ETV Bharat / state

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

maharashtra-corona-live-updates on etv bharat
कोरोना
author img

By

Published : May 27, 2021, 6:19 AM IST

Updated : May 27, 2021, 10:53 PM IST

22:44 May 27

दिलासादायक..! रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर, 21 हजार 273 नवे रुग्ण

मुंबई - महाराष्ट्रात आज (दि. 27 मे) 21 हजार 273 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 425 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज 34 हजार 370 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा 52  लाख 76 हजार 203 इतका झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचा दर 93.02 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

21:29 May 27

दिलासादायक! जळगावचा कोरोना पॉझिटिव्हिटी 3.83 टक्क्यांवर

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.84 टक्क्यांवर आला आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हिटी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

21:17 May 27

बीड जिल्ह्यातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून डान्स

अंबाजोगाई (बीड) - स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील महिला डॉक्टरांचा पीपीई किट घालून केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. यात महिला डॉक्टर गाण्याच्या तालावर थिरकताना दिसत आहेत.

21:13 May 27

आर्थिक संकटात 'नमराह कोविड हॉस्पिटल' गरिबांसाठी बनलंय संजीवनी

सांगली - कोरोना रुग्णालयाच्या भरमसाठ बिलांमुळे गोरगरीब रुग्ण आज आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात सांगलीचे नमराह कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांसाठी आर्थिक"संजीवनी" देणारे ठरले आहे. अवघे अडीच हजार रुपये प्रतिदिन ऑक्सिजन बेडसाठी आकारले जातात. त्यामुळे कोरोना परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी "नमराह" हे रोल मॉडेल ठरले आहे.

19:16 May 27

'गृह अलगिकरण बंद करण्याचे वैज्ञानिक सरकारने सांगावे'

बोलताना विरोधी पक्षनेते

नागपूर - कोरोनाग्रस्तांना गृह अलगिकरण (होम आयसोलेशन) बंद करुन संस्थात्मक अलगिकरणात ठेवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होत असताना सरकारे असा निर्णय का घेतला हे समजत नाही, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात सेवांकुर कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

19:08 May 27

जिल्ह्यात सर्वप्रकारचे बेड्स मुबलक प्रमाणात उपलब्ध - जिल्हाधिकारी

माहिती देताना जिल्हाधिकारी

अहमदनगर - राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा नियंत्रणात येत आहे. मात्र, राज्यातील 18 जिल्हे रेड झोनमध्ये असून या जिल्ह्यातील रुग्णांना गृह अलगिकरणात (होम आयसोलेशन) न ठेवता संस्थात्मक अलगिकरणात (इन्स्टिट्युशनल आयसोलेशन) ठेवण्याच्या सूचना सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत. यामुळे कोविड केअर सेंटरवरील ताण वाढण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटर व खांटाच्या उपलब्धतेची विचारणा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता त्यांनी जिल्ह्यात खाटा मुबलक उपलब्ध असल्याची माहिती दिली.

16:42 May 27

...म्हणून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका कमी

रायगड - कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे वर्तविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शासनाने पावले उचलली आहे. मात्र ही लाट कधी येणार याबाबत अस्पष्टता आहे. यात मुलांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असली तरी मुलांना धोका नाही. कारण लहान मुलांमध्ये मुळातच आजाराला लढण्याची ताकद असते. तसेच लहानपणी देण्यात आलेल्या लसीमुळे त्याच्यात आजाराशी दोन हात करण्याची ताकद असते, अशी प्रतिक्रिया अलिबागचे प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. राजीव धामणकर यांनी दिली आहे.

16:39 May 27

'कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घ्या'

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घ्या

पणजी (गोवा) - महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी गोवा सरकारच्या १० वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या धोरणावर आक्षेप घेतला आहे. सरकारचा हा निर्णय धक्कादायक असून यामुळे हुशार मुलांचे नुकसान होणार असल्याचे म्हटले आहे. परीक्षा रद्द करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून परीक्षेसंदर्भात धोरण निश्चित करावे आणि १० वी आणि १२ वीच्या परीक्षा घेण्यात याव्या, अशी सूचना त्यांनी केली आहे.

