ETV Bharat / state

आज राज्यात ३,५२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान; ५९ रुग्णांचा मृत्यू - mumbai corona news

आज राज्यात ३,५२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,३५,६३६ वर पोहचला आहे. तर ५९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

maharashtra Corona Patient Update
आज राज्यात ३,५२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान; ५९ रुग्णांचा मृत्यू
author img

By

Published : Jan 1, 2021, 8:34 PM IST

मुंबई - आज राज्यात ३,५२४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,३५,६३६ वर पोहचला आहे. तर ५९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,५८० रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५२,०८४ ऍकक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६९ टक्के -

राज्यात आज ४,२७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८,३२,८२५ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६९ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ५९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२८,२३,८३४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३५,६३६ नमुने म्हणजेच १५.०९ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,६९,३४८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५२,०८४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र, ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - कोरोना लसीच्या आयात-निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.