ETV Bharat / state

Breaking News : वाक्रुळनजीक भीषण अपघात; तीन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी - Maharashtra live updates today

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Feb 19, 2023, 6:27 AM IST

Updated : Feb 19, 2023, 8:54 PM IST

20:53 February 19

वाक्रुळनजीक भीषण अपघात; तीन जण जागीच ठार तर चार जण गंभीर जखमी

पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे आज सायंकाळी ट्रक आणि इकोची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक बराचकाळ खंडित झाली होती.

20:18 February 19

दुकानात शिरली भरधाव कार; एक ठार, तीन जण जखमी

मुंबई नागपूर महामार्गावर वसू सायगाव येथे शनिवारी रात्री आठ वाजेदरम्यान भरधाव आलेली कार दुकानात शिरल्याने दुकानातील तरुण व्यवसायिक रोहित किशन पवार हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे नेत असताना वाटेतच त्याची प्राणज्योत मावळली, तर अपघातात इतर तीन जण जखमी झाले असून चार दुचाकीचा चुराडा झाला आहे.

19:37 February 19

उद्धव ठाकरेंनी राजकारणासाठी शिवसेना आणि हिंदुत्वाचा त्याग केला - आशिष शेलार

मुंबई - संजय राऊत यांनी कधीही निवडणूक जिंकली नाही किंवा लढली नाही. उद्धव ठाकरे निराश असतात तेव्हा ते काहीही बोलतात. त्यांनी राजकारणासाठी शिवसेना आणि हिंदुत्वाचा त्याग केला, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

18:37 February 19

असं चितपट केलेय की पुन्हा उभं राहता येणार नाही - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अडीच वर्षांत जे ज्यांच्या सोबत गेले ते थेट रस्त्यावर आले

चुकीची संगत कुठे आणून ठेऊ शकते यातून दिसून आले आहे

विचारांच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण आला आहे

अडीच लाख कोटी रुपये भ्रष्टाचारामध्ये जायचे ते मोदींनी मोडून काढले

सर्वसामान्यांना न्याय मिळाला आहे

असं चितपट केलेय की पुन्हा उभं राहता येणार नाही

अशी अवस्था आता त्यांची केली आहे

लाबादाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, असे त्यांचे सरकार

आपण शेतकऱ्यांना सुद्धा भरघोस मदत केली

महाराष्ट्राला फास्टट्रॅक वर आणण्याचे काम आपण केले आहे

आपण मिळालेल्या अडीच वर्षात पाच वर्षांचे काम करून दाखवणार

पुराचे पाणी शहरात येऊ नये यासाठी पाणी वळविण्याची योजना करणार

त्यानुसार हे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणार

वर्ल्ड बँकेचे अधिकारी याबाबत भेट देऊन गेले आहेत, लवकरच पुराच्या विळख्यातून कोल्हापूर सांगलीला काढणार

18:06 February 19

तुम्हाला माझ्या वडिलांचा चेहरा पाहिजे पण त्यांचा मुलगा नकोय - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

तुम्हाला माझ्या वडिलांचा चेहरा पाहिजे पण त्यांचा मुलगा नकोय

बाळासाहेबांच्या शिवसेनेला भाजपने धोका दिला

मुख्यमंत्री बनण्याची मला इच्छा नव्हती पण शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमुळे मी मुख्यमंत्री झालो

निवडणूक आयोगाने दिलेला निकाल हे चांगल्यासाठीच, कार्यकर्ते पेटून उठले आता

17:37 February 19

आयआयटी दर्शन सोळंकी मृत्यू प्रकरणी विद्यार्थ्यांचा कॅम्पसमध्ये कॅन्डल मार्च

मुंबई - दर्शन सोळंकी या विद्यार्थ्यांचे आयआयटी मुंबई या ठिकाणी झालेलं मृत्यू प्रकरण गाजत आहे. दर्शन याचा मृत्यू हा जातीय भेदभावाच्या दिलेल्या वागणुकीमुळे झाल्याचा आरोप आयआयटी मुंबई येथील विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलने देखील केला. आज सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थी दर्शनच्या मृत्यूला न्याय मिळावा म्हणून कॅन्डल मार्च काढणार आहेत.

16:50 February 19

साताऱ्यातील खटावमध्ये पोलिसांचा छापा, शेतातील ७५ किलो अफू जप्त

सातारा - खटाव तालुक्यातील वाकळवाडी छापा टाकून वडूज पोलिसांनी शेतात लागवड केलेली ७५ किलो अफू जप्त केली आहे. याप्रकरणी तीन जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतात अफूची लागवड करण्यात आल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पाच दिवसांपूर्वीच स्थानिक गुन्हे शाखा आणि म्हसवड पोलिसांनी माण तालुक्यातील लोणार खडकी गावात छापा टाकून डाळींबाच्या शेतातून तब्बल १ कोटीचा गांजा जप्त केला होता.

