्फ चवल्या पिंपळे यांच्यासह 2 आरोपीने ही मारहाण केली. गंगापूर फाट्यावर ही पारधी समाजाची महिला राहते. तिच्या नातवाने आरोपीच्या मुलीला 1 तारखेला पळवून नेले. आरोपीला शोधण्यासाठी हा व्यक्ती गंगापूर फाट्यावर आला आणि त्याच्यासह दोन जणांनी ही मारहाण केली.
09:31 December 05
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत केले मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान केले.
09:15 December 05
आरबीआयची 3 दिवसीय पतधोरण बैठक आजपासून सुरू
आरबीआयची 3 दिवसीय पतधोरण बैठक आजपासून सुरू होत आहे. व्याजाबाबत आरबीआयकडून दरवाढीचा काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे
08:54 December 05
गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात करणार मतदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर राजभवन येथून गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राणीप येथील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान करण्यासाठी निघाले.
08:39 December 05
चोरट्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी ५ जणांना अटक
पालघरमधील नालासोपारा येथील पेल्हार परिसरात 4 दिवसांपूर्वी एका चोराला लोकांनी मारहाण करून जबर जखमी केले होते. हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. चोरट्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आल्याचे पेल्हार पोलिसांनी सांगितले.
08:01 December 05
निवडणकुीत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे पंतप्रधान मोदींचे आवाहन
गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आणि देशाच्या विविध भागात होणाऱ्या पोटनिवडणू होत आहे. यावेळी मतदान करणाऱ्या सर्वांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
07:23 December 05
१० ते १५ किमी धावून जंगलात लपलो, काँग्रेसचे दांता मतदारसंघाचे उमेदवार कांती खराडी यांनी सांगितली आपबिती
जे काही घडले ते दुर्दैवी आहे. निवडणूक असल्याने मी माझ्या भागात जात होतो. तिथे वातावरण तापलेले मला दिसले म्हणून मी पळून जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसचे दांता मतदारसंघाचे उमेदवार कांती खराडी यांनी ही आपबीती सांगितली आहे. आमची गाडी परत येत असताना काही गाड्यांनी आमचा पाठलाग केला. भाजपचे उमेदवार (दांता मतदारसंघातील) लटू पारघी आणि इतर २ जण शस्त्रे, तलवारी घेऊन आले. आम्हाला वाटले की पळून जावे, आम्ही 10-15 किमी धावलो आणि 2 तास आम्ही जंगलात होतो, असे काँग्रेसचे दांता मतदारसंघाचे उमेदवार कांती खराडी यांनी सांगितले. भाजपच्या गुंडांनी काँग्रेसच्या उमेदवारावर हल्ला केल्याचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतेच सांगितले होते.
07:22 December 05
पाच राज्यातील सहा जागांवरील पोटनिवडणुकीकरिता मतदानाला सुरुवात
उत्तर प्रदेशातील मैनपुरी लोकसभा मतदारसंघ आणि बिहार, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमधील विधानसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे.
06:39 December 05
मुंबई विमानतळ कस्टम्सने दोन प्रकरणांमध्ये जप्त केले 2.5 कोटी रुपयांचे सोने
मुंबई विमानतळ कस्टम्सने दोन प्रकरणांमध्ये एकूण 2.5 कोटी रुपयांचे एकूण 4712 ग्रॅम सोने जप्त केले. 3 आरोपींना अटक केली. पुढील तपास सुरू आहे
06:36 December 05
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू, निशान पब्लिक स्कूलमध्ये पंतप्रधान करणार मतदान
गुजरात विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे आहे. निशान पब्लिक स्कूल, राणीपचे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी मतदान करणार आहेत,
06:17 December 05
breaking news
मुंबई : पश्चिम रेल्वेवर बांद्रा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी महत्त्वाच्या देखभाल दुरुस्ती कामासंदर्भात 5 डिसेंबर रोजी महत्त्वाचा छोटा मेगाब्लॉक दुपारी घेण्यात येणार आहे. मात्र बांद्रा रेल्वे स्थानकात ऐतिहासिक वास्तूची देखभाल दुरुस्ती संदर्भात दुपारी पश्चिम रेल्वे मार्गावर डाऊन दिशेला दीड ते सायंकाळी साडेचार या काळामध्ये पाच डिसेंबर रोजी अल्पसा मेगाब्लॉक पश्चिम रेल्वेवर करण्यात येणार आहे. प्रवाशांनी या वेळापत्रकाची दखल घ्यावी असे आवाहन पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांनी केलेले आहे.