ETV Bharat / state

'मोदी सरकारला आता जनाताच माफ करणार नाही'; काँग्रेस प्रवक्त्यांची टीका - सचिन सावंत मोदी सरकार टीका

अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणाला दररोजच नवीन वळण मिळत आहे. एम्सने त्याचा वैद्यकीय अहवाल दिला आहे. त्याच्या शरीरात कुठल्या प्रकारचे ड्रग्स आणि विषारी पदार्थ नसल्याचे स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

sachin sawant
सचिन सावंत
author img

By

Published : Sep 29, 2020, 5:50 PM IST

मुंबई - सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा एम्सने अहवाल दिला आहे. त्यावरून भाजपाने केलेले हीन पातळीवरचे राजकारण उघड झाले. मोदी सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी देशातील विविध तपास यंत्रणा कामाला लावल्या. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी केली. त्यामुळे त्यांना आता जनताच माफ करणार नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले.

मोदी सरकारला आता जनाताच माफ करणार नाही

सुशांतच्या मृत्यू प्रकरणी एम्सने आपला वैद्यकीय अहवाल दिला. त्याच्या शरीरात कुठल्या प्रकारचे ड्रग्स आणि विषारी पदार्थ नव्हते, असे या अहवालात समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. भाजपाने सुविधांच्या माध्यमातून हीन पातळीवरचे राजकारण केले आणि त्यातून त्यांनी आपला राजकीय स्वार्थ साधला. देशात कोरोनाचे महाभयंकर संकट उभे आहे. त्याचा सामना करण्यात मोदी सरकारला अपयश आले. शेतकऱ्यांचे देखील अनेक गंभीर प्रश्न देशात आहेत. हे सर्व झाकून ठेवण्यासाठी सुशांतच्या मृत्यूचा गाजावाजा करण्यात आला. बिहारच्या निवडणुकीत या प्रकरणाचा फायदा घेण्याचे षड्यंत्र मोदी सरकारने रचले, असा आरोप सावंत यांनी केला.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी देशातील महत्त्वाच्या तीन तपास यंत्रणा कामाला लावून जनतेच्या पैशाची उधळपट्टी मोदींनी केली. गुप्तेश्वर पांडे सारख्या लोकांचा वापर करून मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी केली. मोदी सरकारने मीडिया ट्रायल चालवत महाराष्ट्राची बदनामी केली असल्याने त्यांना जनता माफ करणार नाही असेही सावंत म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.