मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवार, मंगळवारी या दोन दिवसात पाचशेच्या घरात रुग्ण आढळून आले. काल बुधवारी त्यात वाढ होऊन 830 रुग्ण आढळून आले होते. आज पून्हा रुग्णसंख्या कमी होऊन 666 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून 741 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 734 दिवसांवर पोहचला आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर... - Maharashtra Covid news
21:12 June 17
मुंबई कोरोना अपडेट - रुग्णसंख्येत चढउतार सुरू; गुरुवारी 666 नवे रुग्ण
19:36 June 17
धारावीत ६ अॅक्टिव्ह रुग्ण
मुंबई - कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात ७ ते ११ हजारावर गेली होती. धारावीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत ८ मार्चला १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. ११ एप्रिलला धारावीत ७६ नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या घटू लागली आहे त्याचप्रमाणे धारावीतील रुग्णसंख्याही घटू लागली आहे. मे महिन्यात १ मे ला २८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात घट होत आली आहे. १०, ११, १३, २२ मे ला दिवसाला ९ रुग्णांची नोंद झाली. २५ मे ला ७ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात धारावीत ० ते ३ रुग्ण आढळून आले आहेत. आज १७ जून रोजी १ रुग्णाची नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या ६८६३ वर गेली आहे. त्यापैकी ६४९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
12:01 June 17
अहमदनगरच्या अकोलेत शिंदे कुटुंबीयांवर शोककळा, आई-मुलीचा मृत्यू
आईपाठोपाठ मुलीचीही कोरोना विरूद्धची झुंज अखेर अपयशी ठरली. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. सुनिल शिंदे यांची ज्येष्ठ कन्या सुकृताचे कोरोनाने निधन झाले. सुकृताची आई सुनिताताई शिंदे यांचेही आठ दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले होते. माय-लेकींच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.
10:16 June 17
कृष्णा रुग्णालयात 5 हजार रुग्ण कोरोनामुक्त
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचे पाचवे सहस्त्रक अर्थात 5 हजाराचा टप्पा पूर्ण केला आहे. आतापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून 5 हजार 23 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसर्या लाटेत 1 हजार 753 कोरोनाबाधित रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे.
10:15 June 17
देशात नव्या 67 हजार 208 रुग्णांची नोंद
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट असून दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळत आहेत. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 24 तासांत 67 हजार 208 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,03,570 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही अजूनही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत 2,330 रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.
देशातील कोरोना रुग्णांची स्थिती...
- एकूण रुग्ण : 2,97,00,313
- कोरोनामुक्त रुग्ण : 2,84,91,670
- एकूण मृत्यू : 3,81,903
- सक्रीय रुग्ण संख्या : 8,26,740
- एकूण लसीकरण : 26,55,19,251
07:13 June 17
गेल्या 24 तासांत कोणत्या जिल्ह्यात किती रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 821
ठाणे - 116
ठाणे महापालिका- 120
कल्याण डोंबिवली महापालिका- 119
पालघर - 140
वसई विरार- 158
रायगड - 569
पनवेल- 117
नाशिक- 364
नाशिक मनपा- 151
अहमदनगर- 396
पुणे - 627
पुणे मनपा- 336
पिंपरी चिंचवड महानगरपालिका- 223
सोलापूर-346
सातारा - 915
कोल्हापूर - 854
07:11 June 17
राज्यात गेल्या 24 तासांत 237 रुग्णांचा मृत्यू
राज्यातील कोरोना प्रादुर्भाव मागच्या काही दिवसांपासून आटोक्यात येत असल्याची दिसत आहेत. दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचबरोबर कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. हे जरी चांगले संकेत असले तरी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या काही आटोक्यात येत नाही. आज 237 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात नव्या 10 हजार 107 रुग्णांची नोंद झाल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. तर 10 हजार 567 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
06:38 June 17
नाशिक जिल्ह्यात पॉझिटिव्ह संख्येत 216 रुग्णांची वाढ
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू 7132 मृत्यू झाले आहेत. तर गेल्या 48 तासांत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 142 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
- नाशिक मनपा- 133
- नाशिक ग्रामीण- 73
- मालेगाव मनपा- 04
- जिल्हा बाह्य- 06
06:36 June 17
तिसऱ्या लाटेसाठी सज्ज रहा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे, असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाही. तर दुसऱ्या लाटेतून सावरता-सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली
06:35 June 17
उपराजधानीत वर्ष 6 ते 12 वयोगटातील 20 मुलांना दिला पहिला डोस
सभांव्य तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका असल्याचे वृत्त आहे. यात उपराजधानी नागपुरात आनंदाची बातमी समोर येत आहे. यात दहा दिवसांपूर्वी झालेल्या अहवालात 12 ते 18 वयोगटातील मुलांना पहिला डोज दिल्यानंतर सकारात्मक परिणामासह कुठलेच साईड इफेक्ट दिसून आले नाही. यामुळे दुसऱ्या टप्प्यात वर्ष 6 ते 12 च्या गटातील 20 मुलांना पहिला डोज देण्यात आला. नागपुरातील मेडीट्रिना हॉस्पिटल मध्ये लहान मुलांच्या मानवी चाचणीला 6 जून पासून सुरुवात झाली. यात पहिल्या टप्पात सकारात्मक परिणाम समोर आले.
06:32 June 17
म्यूकरमायकोसिसच्या 7511 रूग्णांची नोंद
राज्यात 15 जूनपर्यंत म्यूकरमायकोसिसच्या 7511 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 4380 जणांवर उपचार सुरू आहेत आणि तसेच गेल्या आठवड्याभरात 'काळ्या बुरशी'मुळे राज्यभरात 75 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणींनी हायकोर्टात दिली.
06:05 June 17
#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर...
मुंबई - राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. महाराष्ट्रासोबत केरळ, पंजाब, तमिळनाडू राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांना कोरोना लस देण्यास येत असून लस घेण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिटायझेशन, योग्य शारीरिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे.