ETV Bharat / state

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०१८ वर; १२ लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण तर ७९ रुग्णांची घरी रवानगी - maharashtra covid 19 count

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० हजार ८७७ नमुन्यांपैकी १९ हजार २९० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १०१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ६९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४००८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

rajesh tope
राजेश टोपे
author img

By

Published : Apr 7, 2020, 11:23 PM IST

मुंबई - राज्यात आज (७ एप्रिल) कोरोनाग्रस्त १५० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या १०१८ झाली असून, ७९ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ८७५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २० हजार ८७७ नमुन्यांपैकी १९ हजार २९० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर १०१८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ७९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ३४ हजार ६९५ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ४००८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी २३ जण कोरोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, बुलढाणा जिल्ह्यात ६ आणि प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. तर प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशिम येथील आहेत.

राज्यात क्लस्टर कंटेनमेंट कृति योजना अंमलात आणण्यात येत आहे. सध्या राज्यात एकूण ३४९२ सर्वेक्षण पथके काम करत असून, त्यांनी १२ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. दरम्यान, आज राज्यात १२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये इतरही आजार आढळले आहेत. आज झालेल्या मृत्यूपैंकी ६ मुंबईत, ३ पुण्यात तर प्रत्येकी १ मृत्यू नागपूर, सातारा आणि मीरा भाईंदर येथे झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्तांचा तपशील -

1) आज सकाळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या एका ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नव्हता.
2) आज सकाळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या एका ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नव्हता.

3) आज सकाळी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मूत्रपिंडाचा आजार असल्याने डाएलिसिसवर असणा-या एका ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू ससून रुग्णालयात झाला. त्यांनी परदेश प्रवास केलेला नव्हता.
4) काल संध्याकाळी मधुमेह असणा-या एका ६८ वर्षीय पुरुषाचा इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे मृत्यू झाला.
5) मुंबईतील एका ७२ वर्षीय महिलेचा आज सकाळी के ई एम रुग्णालयात मृत्यू झाला.या महिलेला उच्च रक्तदाब आणि हायपोथायरॉडिझमचा त्रास होता.
6) फुप्फुसाचा क्षयरोग असणा-या एका ४८ वर्षीय महिलेचा ४ एप्रिल रोजी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात मृत्यू झाला.
7) हिरा कंपनीत काम करणाऱ्या एका ५५ वर्षीय कामगाराचा काल संध्याकाळी मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
8) मधुमेह, उच्च रक्तदाब असणा-या एका ६७ वर्षीय पुरुषाचा काल मुंबई पोर्ट हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली होती.
9) बोरिवली येथील ६६ वर्षीय पुरुषाचा काल संध्याकाळी मुंबईतील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.
10) मीरा भाईंदर येथील ६० वर्षीय पुरुषाचा बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात आज मृत्यू झाला.
11) आग्रीपाड्यातील मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणा-या ६८ वर्षीय पुरुषाचा मुंबईत मृत्यू झाला.
12) सातारा येथील जिल्हा रुग्णालयात एका ६३ वर्षीय पुरुषाचा काल सकाळी मृत्यू झाला. हा रुग्ण अमेरिकेहून आला होता.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील -

मुंबई - ६४२ ( मृत्यू ४०)
पुणे - १३० ( मृत्यू ०८)
पुणे (ग्रामीण) - ०४
पिंपरी चिंचवड मनपा - १७
सांगली - २६
ठाणे मनपा - २१ (मृत्यू ०३)
कल्याण डोंबिवली मनपा - २५ (मृत्यू ०१)
नवी मुंबई मनपा - २८ (मृत्यू ०२)
मीरा भाईंदर - ०३ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा - १० (मृत्यू ०२)
पनवेल मनपा - ०६
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण (मृत्यू १), रत्नागिरी, यवतमाळ प्रत्येकी ०३
नागपूर - १९ (मृत्यू ०१)
अहमदनगर मनपा - १८
अहमदनगर ग्रामीण - ०७
उस्मानाबाद - ०४
लातूर मनपा - ०८
औरंगाबाद मनपा - १२ (मृत्यू ०१)
बुलढाणा - ०७ (मृत्यू ०१)
सातारा - ०६ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मनपा - ०२
उल्हासनगर मनपा, नाशिक मनपा व ग्रामीण, जळगाव ग्रामीण व मनपा, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, गोंदिया, वाशीम, अमरावती प्रत्येकी १ तर (मृत्यू २ जळगाव व अमरावती)
एकूण - १०१८ त्यापैकी ७९ जणांना घरी सोडले तर ६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.