16:19 February 19

अमित शाह यांचे कोल्हापूरात आगमन; सर्वात प्रथम अंबाबाईचे घेतले दर्शन

कोल्हापूर :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले आहे. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्वागत केले.

15:46 February 19

छत्रपतींच्या कर्तृत्वाचा पोवाडा सातासमुद्रापार, जर्मनीत शिवजयंती जल्लोषात साजरी

सातारा - देशात सर्वत्र जल्लोषात शिवजयंती साजरा होत असताना जर्मनीतील न्युरेमबर्ग शहरात देखील शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. नोकरी-व्यवसायानिमित्ताने जर्मनीत स्थायिक असणार्‍या महाराष्ट्रवासियांनी पारंपारिक पध्दतीने शिवजयंती साजरी केली आहे. महिलांनी शिवजन्माचा पाळणा म्हटला. छत्रपतींच्या पराक्रमाचा पोवाडा तसेच अफजलखान वधाचा देखाव्याने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले.

15:04 February 19

आग्रा येथील किल्ल्यात संपन्न होत असलेला ऐतिहासिक सोहळा सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब - विखे पाटील

अहमदनगर - संपूर्ण जगात आपल्‍या कर्तृत्‍वाने आदर्श विचारांची किर्ती निर्माण करणा-या युगपुरूषाचा जयंती दिन यंदा प्रथमच आग्रा किल्‍यात संपन्‍न होणे ही सर्वांसाठीच ऐतिहासिक आणि अभिमानाची बाब असल्‍याचे प्रतिपादन मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

14:22 February 19

राहुल आवाडे आणि मोश्मी आवाडे अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

राहुल आवाडे आणि मोश्मी आवाडे अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आवाडे परिवार भाजपच्या वाटेवर आज प्रवेश निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे. कोल्हापूरच्या राजकारणात आवाडे परिवाराची मोठी ताकद आहे. लोकसभेच्या तयारीचीसुद्धा चर्चा आहे. आवाडे यांच्या प्रवेशाने भाजपला आणखी बळ मिळणार आहे.

14:06 February 19

उद्धव ठाकरेंनी बोलविली वरीष्ठ नेत्यांची तातडीची बैठक

थोड्याच वेळात मातोश्रीवर बैठकीला सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे नेमके काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचे आहे. सकाळीच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर लगेचच आता उद्धव ठाकरेंनी वरिष्ठ नेत्यांची तातडीची बैठक बोलावल्याने ठाकरे गट पुढे नेमकी काय पावलं उचलतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

13:55 February 19

आरोपीच्या गर्भवती पत्नीला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप, पोलीस अधिकारी करणार चौकशी

भिवानी घटनेतील आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या गर्भवती पत्नीला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आरोप गंभीर असल्याने आम्ही अतिरिक्त एसपींना चौकशीसाठी सांगितले आहे. या घटनेसाठी त्याला सोशल मीडियाद्वारे जे काही लीड्स मिळत आहेत आणि आरोप निश्चित केले जातील. आमच्या बाजूने आणि आमच्या टीमकडून काही निष्काळजीपणा आढळल्यास आम्ही कारवाई करू, असे नूहचे एसपी वरुण सिंगला यांनी सांगितले.

13:11 February 19

42 वर्षीय रिअल इस्टेट एजंटचा मृत्यू, हत्या झाल्याचा पत्नीचा आरोप

मुंबईतील एका 42 वर्षीय रिअल इस्टेट एजंटच्या अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. मात्र एजंटच्या पत्नीने मालमत्तेच्या वादातून पतीला त्याच्या दोन भावांनी आणि त्यांच्या पत्नींनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. . जोगेश्वरी परिसरात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली, अशी माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली.

13:06 February 19

पारंपरिक पद्धतीने कोल्हापुरात पार पडला शिव जन्मकाळ सोहळा

राज्यासह संपूर्ण देशभरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे आज कोल्हापूरमध्ये टाऊन हॉल परिसरात असलेल्या नर्सरी बागेतील शिवमंदिरात छत्रपती घराण्यामार्फत शिवजयंती साजरी करण्यात आली. मालोजीराजे छत्रपती आणि यशस्विनीराजे छत्रपती यांचे पारंपारिक पद्धतीने शाही लवाजम्यासह कोल्हापूरकरांनी स्वागत केले.

12:58 February 19

पुरंदरेचे जीवन शिवरायांना समर्पित-अमित शाह

छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रमाण. बाबासाहेब पुरंदरेचे जीवन शिवरायांसाठी समर्पित होते. शिवराय हे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्वांना प्रेरणा देत असल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.

