ETV Bharat / state

Maharashtra Corona Case :  राज्यात २४ तासांत २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू,  १८ हजार ४६६ नवीन रुग्णांची नोंद - महाराष्ट्र ओमायक्रॉन अपडेट

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागात निर्बंध कठोर लावले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (दि. 4 जानेवारी) दिवसभरात राज्यात 12 हजार 160 नवीन बाधितांचे निदान ( Maharashtra Corona Cases ) झाले. तर 20 रुग्णांचा आज मृत्यू झाला. दुसरीकडे ( Maharashtra Omicron Cases ) ओमायक्रॉनचे 75 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ओमायक्रॉनचा एकही मृत्यू झाला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Jan 4, 2022, 8:15 PM IST

Updated : Jan 5, 2022, 9:08 AM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही भागात निर्बंध कठोर लावले आहेत. तरीही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज (दि. 4 जानेवारी) दिवसभरात राज्यात 12 हजार 160 नवीन बाधितांचे निदान ( Maharashtra Corona Cases ) झाले. तर 20 रुग्णांचा आज मृत्यू झाला. दुसरीकडे ( Maharashtra Omicron Cases ) ओमायक्रॉनचे 75 नव्या रुग्णांची भर पडली आहे. ओमायक्रॉनचा एकही मृत्यू झाला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

66 हजार 308 सक्रिय रुग्ण

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांत देखील झपाट्याने वाढ झाली आह. सोमवारी दिवसभरात 12 हजार 160 रुग्णांचे निदान झाले होते. आज हा आकडा 18 हजार 466 वर पोहोचला आहे. राज्यातील रुग्णसंख्या यामुळे 67 लाख 30 हजार 494 इतकी आहे. तर 4 हजार 558 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा आकडा 65 लाख 18 हजार 916 इतका आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 96.86 टक्के इतका आहे. दिवसभरात 20 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 2.1 टक्क्यांपर्यंत आला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 95 लाख 09 हजार 260 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 09.68 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 98 हजार 391 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 1 हजार 110 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 66 हजार 308 सक्रिय रुग्ण ( Active Patients in Maharashtra ) आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रॉनचे आतापर्यंत 656 रुग्ण

राष्ट्रीय विज्ञान संस्था आणि एनसीसीएस केलेल्या अहवालानुसार राज्यात ओमायक्रॉनचे 75 नव्या रुग्णांचे निदान झाले. त्यापैकी सर्वाधिक 40 रुग्ण मुंबईत, 9 ठाण्यात, 8 पुण्यात, 5 पनवेल, नागपूर आणि कोल्हापूर 3, पिंपरी चिंचवड 2, भिवंडी, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबईत अनुक्रमे 1 रुग्ण सापडला आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या यामुळे 656 झाली आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

आजपर्यंत 2 हजार 397 प्रवाशांची जनुकीय चाचणीसाठी नमुने

1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 29 हजार 429 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 55 हजार 332 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 313 आणि इतर देशातील 250 अशा एकूण 563 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 2 हजार 397 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. त्यापैकी 91 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 10 हजार 610

ठाणे - 286

ठाणे महापालिका - 1 हजार 394

नवी मुंबई पालिका - 1 हजार 116

कल्याण डोबिवली पालिका - 457

वसई विरार पालिका - 450

नाशिक - 51

नाशिक पालिका - 157

अहमदनगर - 36

अहमदनगर पालिका - 13

पुणे - 198

पुणे पालिका - 1 हजार 113

पिंपरी चिंचवड पालिका - 338

ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण

मुंबई - 408

पुणे महापालिका - 71

पिंपरी चिंचवड - 38

पुणे ग्रामीण - 26

ठाणे महापालिका - 22

पनवेल - 16

नागपूर - 13

नवी मुंबई - 10

सातारा - 8

कल्याण-डोंबिवली - 7

हेही वाचा - मुंबईत गेल्या महिनाभरात ३ हजार ५१६ मुलांना कोरोना, एकाही मुलाचा कोविडने मृत्यू नाही

Last Updated : Jan 5, 2022, 9:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.