ETV Bharat / state

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

author img

By

Published : Jun 16, 2021, 6:11 AM IST

Updated : Jun 16, 2021, 10:13 PM IST

MahaCorona LIVE
राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स

22:13 June 16

कोविड लस घेणाऱ्यासाठी खुशखबर.. लस घेणाऱ्यांना लोकल प्रवासास परवानगी

मुंबई - कोरोना लसींचा तुटवडा असल्याने अनेक मुंबईकर ज्याठिकाणी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील, अशा केंद्रात नोंदणी करत आहेत. मात्र, लस घेण्यासाठी केंद्रापर्यंत जाण्यासाठी लोकल सेवा उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध नागरिकांना समस्यांना समोर जावे लागत आहे. याबाबत काही नागरिकांनी समाज माध्यमांवर तक्रारी केल्या होत्या. यामुळे आता मध्य रेल्वेने लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या प्रवाशांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी मुंबईकरांची जीवनवाहिनी उपनगरीय लोकल सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आणि वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांना नागरिकांसाठी लोकल प्रवासात मुभा दिली आहे.

20:08 June 16

मुंबईत रुग्णसंख्येत वाढ.. ८३० नवे रुग्ण, ११ रुग्णांचा मृत्यू

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. सोमवारी 529 तर मंगळवारी 575 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ झाली आहे. आज 830 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1300 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढत असून तो 727 दिवसांवर पोहचला आहे. 

16:15 June 16

रेमडेसिवीर वाटपावरून सोदू सूदसह अन्य सेलेब्रिटींना मुंबई उच्च न्यायालयाची चपराक

मुंबई - विनापरवाना रेमडेसिवीरचे वाटप केल्याबद्दल कोर्टाने निरीक्षणे नोंदवली. या दोन्ही प्रकरणात सेलिब्रिटींनी थेट लोकांशी संपर्क साधत औषधांचा पुरवठा केला. संकटकाळात आपण कुणी देवदूत असल्यासारखा त्यांचा वावर होता. मात्र हे करत असताना आपण ही औषधे योग्य मार्गाने मिळवतोय की नाही?, याचा त्यांना विसर पडला असे मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदसह अन्य सेलिब्रिटींना टोला लगावला आहे. उद्या कोणीही उठेल आणि सोशल मीडियावर लोकांना आवाहन करेल की, सरकार तुमची मदत करत नाही तर आम्ही आहोत, हा प्रकार योग्य नाही. कोरोनाकाळात रेमडेसिवीरच्या गैरवाटपावरून हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली. याप्रकरणात सरकारने योग्य ती कारवाई करावी अशी आमची अपेक्षा असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. सोनू सूद फाऊंडेशनच्याबाबतीत रेमडेसिवीर एकाने दुस-याला दिली आणि मग दुस-याने तिस-याला दिली, असा प्रकार झालाय.

15:01 June 16

बीकेसी, दहिसर, मुलुंड कोविड सेंटर बंदच राहणार?

मुंबई - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील बीकेसी, दहिसर आणि मुलुंड कोविड सेंटर 15 मे पासून बंद आहे. हे कोविड सेंटर सुरू होणार असे म्हणता म्हणता आता आणखी काही दिवस हे तिन्ही कोविड सेंटर बंदच राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

12:03 June 16

रायगड - अलिबागमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका इमारतीत नव्याने सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमधील पुरुष कक्षात पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील रुग्णाचे हाल झाले असून कक्षात भिंती वाटे आणि खिडकीतून पाणी झिरपत आहे. त्यामुळे काही रुग्णांना दुसरीकडे हलविण्यात आले आहे.

परिचारिका इमारत ही नुकतीच नव्याने बांधण्यात आली असून पहिल्या पावसातच ही इमारत गळू लागली आहे. त्यामुळे ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचे काम निकृष्ट झाले असल्याचे दिसत आहे. याठिकाणी महिला आणि पुरुष यांच्यासाठी एकच स्वच्छतागृह असल्याने दोघांनाही अडचणी येत आहेत.

10:35 June 16

देशातील कोरोनाची सद्यस्थिती -

एकूण रुग्णसंख्या - 2,96,33,105 

एकूण बरे झालेले रुग्ण - 2,83,88,100 

एकूण मृत्यू - 3,79,573

एकूण सक्रिय रुग्ण - 8,65,432 

एकूण लसीकरण - 26,19,72,014 (28,00,458 - मागील 24 तासांत)

10:33 June 16

मागील 24 तासांत देशात 62, 224 नविन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 1,07,628 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 2542 बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. 

06:04 June 16

मुंबईतील हिरानंदानी इस्टेट सोसायटी लसीकरण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, सुरुवातीच्या तपासादरम्यान, लसीकरणाच्या लाभार्थ्यांना त्यांच्या प्रमाणपत्रात तारीख वेगळी आणि ठिकाण वेगळे देण्यात आले आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सुत्रांनी दिली.

06:03 June 16

राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

  • राज्यात नव्या 9 हजार 350 रुग्णांची नोंद
  • राज्यात एकूण 59 लाख 24 हजार, 773 इतक्या रुग्णांची नोंद
  • 24 तासांत 15 हजार 176 रुग्ण कोरोनामुक्त
  • आतापर्यंत 56 लाख 69 हजार 179 रुग्ण कोरोनामुक्त
  • 24 तासांत 388 रुग्णांचा मृत्यू
  • राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1लाख 38 हजार 361

05:57 June 16

मंगळवारी राज्यात नव्या 9 हजार 350 रुग्णांची नोंद

मुंबई - राज्यात मंगळवारी (दि. 15 जून) नव्या 9 हजार 350 रुग्णांची नोंद झाली असून 388 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सोमवारच्या तुलनेत रुग्णांची संख्या मंगळवारी 1 हजार 200ने वाढली आहे. राज्यात एकूण 59 लाख 24 हजार 773 इतक्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Last Updated : Jun 16, 2021, 10:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.