ETV Bharat / state

Live Update: जाणून घ्या कोरोनाविषयीचे अपडेटस् एका क्लिकवर... - महाराष्ट्र कोरोना लाइव्ह अपडेट

Maharashtra Corona situation Live Update
महाराष्ट्र कोरोना परिस्थिती लाइव्ह अपडेट
author img

By

Published : May 2, 2021, 6:24 AM IST

Updated : May 2, 2021, 9:20 PM IST

21:19 May 02

नांदेड : 1 हजार 202 जणांची कोरोनावर मात, तर 518 नवे बाधित

नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 2 हजार 662 अहवालापैकी 518 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 444 तर अँटिजेन तपासणीद्वारे 74 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 81 हजार 284 एवढी झाली असून यातील 69 हजार 954 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 9 हजार 468 रुग्ण उपचार घेत असून 214 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे.

21:15 May 02

सातारा जिल्ह्यात 2 हजार 217 कोरोनाबाधित; 44 जणांचा मृत्यू

सातारा - जिल्ह्यात मागील 24 तासात 2 हजार 217 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 44 बाधितांचा मृत्यू झाला. एकट्या सातारा तालुक्यात 494 बाधितांची नोंद झाली आहे. आज (शनिवारी) संध्याकाळपर्यंत 440 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

21:10 May 02

राज्यात नव्या 56 हजार 647 कोरोनाग्रस्तांची नोंद, 669 मृत्यू

मुंबई - राज्यात आज (दि. 2 मे) नव्या 56 हजार 647 कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे असून 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 51 हजार 356 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.31 टक्क्यांवर आहे.

21:09 May 02

मुंबईत कोरोनाचे 3672 नवे रुग्ण, 79 रुग्णांचा मृत्यू

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होताना दिसत आहे. आज 3 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले असून 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5 हजार 542 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांच्या प्रमाणात डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

19:48 May 02

कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीला गटविकास अधिकाऱ्यांकडून अंत्यसंस्कार

सोलापूर (बार्शी) - सध्याच्या काळात कोरोना रुग्णाजवळ जाण्यास नातेवाईकही धजवत नाहीत. मात्र, आजही अनेक सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तीमुळे मदतीचे काम होत आहे. इतकेच नव्हे तर आता बार्शी येथील गटविकास अधिकाऱ्यांनीच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आहे.

15:35 May 02

राज्यातील कारागृहात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू ; 9 कैदी, तर 9 कारागृह कर्मचाऱ्यांचा समावेश

राज्यातील कारागृहात 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई - कोरोना संक्रमण राज्यभरात थैमान घालत आहे. दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील 46 कारागृहांमध्येसुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे दिसून येत आहे. कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने कोरोनाचा प्रादुर्भावामुळे कारागृहात आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

15:25 May 02

कोरोना लसीकरणाच्या अगोदर तरुणांनी रक्तदान करावे; महापौर किशोरी पेडणेकरांचे आवाहन

बोलताना महापौर

मुंबई - देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत 5 लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील 992 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. मात्र, लस घेतल्यानंतर पुढील सहा महिने रक्त देऊ नये, अशा तज्ज्ञांच्या सूचना आहेत. त्यामुळे पुढील काळामध्ये रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. म्हणून तरुणांनी लसीकरणाच्या एक दिवस अगोदर रक्तदान करावे, असे आवाहन खासदार अरविंद सावंत आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

09:33 May 02

कराडमधील तळबीड गावात एकाच दिवशी कोरोनाचे तीन बळी

सातारा - कराड तालुक्यातील तळबीड गावात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. या गावातील तीन महिलांचा कोरोनाने एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. त्यामुळे तळबीड, उंब्रज परिसरात खळबळ उडाली आहे. तळबीड गावात सध्या कोरोनाचे 19 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण आहेत. 

09:33 May 02

ताडदेवमधील पालिकेच्या शाळेत 100 बेडचे सुसज्ज क्वारन्टाईन सेंटर सुरू

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण पुन्हा वाढला आहे.  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ताडदेवमध्ये जीवनज्योत ड्रग्ज बँक संस्था व ताडदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे पालिकेच्या परवानगीने शाळेत क्वारन्टाईन सेंटर सुरू केले आहे. शंभर बेडचे सुसज्ज असे क्वारन्टाईन सेंटर असून या ठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.  

08:51 May 02

व्हेंटिलेटर ‘व्हेन सर्किट’ ठरणार कोविड रुग्णांना संजीवनी; बारामतीतील डॉक्टरांचे संशोधन

पुणे(बारामती) - सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. विविध ठिकाणी ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. यावर उपाय म्हणून बारामतीच्या डॉक्टरांनी एक यशस्वी संशोधन केले आहे. व्हेंटिलेटर वेळेत न मिळालेल्या कोरोना रुग्णांसाठी हे संशोधन संजीवनी ठरणार आहे. व्हेंटिलेटर ‘व्हेन सर्किट’ असे या प्रणालीचे नाव आहे. शहरातील डॉ. राहुल जाधव, डॉ. सुजित अडसुळ यांनी या प्रणालीचा वापर सुरू करत व्हेंटिलेटरला तात्पुरता पर्याय शोधला आहे.

06:15 May 02

मुंबईत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू

मुंबई - देशभरात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत 5 लसीकरण केंद्रांवर या वयोगटातील 992 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. ज्यांना कोविन अ‌ॅपवरून मेसेज आला त्यांनाच 5 लसीकरण केंद्रांवर लस देण्यात आली. पहिल्या दिवशी एकूण 6 हजार 23 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 24 लाख 54 हजार 141 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

06:06 May 02

राज्यात 63 हजार 282 नविन कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई -राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जरी वाढत असले तरी रुग्ण वाढीचे प्रमाण जैसे थेच आहे. काल(शनिवारी) राज्यात 63 हजार 282 नविन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, उपचारादरम्यान 802 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49 टक्के इतका आहे. राज्यात गेल्या 24 तासात 61 हजार 326 रुग्णांनी कोणावर मात केली आहे.

Last Updated : May 2, 2021, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.