14:48 May 27

रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ

रत्नागिरी- जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसात घट झालेली असताना, आता पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. बुधवारी दिवसभरात ४०१ नवे रुग्ण आढळले आहेत, तर मागील २३४ असे एकूण ६३५ नवे रुग्ण जिल्हा रुग्णालयाने बुधवारी जाहिर केले. तर दिवसभरात २१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
12:48 May 27

म्युकरमायकोसिस संदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

मुंबई - म्युकरमायकोसिस संदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी काळ्या बुरशीचा आजार हा कोरोनापेक्षा भयंकर असून प्रशासनाकडे यावरील औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध नाही, अशी माहिती याचिकाकर्त्यांनी न्यायालयात दिली आहे. यावर सुनावणी करताना न्यायालयाने या आजारावर उपयोगी औषधांबद्दल माहिती मागितली असून पुणे, सांगली, नागपूर, साताऱ्यानंतर हा आजार मुंबईतही पसरू लागल्याचं नमूद केलंय. तसेच राज्यात बुधवारपर्यंत 3 हजार 200 म्युकरमायकोसिस रूग्णांची नोंद करण्यात आली असून राज्य सरकारने या आजाराला माहामारी घोषित केलं आहे, असे महाधिवक्तांनी न्यायालयात सांगितले. 

11:54 May 27

देशात बुधवारी 2 लाख 83 हजार रुग्णांना डिस्चार्ज, तर 3 हजार 847 रुग्ण दगावले

देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 11 हजार 298 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, 2 लाख 83 हजार 135 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून 3 हजार 847 बाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 2 कोटी 73 लाख 69 हजार 93 वर पोहोचली असून आतापर्यंत 3 लाख 15 हजार 235 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, देशात सध्या 24 लाख 19 हजार 907 सक्रिय रुग्ण असून 20 कोटी 26 लाख 95 हजार 874 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  

08:27 May 27

जळगाव जिल्ह्यात 'सायटोमेगालो' व्हायरसचा पहिला बळी!

जळगाव - काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या मृत्यू ज्या सायटोमेगालो व्हायरसने झाला होता, त्या व्हायरसचा जळगाव जिल्ह्यात पहिला बळी गेला आहे. नितीन नंदलाल परदेशी (वय ३३) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील रहिवासी होता. नितीनला कोरोनानंतर सायटोमेगालो या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

07:39 May 27

नाशिक - सरकारने वैद्यकीय सेवा चांगल्या द्याव्यात मग गृहविलगीकरण बंद करावे

 नाशिक - राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचा सरासरीपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट आहे, अशा १८ जिल्ह्यातील रुग्णांचे गृहविलगिकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात नाशिक जिल्ह्याचा समावेश असून अद्याप राज्यसरकारकडून स्थानिक प्रशासनाला कुठलेच आदेश प्राप्त झाले नाही. तसेच सरकारने आदी वैद्यकीय सेवा चांगल्या द्याव्यात मग गृहविलगीकरण बंद करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

07:16 May 27

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अँटीजेन टेस्ट

 नाशिक - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवारात येणाऱ्या शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यांची मनपाच्या माध्यमातून अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात एकूण ९८ टेस्ट करण्यात आल्या. हे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

06:47 May 27

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी कोरोना मुक्तीकडे, फक्त ३ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. मागील महिन्यात दिवसाला ७० हुन अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. बुधवारी नवे ३ रुग्ण आढळून आले असून ६२ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे धारावीही कोरोनामुक्ती कडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

06:28 May 27

मुंबईत बुधवारी 34 हजार 257 लाभार्थ्यांचे लसीकरण, 493 स्तनदा मातांनाही लस

मुंबई - लसीकरण मोहिमेनुसार सोमवार ते बुधवारी 'वॉक-इन' पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. बुधवारी 34 हजार 257 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 30 लाख 49 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आज 493 स्तनदा मतांनाही लस देण्यात आली.  

06:15 May 27

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाखांवर; 1362 नवे रुग्ण

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसांत घट झाली आहे. गेले दोन दिवस एक हजार रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ झाली आहे. आज 1 हजार 362 रुग्णांची नोंद झाली आहे. आज 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

06:08 May 27

राज्यात 24 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 453 मृत्यू

मुंबई - राज्यात आज (दि. 26 मे) 24 हजार 752 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 56 लाख 50 हजार 907 इतकी झाली आहे. तरी आज (दि. 26 मे) राज्यातील 23 हजार 65 इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत 52 लाख 41 हजार 833 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत 453 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Last Updated : May 27, 2021, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.