मुंबई - आज राज्यात 1 हजार 927 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 30 हजार 274 वर पोहचला आहे. तर, आज 30 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 51 हजार 139 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 95.37 टक्के तर मृत्यूदर 2.52 टक्के आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
हेही वाचा - पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग अॅपवरून 16 तरुणांना गंडा घालणारी तरुणी गजाआड
41 हजार 586 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात आज 4 हजार 11 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 19 लाख 36 हजार 305 वर पोहचला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 47 लाख 06 हजार 992 नमुन्यांपैकी 20 लाख 30 हजार 274 नमुने म्हणजेच 13.80 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 89 हजार 288 व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये असून 41 हजार 586 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
या दिवशी सर्वात कमी रुग्णांची नोंद
राज्यात गेल्या दहा महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या कालावधीत राज्यात 15 नोव्हेंबरला 2 हजार 544, 18 जानेवारीला 1 हजार 924 तर 25 जानेवारीला 1 हजार 842 इतके सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा - भंडारा : बावनथडी धरणाच्या कालव्याचे पाणी शेतात गेल्याने शेतीचे नुकसान