12:45 February 19

नितीश कुमार बिहारमधील स्थिती हाताळू शकत नाहीत-रविशंकर प्रसाद

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना काय झाले? ते बिहार हाताळू शकत नाहीत. राज्य संकटात आहे. त्यांच्या पक्षात अराजकता आहे. काँग्रेस त्यांना कोणतीही लिफ्ट देत नाही. नितीश जी, तुम्हाला देवेगौडा किंवा इंदर कुमार गुजराल (माजी पंतप्रधान) सारखे व्हायचे आहे? असा सवाल भाजपचे नेते तथा के रविशंकर प्रसाद यांनी केला.

12:13 February 19

शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी या थीम पार्कचे उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा पुण्यात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी या थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

11:43 February 19

अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशनचे प्रक्षेपण

डॉ एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 पट्टीपुलम गावातून प्रक्षेपित करण्यात आले. एक हायब्रिड रॉकेट आणि 150 पिकोसॅट उपग्रहांसह प्रक्षेपण करण्यात आले. हे पहिले हायब्रिड रॉकेट असल्याचे स्पेस झोन इंडियाचे संस्थापक आणि सीईओ डॉ आनंद मेगलिंगम यांनी सांगितले.

11:04 February 19

तांत्रिकाचा 14 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, पीडिता २ महिन्यांची गर्भवती

एका तांत्रिकावर 14 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काराचा आरोप आहे. पीडितेच्या आईने अंधश्रद्धेतून तांत्रिकाकडे भूत काढण्यासाठी पीडितेला नेले. त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला, ती 2 महिन्यांची गर्भवती होती. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

11:02 February 19

शिवसेना आमदारांची उद्या बैठक, शिवसेनेचे प्रतोद गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही बजावला व्हीप

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची उद्या सकाळी 10 वाजता बैठक होणार आहे. शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीप बजावला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांनाही व्हीप पाठवला. शिवसेना शिंदे गटाकडे आल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे. ठाकरे गटाचे आमदार हा व्हीप पाळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

10:59 February 19

बजेट फायनल करण्यासाठी वेळ द्या, मनिष सिसोदिया यांची सीबीआयला विनंती

मी नेहमीच सीबीआयला सहकार्य केले आहे, परंतु दिल्लीसाठी ही एक महत्त्वाची वेळ आहे. कारण आम्ही बजेट तयार करून ते फेब्रुवारीच्या अखेरीस केंद्र सरकारला पाठवायचे आहे. मला माहित होते की ते मला अटक करतील म्हणून मी सीबीआयला बजेट फायनल करण्यासाठी वेळ देण्यास सांगितल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.

10:16 February 19

शिवसेना नावासाठी २ हजार कोटींचा सौदा-संजय राऊत यांचा आरोप

शिवसेना नावासाठी २ हजार कोटींचा सौदा करण्यात आला. बऱ्याच गोष्टी उघड होणार आहेत, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

10:15 February 19

वायएसआरटीपी प्रमुख वायएस शर्मिला यांच्याविरोधात बीआरएस समर्थकांचे आंदोलन

वायएसआरटीपी प्रमुख वायएस शर्मिला यांनी महबूबाबादचे आमदार शंकर नाईक यांच्यावर कथित अयोग्य टिप्पणी केल्यानंतर, बीआरएस समर्थकांनी महबूबाबाद जिल्ह्यात आंदोलन केले.

09:41 February 19

संभाजीराजे शिवभक्तांसमवेत रांगेतच!

संभाजीराजे शिवभक्तांसमवेत रांगेतच शिवभक्तांना किल्ल्यावर प्रवेश न दिल्याने संभाजीराजे नाराज झाले आहेत. ते शिवभक्तांसमवेतच रांगेत उभे राहिले आहेत.

09:25 February 19

छोट्या शहरांसाठी 'निओ' प्रणाली करण्याचा महामेट्रोचा विचार

नागपूर महामेट्रो 20 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये मेट्रो निओ प्रणाली लागू करण्याच्या व्यवहार्यतेवर काम करत आहे. त्यात नाशिक आघाडीवर आहे, असे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

09:25 February 19

पावसामुळे 2022-23 मध्ये महाराष्ट्राच्या साखर उत्पादनात घट

राज्यातील विविध भागांतील प्रतिकूल हवामानामुळे महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 2021-22 मधील 137.28 लाख टनांवरून 2022-23 मध्ये 124 लाख टनांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे, असे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

09:18 February 19

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २१ ते ३ मार्चपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर

वसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे कमालीचे आक्रमक झाले आहेत. गद्दाराना गाडल्याशिवाय शांत बसणार नाही, असा त्यांनी निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २१ फेब्रुवारीपासून तीन मार्चपर्यंत महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. दरम्यान जुन्या शिवसैनिकांच्या गाठीभेटी आमदार खासदारांच्या बैठका घेण्यावर यावेळी भर दिला जाणार आहे.

