ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 43 हजार 697 नवे कोरोनाबाधित, 49 मृत्यू तर ओमायक्रॉनचे 214 बाधित

कोरोना रुग्ण (Corona Cases) संख्येत आज (19 जानेवारी) पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात 43 हजार 697 नवे रुग्ण राज्यभरात आढळून (19 January New Corona Cases) आले आहेत. तर 46 हजार 591 जण बरे होऊन घरी परतले (Discharged Cases) आहेत. राज्यात बुधवारी एकूण 49 रुग्णांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे.

author img

By

Published : Jan 19, 2022, 8:59 PM IST

Updated : Jan 19, 2022, 10:26 PM IST

corona file photo
कोरोना फाईल फोटो

मुंबई - कोरोना रुग्ण (Corona Cases) संख्येत आज (19 जानेवारी) पुन्हा वाढ झाली आहे. दिवसभरात 43 हजार 697 नवे रुग्ण राज्यभरात आढळून (19 January New Corona Cases) आले आहेत. तर 46 हजार 591 जण बरे होऊन घरी परतले (Discharged Cases) आहेत. राज्यात बुधवारी एकूण 49 रुग्णांचा मृत्यू (Corona Death) झाला आहे. तसेच राज्यात दोन लाख 64 हजार सक्रिय रुग्ण (State Corona Active Cases) आहेत. मंगळवारी ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता, मात्र आज 214 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक 158 पुण्यात असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येचा आलेख कमी जास्त होताना दिसत आहेत. मंगळवारी 39 हजार 207 इतके रुग्ण आढळून आले होते. बुधवारी 43 हजार 697 रुग्ण सापडले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.93% एवढा आहे. तर 46 हजार 591 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

  • आतापर्यंतची एकूण आकडेवारी -

राज्यात आजपर्यंत एकूण 69 लाख 15 हजार 407 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 94.04% एवढे आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 25 लाख 31 हजार 814 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 73 लाख 25 हजार 825 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 23 लाख 93 हजार 704 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3300 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 64 हजार 659 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • ओमायक्रॉनचा दिलासा -

राज्यात मंगळवारी ओमायक्रोनचा एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज 214 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये पुण्यात 158, मुंबईत 31, पुणे ग्रामीण 10, कल्याण-डोंबिवली मनपा, पिंपरी चिंचवड प्रत्येकी चार, परभणी दोन आणि नाशिक, वसई-विरार, औरंगाबाद, जळगाव आणि इतर राज्यात प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत दोन हजार 74 एवढे रुग्ण झाले आहेत.

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 96 हजार 617 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 92 हजार 876 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 568 आणि इतर देशातील 657 अशा एकूण 1225 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 5405 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 89 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

  • विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 6032
ठाणे - 562
ठाणे मनपा - 1091
नवी मुंबई पालिका - 1255
कल्याण डोबिवली पालिका - 675
मीरा भाईंदर - 384
वसई विरार पालिका - 432
नाशिक - 874
नाशिक पालिका - 1946
अहमदनगर - 800
अहमदनगर पालिका - 402
पुणे - 2608
पुणे पालिका - 6513
पिंपरी चिंचवड पालिका - 3370
सातारा - 1344
नागपूर मनपा - 2722

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण

पुणे मनपा- 724
मुंबई - 687
पिंपरी चिंचवड - 118
नागपूर - 116
सांगली - 59
मीरा भाईंदर - 52
सांगली - 59
पुणे ग्रामीण - 56
मीरा-भाईंदर - 54
ठाणे मनपा - 50
अमरावती - 25
औरंगाबाद - 20
कोल्हापूर - 19
पनवेल - 18
सातारा - 14
नवी मुंबई - 13
उस्मानाबाद, अकोला, कल्याण डोंबिवली - 11
वसई - विरार - 7
भिवंडी मनपा - 5
अहमदनगर, नाशिक - 4
नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया आणि लातूर - 3 प्रत्येकी
गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर आणि परभणी - 2 प्रत्येकी
रायगड, भंडारा, जळगाव आणि वर्धा - प्रत्येकी 1
इतर राज्य - 1

Last Updated : Jan 19, 2022, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.