मुंबई - राज्याची चिंता वाढवणाऱ्या कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) उतरणीला लागली आहे असेच काहीसे चित्र आहे.. दिलासादायक बाब म्हणजे आज (31 जानेवारी) 15 हजार 140 नव्या कोरोनाबाधितांची नोंद (New Corona Cases on 31 January) झाली आहे. तर 39 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्ण मात्र दोन लाखांच्या घरात आहे. दुसरीकडे राज्यात आज ओमायक्रॉनचे 91 रुग्ण आढळून आले (Today Omicron New Cases) आहेत. त्यापैकी सर्वाधिक नागपूरमध्ये 18, औरंगाबाद, नवी मुंबई, रायगडमध्ये 11 रुग्ण सापडले आहेत.
राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत उतार होताना दिसून येत आहे. आज (31 जानेवारी) दिवसभरात केवळ 15 हजार 140 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर 1.85 टक्के इतका आहे. दिवसभरात 35 हजार 453 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 73 लाख 63 हजार 259 कोरोनाबाधित बरे झाले आहेत. बरे होणाऱ्या बाधितांचे प्रमाण यामुळे 95.42 टक्के इतके आहे.
- 2 लाख 7 हजार 350 कोरोना सक्रिय रुग्ण -
आतापर्यंत 7 कोटी 46 लाख 29 हजार 449 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 10. 35 टक्के इतके म्हणजेच 77 लाख 21 हजार 109 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11 लाख 74 हजार 825 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 2798 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 7 हजार 350 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- ओमायक्रॉनचे 91 रुग्ण -
राज्यात ओमायक्रॉनच्या 91 नव्या बाधितांची आज नोंद झाली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने सर्व अहवाल तपासले आहेत. नागपूरमध्ये सर्वाधिक 18, औरंगाबाद, रायगड, नवी मुंबईत 11, मुंबई आणि ठाणे मनपा मध्ये 8, सिंधुदुर्ग आणि सातारा 5, अमरावती, पिंपरी चिंचवड, पुणे मनपा प्रत्येकी 4, यवतमाळ आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. आजपर्यंत ओमायक्रॉनचे 3 हजार 221 एवढे रुग्ण आहेत. तर 1682 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आजपर्यंत 6716 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले. त्यापैकी 6626 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 90 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
- खालील विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 960
ठाणे - 82
ठाणे मनपा - 187
नवी मुंबई पालिका - 324
कल्याण डोबिवली पालिका - 66
मीरा भाईंदर - 40
वसई विरार पालिका - 41
नाशिक - 720
नाशिक पालिका - 652
अहमदनगर - 886
अहमदनगर पालिका - 534
पुणे - 693
पुणे पालिका - 2094
पिंपरी चिंचवड पालिका - 874
सातारा - 525
नागपूर मनपा - 1447