09:15 February 19

तामिळनाडूच्या पट्टीपोलम गावातून अब्दुल कलाम उपग्रहाचे होणार प्रक्षेपण

डॉ एपीजे अब्दुल कलाम उपग्रह प्रक्षेपण मिशन23 आज तामिळनाडूच्या पट्टीपोलम गावातून प्रक्षेपित होणार आहे.

09:10 February 19

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा सुरू

राज्यभरासह शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. शासकीय पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरीवर दाखल झाले आहेत.

09:06 February 19

विहीरीत उडी मारुन प्रेमी युगलाची लातूरात आत्महत्या

लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ शिवारातील एका विहिरीत लातूरातील एका प्रेमी युगुलाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन लातूर शहरातील एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी (दि.17 फेब्रू,2023) तरुणीचा तर शनिवारी (दि18 फेब्रू) तरुणाचा मृतदेह विहीरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला होता.

08:43 February 19

आज काहीही राजकीय बोलायला नको-चंद्रकांत पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीला वंदन करण्यासाठी आज मी किल्ले शिवनेरीवर आलो आहे. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे येत आहे. मला येऊन या भूमीला वंदन करायचं आहे म्हणून मी आज लवकर आलो आहे. तसेच पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 11 वाजता शिवसृष्टीचा कार्यक्रम असल्याने तिथं देखील जायचं आहे. म्हणून मी लवकर आलो आहे. यावेळी पाटील यांना खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबतीत विचारलं असता ते म्हणाले की आज काहीही राजकीय बोलायला नको, अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

07:37 February 19

उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची घेतली चाचणी

उत्तर कोरियाने सरप्राईज लॉन्चिंग ड्रिलमध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या (ICBM) चाचणीची पुष्टी केली

07:36 February 19

उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प गोरखपूर शहरात होणार सुरू

राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीच्या उत्तरेस सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या गोरखपूर शहरात उत्तर भारतातील पहिला अणु प्रकल्प सुरू होत आहे. भारताची अण्वस्त्र क्षमता वाढवण्याच्या प्राधान्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितले.

06:58 February 19

हैदराबादमधील दोघांचे गोव्यात अपहरण, पोलिसांकडून पीडितांची सुटका, ११ जणांना घेतले ताब्यात

हैदराबाद पोलिसांकडून माहिती मिळाली की हैदराबादमधील दोन लोकांना येथे ओलीस ठेवण्यात आले. त्यांच्या सुटकेसाठी खंडणी मागितली जात आहे. आम्ही त्यावर कारवाई केली आणि 11 लोकांना ताब्यात घेतले आणि पीडितांची सुटका केली, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक निधी वलसन यांनी सांगितले.

06:58 February 19

30-40 टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक, दोघांना अटक

40-50 दिवसांत 30-40 टक्के परतावा देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी उरण पोलिसांनी दोघांना अटक केली. सुमारे 10 कोटी रुपये रोख आणि त्यांच्या बँक खात्यांमध्ये सुमारे 9 कोटी रुपये जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे नवी मुंबईचे डीसीपी पंकज डहाणे यांनी सांगितले.

06:43 February 19

खासदार अमोल कोल्हे भगवा झेंडा घेऊन पायथ्याशी पोहोचणार, शासकीय कार्यक्रमावरील बहिष्कार कायम

खासदार अमोल कोल्हे हे किल्ले शिवनेरी येथील पायथ्याच्या येथे भगवा झेंडा घेऊन आज पोहोचणार आहेत. भगवा झेंडा कायमस्वरुपी लावण्यात यावा अशी मागणी करूनही लावण्यात न आल्याने शिवजयंतीच्या निमित्ताने आजच्या शासकीय कार्यक्रमावर खासदार अमोल कोल्हे यांनी बहिष्कार टाकला आहे. ते पायथ्याच्या येथे येऊन परत जाणार आहेत.

06:19 February 19

Maharashtra Breaking News : महाराष्ट्रासह आग्रा किल्ल्यातही शिवजयंती होणार साजरी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज महाराष्ट्रासह देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. शिवरायांची शौर्यगाथा रविवारी (19 फेब्रुवारी) सायंकाळी आग्रा किल्ल्यातील दिवाण-ए-आममध्ये घुमणार आहे. राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९३ व्या जयंती सोहळ्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून परवानगी घेतली आहे. या जयंती सोहळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत. मात्र, सीएम योगी यांचा या कार्यक्रमात सहभागी होण्याचा अधिकृत दौरा अद्याप आलेला नाही.

Last Updated : Feb 19, 2023, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.