मुंबई - कोरोना रुग्ण संख्येच्या वाढत्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर निर्बंध लागू केल्यानंतर रुग्ण संख्येचा आलेख देखील उतरणीला लागला आहे. आज दिवसभरात 33 हजार 470 नव्या बाधितांची नोंद झाली. ( Maharastra Covid New Patients on 10 January 2022 ) मुंबईत सर्वाधिक 13 हजार 648 रुग्ण आहेत. त्या खालोखाल ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील संख्या आहे. रविवारी राज्यात सुमारे 44 हजार रुग्ण आढळून आले होते. आज दहा हजाराने रुग्ण संख्या घटली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 29 हजार इतकी आहे. ओमायक्रोनचे रुग्ण देखील कमी झाले असून मुंबईत ( Omicron Patients in Mumbai ) आज एकही रुग्ण सापडला नाही. त्यामुळे राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांनी 40 हजारांचा टप्पा पार गाठला होता. सक्रिय रुग्णही भरमसाठ वाढले आहेत. आज दिवसभरात 33 हजार 470 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे 69 लाख 53 हजार 514 इतकी आहे. तर 29 हजार 671 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. रुग्ण बरे होण्याचा आकडा 66 लाख 02 हजार 103 इतकी आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 94.95 टक्के इतका आहे. दिवसभरात 8 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.3 टक्के इतका आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 07 लाख 18 हजार 911 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.83 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 12 लाख 46 हजार 729 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 2505 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 2 लाख 06 हजार 046 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
ओमायक्रोनचे आतापर्यंत 31 रुग्ण -
राज्यात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालानुसार आज ओमायक्रोन 31 रुग्णांची नोंद झाली. सर्वाधिक 28 रुग्ण पुणे मनपा, पुणे ग्रामीण 2 आणि पिंपरी चिंचवड मध्ये 1 नवा रुग्ण आढळून आला. आतापर्यंत 1246 रुग्ण सापडले आहेत. तर 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 59 हजार 527 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 75 हजार 449 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 449 आणि इतर देशातील 493 अशा एकूण 942 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 4039 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 89 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत ६ लाख ६३ हजार रुग्ण होम क्वारंटाईन
विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 13648
ठाणे - 702
ठाणे मनपा - 2423
नवी मुंबई पालिका - 2020
कल्याण डोबिवली पालिका - 1192
वसई विरार पालिका - 478
नाशिक - 348
नाशिक पालिका - 649
अहमदनगर - 144
अहमदनगर पालिका - 91
पुणे - 812
पुणे पालिका - 3098
पिंपरी चिंचवड पालिका - 1246
सातारा - 356
नागपूर मनपा - 863
ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण
मुंबई - 606
पुणे मनपा - 251
पिंपरी चिंचवड - 61
सांगली - 59
नागपूर - 51
ठाणे मनपा - 48
पुणे ग्रामीण - 32
कोल्हापूर - 18
पनवेल - 17
उस्मानाबाद - 11
नवी मुंबई, सातारा - 10
अमरावती - 9
कल्याण डोंबिवली - 7
बुलढाणा, वसई - विरार - 6
भिवंडी मनपा, अकोला- 5
नांदेड, औरंगाबाद, उल्हासनगर, मीरा भाईंदर आणि गोंदिया - 3 प्रत्येकी
गडचिरोली, अहमदनगर, लातूर आणि नंदुरबार - 2 प्रत्येकी
जालना आणि रायगड - प्रत्येकी 1