नाशिक - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली असून उपचारासाठी लागणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनची मागणी देखील वाढली आहे. इंजेक्शन मिळावे ह्यासाठी नातेवाईक तासं-तास उन्हातान्हात रांगेत उभे राहत आहेत. याचाच फायदा घेत काही संधीसाधू लोक नकली रेमडिसिव्हरची विक्री करत नागरिकांची फसवणूक करत आहेत. कुठे रेमडिसिव्हरसाठी अव्वाच्या-सव्वा रुपयांची मागणी केली जात आहे, तर कुठे नकली रेमडिसिव्हर इंजेक्शन दिले जात आहे.
राज्यात वीकेंड लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस, जाणून घ्या ताज्या घडामोडी...
16:43 April 11
नाशिकमध्ये नकली रेमडिसिव्हर औषध मिळत असल्याने खळबळ
12:42 April 11
लॉकडाऊन असूनही मॉर्निंग वॉक, जॉगिंग व सायकलिंगसाठी नागरिक रस्त्यावर
पालघर - आज लॉकडाऊनचा दुसरा दिवस आहे. मात्र, असे असूनही नागरिक त्याचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. विरार पश्चिमेकडील जकातनाका येथे असलेल्या म्हाडाच्या रस्त्यावर अनेक बेजवाबदार नागरिक मॉर्निंग वॉक व जॉगिंग करण्यासाठी बाहेर पडले होते.
11:33 April 11
जिवंत महिलेला डेथ सर्टिफिकेटसह दाखवले मृत
नागपूर - एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेली महिला जिवंत असताना ती मृत झाल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने कुटुंबियांना दिल्याची घटना नागपूरमध्ये घडली. एवढेच नाही तर कोरोनाने मृत्यू झाल्याचे कारण देत मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा देण्यात आले. हा धक्कादायक प्रकार नागपूरमधील आयजीपीए हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे शनिवारी घडला. या प्रकारानंतर कुटुंबियांनी महिलेला उपचारासाठी दुसरीकडे हलवले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र, रूग्णालय प्रशासनाच्या चुकीच्या आणि अनागोंदी कारभारामुळे कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे कुटुंबियांनी हिंगणा पोलीस ठाण्यात रूग्णालया विरोधात तक्रार दिली आहे.
11:32 April 11
पुण्यात रेमडेसीवीर इंजेक्शनची रिटेल विक्री बंद; विभागीय आयुक्तांची माहिती
पुणे - रेमडेसीवीरची गरज असलेल्या रूग्णांना रूग्णालयातच इंजेक्शन उपलब्ध होईल. या इंजेक्शनची रिटेल विक्री बंद करण्यात आल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. खासगी व्यक्तीला औषध दुकानांवर यापुढे रेमडेसीवीर इंजेक्शनची खरेदी करता येणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात रेमडेसीवीरची निर्माण झालेली टंचाई ही काही प्रमाणात कृत्रीम आहे. या इंजेक्शनची मागणी आणि पुरवठ्याचे नियोजन केल्यास ही टंचाई राहणार नाही. रेमडेसीवीर इंजेक्शनच्या मागणीचे नियोजन करणे आणि पुरवठा नियंत्रित करणे, असा दोन सूत्री कार्यक्रम आखला आहे. याबाबत खासगी रूग्णालयातील डॉक्टरांशी बोलून ज्या रूग्णांना गरज असेल त्यांनाच हे इंजेक्शन लिहून द्यावे, असे आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.
10:57 April 11
मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक
औरंगाबाद - मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभरात मराठवाड्यात 7 हजार 978 नवे रtग्ण आढळले तर, 83 जणांचा मृत्यू झाला. सर्वाधिक रूग्ण औरंगाबाद जिल्ह्यात तर सर्वात कमी रूग्ण हिंगोली जिल्ह्यात आढळले. शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. दिवसभरात 1 हजार 964 नवे रूग्ण सापडले. आतापर्यंतची ही उच्चांकी संख्या आहे. शहरात दिवसभरात 25 बधितांचा मृत्यू झाला आहे.
10:55 April 11
बाजारात मिळणार नाही रेमडेसीवीर इंजेक्शन!
नाशिक - मागील दोन दिवसात जिल्ह्यासाठी आठ हजार रेमडेसीवीर इंजेक्शन मिळाले आहेत. मात्र, मागणी प्रचंड वाढली आहे. प्रत्येक कोरोना रूग्णाला इंजेक्शनची आवश्यकता नाही. यापुढे मेडिकलमधून रेमडेसीवीर इंजेक्शन मिळणार नाही. महानगरपालिका, जिल्हा रूग्णालय प्रशासनाकडे इंजेक्शनचा साठा दिला जाईल. ज्यांना इंजेक्शन हवे असेल त्यांनी शासकीय रुग्णालयांकडून ते प्राप्त करून घ्यावे जेणेकरून तुटवडा व काळाबाजार होणार नाही, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
10:54 April 11
बेड आणि रेमडेसीवीर इंजेक्शनच्या व्यवस्थापनात समन्वय ठेवा - पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
नागपूर - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसत आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. या इंजेक्शनसह रुग्णालयातील बेड आणि लसीच्या उपलब्धतेसंदर्भात सर्व शासकीय-अशासकीय यंत्रणांनी आपसात अधिक समन्वय करून प्रभावी व्यवस्थापन करावे, असे आदेश पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिले.
08:33 April 11
लॉकडाऊनसंदर्भात आज टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक
मुंबई - शनिवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर आज सायंकाळी पाच वाजता कोरोनाविषयीच्या टास्क फोर्सची महत्वाची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवली आहे. या बैठकीतच राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री उपस्थित असणार आहे.
08:06 April 11
राज्यात वीकेंड लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस
मुंबई : राज्यात कोरोनाला अटकाव घालण्याच्या दृष्टीने कठोर निर्बंध सरकारने लादले आहेत. याचाच एक भाग म्हणून वीकेंड लॉकडाऊन राज्यात लागू करण्यात आला आहे. राज्यातील पहिल्याच वीकेंड लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी वीकेंड लॉकडाऊनला राज्यातील नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. राज्यातील अनेक शहरांमधील रस्ते सामसूम झाल्याचे चित्र शनिवारी बघायला मिळाले. आज दुसऱ्या दिवशीही नागरिकांकडून वीकेंड लॉकडाऊनला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.
राज्यात रुग्णवाढ कायम
शनिवारी राज्यात 55 हजार 411 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 309 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 33 लाख 43 हजार 951 झाली आहे. आतापर्यंत 57 हजार 638 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दिलासा! शनिवारी 53 हजार कोरोनामुक्त
कोरोना रुग्णवाढीच्या चिंताजनक स्थितीत कोरोनामुक्तांची संख्याही 50 हजारांच्या वर गेल्याचा दिलासा शनिवारी मिळाला. शनिवारी राज्यातील 53 हजार 3 रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 27 लाख 48 हजार 153 जण कोरोनामुक्त कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 36 हजार 682 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.