ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 5,368 नवीन बाधितांची नोंद, 198 ओमायक्रॉन बाधित आढळले

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज (गुरुवारी) 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 हजार 193 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 22 बाधितांचा मृत्यू झाला. तर 198 नवीन ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली.

maharashtra corona update
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 30, 2021, 10:48 PM IST

Updated : Dec 30, 2021, 11:29 PM IST

मुंबई - राज्यात गुरुवारी 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. यासोबतच 198 नविन ओमायक्रॉन बाधित आढळून आले आहेत. ( Maharashtra Corona Update )

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज (गुरुवारी) 5 हजार 368 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 हजार 193 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच 22 बाधितांचा मृत्यू झाला. तर 198 नवीन ओमायक्रॉन बाधितांची नोंद करण्यात आली. याबरोबच राज्यातील एकूण ओमायक्रॉन बाधितांची संख्या 450वर गेली आहे.

हेही वाचा - Panvel New Year Restriction : "कोरोनाचे नियम डावलून पार्टी कराल तर..", पोलिसांचा इशारा

नियमांचे पालन करा - आदित्य ठाकरे

राज्यात वाढत असणारी कोरोनाची रुग्णसंख्या हे तिसऱ्या लाटेचे संकेत आहे ( Aditya Thackeray On Corona Third wave ). त्यापार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी निर्बंध लावले जात आहेत, तेथील आस्थापनांनी नियमांचे पालन करावे. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापणांना सिल करण्याचे निर्देश, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सार्वजनिक ठिकाणी, टेरेस, हाऊस पार्ट्यांना बंदी असेल ( Aditya Thackeray On New Year Celebration). कोणाला ही परवानग्या दिलेल्या नाहीत. घरी, सोसायट्यांमध्ये पार्ट्या करताना, काळजी घ्या. नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करा, असे आवाहन करत, ओमायक्रॉन बाबत गंभीरता बाळगणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी निर्बंध पाळले जाणार नाही. त्या सोसायट्या सील केल्या जातील. यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जाईल. वाढती रुग्णसंख्या पाहता, तिसऱ्या लाटेची ही सुरुवात असल्याती भीती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे.

Last Updated : Dec 30, 2021, 11:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.