ETV Bharat / state

Maharashtra budget 2023: लव्ह जिहादवरून विधानसभेत गोंधळ, आशिष शेलार-अजित पवार यांच्यात उडाली चकमक - शिंदे फडणवीस सरकार

गुरूवारी राज्याचा अर्थसंकल्प सभागृहात सादर झाले आहे. आजपासून अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे. 293 अन्वये विरोधकांचा प्रस्तावावर चर्चा होईल. तसेच गेल्या आठवडाभरापासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवर देखील चर्चा केली जाईल.

Maharashtra budget 2023
अधिवेशनात अर्थसंकल्पावर होणार चर्चा
author img

By

Published : Mar 10, 2023, 10:49 AM IST

Updated : Mar 10, 2023, 2:11 PM IST

मुंबई : मंगल प्रभात लोढा यांच्या विधानानंतर लव्ह जिहाद शब्दावरून विधानसभेत गोंधळ झाला आहे. चर्चा सुरू असताना आशिष शेलार आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे.शेतकऱ्यांना खत खरेदी करण्याकरिता माहिती द्यावी लागते. त्या माहितीत जातीचा पर्याय आल्याने विरोधी पक्षनते सभागृहात आक्रमक झाले आहेत. जातीचा पर्याय वगळावा, ही माहिती केंद्राला कळविणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर केला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने बजेट सादर केला. त्यानंतर पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'पंचामृत' या ध्येयावर आधारित असल्याचे सांगितले. राज्य सरकारने शेतकरी, महिला, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, इत्यादी घटकांसंबंधित मोठ्या घोषणा केल्या आहेत. आज अधिवेशनात या अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.

महिलांसाठी या तरतूदी : शिंदे फडणवीस सरकारने ज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत 6000 रूपये इतका वार्षिक निधी मिळणार आहे. बससेवेत महिलांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या तिकिट दरात शिंदे-फडणवीस सरकारने 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. राजकीय नेत्यांनी या शिंदे भाजप सरकारने सादर केलेल्या या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीं स्तरांमधून सकारात्मक तर काही स्तरांमधून नकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार : राज्य सरकारतर्फे 5 ते 7 वी इयत्तेतील 1000 वरुन 5000 रुपये तर 8 ते 10 वी 1500 वरुन 7500 रुपये रक्कम देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार त्यासाठी 10 हजार रूपयांची देखील घोषणा करण्यात आली आहे. 10 हजार रूपयांची शिक्षणसेवकांना सरासरी वाढ करण्यात येणार आहे. नवीन घरकुल योजनेमध्ये इतर मागासवर्गियांसाठी राज्य सरकारतर्फे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वाढीव मदत देण्याची घोषणा : शक्तीसदन ही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहे. निराधार योजनेत वाढीव मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मानधनात भरीव वाढले, लेक लाडकी योजना नव्या स्वरूपात सादर केली आहे. यामध्ये पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना राज्य सरकारतर्फे लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत वाढीव मदत देण्याची घोषणा करण्यात आली होती.

हेही वाचा : Budget 2023: अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंनी काय केली शिंदे सरकारवर केली टीका?

Last Updated : Mar 10, 2023, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.