ETV Bharat / state

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ९ हजार ८५५ ने वाढ; महापालिका क्षेत्रात आढळले सर्वाधिक रुग्ण - महाराष्ट्र कोरोना रुग्ण बरे 3 मार्च

1 जानेवारीला कोरोना रुग्णसंख्येत कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आज (3 मार्च) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज (बुधवारी) राज्यात 9 हजार 855 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तर याबरोबरच 6 हजार 559 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Mar 3, 2021, 8:50 PM IST

Updated : Mar 4, 2021, 12:33 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी राज्यात 9 हजार 855 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. वाढणारी रुग्णसंख्या पाहता राज्यावर कोरोनाचे ढग आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

राज्यात कोरोनाची स्थिती -

1 जानेवारीला कोरोना रुग्णसंख्येत कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आज (3 मार्च) रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. आज (बुधवारी) राज्यात 9 हजार 855 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 42 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. तर याबरोबरच 6 हजार 559 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 20 लाख 43 हजार 349 वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93.77 टक्क्यांवर पोहोचले आहे.

हेही वाचा - वसतिगृह प्रकरण: कोणी दोषी आढळल्यास माझ्या विभागाकडून कठोर कारवाई होईल - यशोमती ठाकूर

मात्र, असे असले तरी राज्यात कोरोना वेगाने पसरतोय की काय? असा प्रश्न निर्माण होणारी संख्या समोर आली. राज्यातील एकूण बाधितांची संख्या 21 लाख 79 हजार 185 इतकी आहे. सध्या राज्यात 3 लाख 60 हजार 500 रुग्ण होमक्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 82 हजार 343वर पोहोचली आहे.

राज्यातील या पाच ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक बाधित रुग्ण-

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामध्ये विशेषकरून महानगरामध्ये आढळणाऱ्या बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. बुधवारी राज्यात एकूण ९ हजार ८५५ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आढळून आले आहेत. मुंबई महानगरपालिका हद्दीत बुधवारी तब्बल 1 हजार 121 रुग्णांची नोंद झाली आहे. त्या खालोखाल नागपूरमध्ये 924, तर पुणे महानगर पालिका हद्दीत - 857, नाशिक मनपा क्षेत्रात 593 आणि अमरावती महापालिका क्षेत्रात 483 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर सर्वात कमी रुग्ण संख्याही वर्धा जिल्ह्यात आढळून आली आहे. बुधवारी वर्धा जिल्ह्यात एकूण १०६ रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.

कोणत्या भागात सर्वाधिक रुग्ण ?

मुंबई महानगरपालिका क्षेत्र - 1 हजार 121
ठाणे मनपा क्षेत्र - 241
नवी मुंबई मनपा क्षेत्र - 159
कल्याण डोंबवली मनपा क्षेत्र- 246
पनवेल मनपा क्षेत्र - 111
नाशिक मनपा क्षेत्र - 593
नाशिक - 147
अहमदनगर- 140
जळगाव - 235
जळगाव मनपा क्षेत्र - 198
नंदुरबार - 108
पुणे - 378
पुणे मनपा क्षेत्र - 857
पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्र - 461
सातारा - 129
औरंगाबाद मनपा क्षेत्र - 449
अकोला- 205
अकोला मनपा क्षेत्र - 234
अमरावती - 178
अमरावती मनपा क्षेत्र - 483
यवमताळ - 218
बुडढाणा - 197
नागपूर मनपा क्षेत्र- 924
नागपूर - 257
वर्धा - 106
वाशिम - 142

Last Updated : Mar 4, 2021, 12:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.