मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार. आज राज्यात 14 हजार 123 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 57 लाख 61 हजार 15 इतकी झाली आहे. असे असले तरी आज राज्यात 35 हजार 949 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 54 लाख 31 हजार, 319 इतकी झाली आहे. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात 24 तासांत 477 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - corona LIVE
22:11 June 01
महाराष्ट्र कोरोना अपडेट : दिवसभरात 14 हजार 123 नव्या रुग्णांची नोंद, ४७७ जणांचा मृत्यू
22:11 June 01
मुंबईत कोरोनाचे 831 नवे रुग्ण.. 5,868 रुग्णांना डिस्चार्ज, 23 रुग्णांचा मृत्यू
मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. रविवारी 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले होते. सोमवारी घट होऊन 676 रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा किंचित वाढ होऊन 831 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज 23 रुग्णांचा मृत्यू झाला 5868 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
22:10 June 01
यवतमाळमध्ये दिवसभरात ७३ नवे कोरोना पॉझिटिव्ह, ३०१ कोरोनामुक्त
यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून जिल्ह्यात 24 तासात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 301 असून 73 जण पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाला. यातील तीन मृत्यू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर एक मृत्यू खासगी रुग्णालयातील आहे.
17:32 June 01
सरकारकडून कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयांचे दर निश्चित
मुंबई - राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत. ग्रामीण भागातील जनतेला कोरोना उपचाराच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. रुग्णालयांचे दर शहरांच्या वर्गीकरणानुसार निश्चित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर आकारता येणार नाहीत. या अधिसूचनेची काटेकोर आणि परिणामकारक अंमलबजावणी व्हावी याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना निर्देश देण्यात यावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
17:17 June 01
मुंबई पालिकेच्या ग्लोबल टेंडरसाठी मुदत संपली, ९ पुरवठादारांची छाननी होणार
मुंबई - मुंबई महापालिकेच्या लसीच्या ग्लोबल टेंडरला १० जणांचा प्रतिसाद मिळाला. एकाने माघार घेतल्याने ९ पुरवठादार शिल्लक आहेत. १ कोटी लसीच्या पुरवठ्यासाठी पालिकेने ग्लोबल टेंडर काढले आहे. ग्लोबल टेंडरसाठी प्रस्ताव सादर करण्याची मुदत आज संपली. पुढील ३ दिवस अर्जांची छाननी केली जाणार आहे. छाननीनंतर प्रस्ताव सादर करणाऱ्या पुरवठादारांना दिली जाणार ऑर्डर, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली.
17:07 June 01
बीकेसी कोविड सेंटर पुन्हा सुरू होण्याची अजूनही प्रतीक्षा
मुंबई - 'तौक्ते' चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 15 मे पासून बीकेसी कोविड सेंटर बंद करण्यात आले होते, तर येथील 250 हुन अधिक रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. त्याचवेळी हे सेंटर 1 जूनला पुन्हा रुग्णसेवेत दाखल होईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज 1 जून उजाडली आहे, पण हे सेंटर काही अजून सुरू झाले नाही. मुंबई महानगर पालिकेकडून अजून कोणतेही निर्देश न आल्याने सेंटर सुरू झाले नसल्याचे समजते आहे. तर येत्या दोन दिवसात सेंटर सुरू होण्याची शक्यता आहे.
15:43 June 01
नाशिकमध्ये आजपासून अनलॉक सुरू.. पहिल्याच दिवशी बाजारपेठे नागरिकांची झुंबड
नाशिक - शहरात अनलाॅक होताच पहिल्याच दिवशी मंगळवारी सर्व नियम फाट्यावर ठेवत नाशिककरांनी बाजारपेठेत तौबा गर्दी केली होती. जणू नाशिक कोरोनामुक्त झाले असे चित्र शहरात सर्वच ठिकाणी पाहायला मिळाले. आज सकाळपासून लॉकडाऊन शिथील केल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून आपल्या व्यापाराला सुरुवात केली आहे.
15:41 June 01
तब्बल दीड महिन्यानंतर कोल्हापूर-पुणे मार्गावर धावली 'लालपरी'.. कोरोनामुळे सेवा होती ठप्प
कोल्हापूर - गेल्या दीड महिन्यापासून थांबलेली एसटीची चाके पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. तब्बल दीड महिन्यांनी लालपरी रस्त्यावर धावायला सज्ज झाली आहे. राज्य सरकारने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर आजपासून कोल्हापूर-पुणे बससेवा सुरू झाली आहे. सकाळपासून तीन फेऱ्या झाल्या असून प्रवास क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असून चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
10:45 June 01
पोलिसाची कोविड सेंटरमध्ये घुसून डॉक्टरसह कर्मचाऱ्याला मारहाण
पुणे - गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने डेडिकेटेड कोविड केअर सेंटरमध्ये प्रवेश करून डॉक्टरसह एका कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. बाणेर येथील कोविड केअर सेंटरमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डॉ. अजयश्री अधिकराव मस्कर (वय 25) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीस कर्मचारी सचिन सिद्धेश्वर गायकवाड (वय 40) आणि त्याचा भाऊ सागर सिद्धेश्वर गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सचिन गायकवाड हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट तीनमध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे.
10:45 June 01
मागील 24 तासांत देशात 1,27,510 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 2,55,287 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. याबरोबरच 2,795 बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.
देशातील एकूण रुग्णसंख्या - 2,81,75,044
एकूण बरे झालेल्यांची संख्या - 2,59,47,629
एकूण मृत्यू - 3,31,895
सक्रिय रुग्ण - 18,95,520
एकूण लसीकरण - 21,60,46,638
08:32 June 01
मुंबईत आजपासून सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू होणार
06:28 June 01
मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. मुंबईत रविवारी (30 मे) 1 हजार 66 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात काल (सोमवारी) घट होऊन 676 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 29 रुग्णांचा मृत्यू झाला. तर यासोबतच 5570 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
06:07 June 01
मुंबई - राज्यात सोमवारी 15 हजार 77 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 33 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 57 लाख 46 हजार 892 इतकी झाली आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 53 लाख 95 हजार 370 इतकी झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 184 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका बाजूला कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या जरी वाढत असली तरी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे.