ETV Bharat / state

महाराष्ट्र कोरोना अपडेट : ५,२२९ नवीन रुग्णांचे निदान, १२७ रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १७,१०,०५० कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 4, 2020, 8:14 PM IST

मुंबई - राज्यात आज (शुक्रवारी) ५,२२९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,४२,५८७ वर पोहोचला आहे. तर याबरोबरच राज्यात आज १२७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत एकूण ४७,५९९ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ८३,८५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

८३,८५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज ६,७७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १७,१०,०५० कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.८१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १२७ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,११,३२,२३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,४२,५८७ नमुने म्हणजेच १६.५५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,४७,५०४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ५,५६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ८३,८५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा - काही आठवड्यांमध्ये उपलब्ध होणार कोरोना लस - पंतप्रधान मोदी

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.