ETV Bharat / state

Breaking News : आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : जातीभेद होत असल्याची माहिती वरिष्ठांना दिली होती, विद्यार्थी संघटना

author img

By

Published : Feb 14, 2023, 7:10 AM IST

Updated : Feb 14, 2023, 10:00 PM IST

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra Breaking News

21:58 February 14

आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : जातीभेद होत असल्याची माहिती वरिष्ठांना दिली होती, विद्यार्थी संघटना

मुंबई - आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. दरम्यान, जातीभेद होत असल्याची कल्पना त्याने वरिष्ठांना दिली होती, असा आरोप विद्यार्थी संघटनेने केला आहे.

21:26 February 14

पुण्यात वकील महिलेचा विनयभंग; राष्ट्रवादीच्या नेत्याला केली अटक

पुणे :- गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढली असून कोयता गँग असेल फसवणुकीचे गुन्हे असेल तसेच विविध गुन्हे असेल पुणे शहरात याचे प्रमाण वाढले आहे. आता तर एका वकील महिलेवर विनयभंग केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील एका २५ वर्षीय तरुणीवर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दयानंद इरकल यांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

21:25 February 14

20:20 February 14

मनसे कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार

पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी बातमी

मनसे आणि भाजपमध्ये वरिष्ठ स्तरावर चर्चा

मात्र भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही

बाबू वागस्कर यांची माहिती

भाजपला मदत करण्याचा आदेश राज ठाकरेंचा आहे

वरिष्ठ स्तरावर बोलणं झालंय

20:04 February 14

लिव्ह-इन पार्टनरची हत्या प्रकरणी पालघरच्या एकाला अटक

पालघर - तुळींज पोलिसांनी लिव्ह इन पार्टनरची हत्या करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला अटक केली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीला रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांनी मध्य प्रदेशातील नागदा येथे एका ट्रेनमधून ताब्यात घेतले.

20:02 February 14

नागपुरात बजरंग दलाची व्हॅलेंटाईन डे विरोधात रॅली

नागपूर - बजरंग दलाच्या सदस्यांनी आज शहरात रॅली काढून हनुमान चालिसाचे सामूहिक पठण केले. त्यानी व्हॅलेंटाईन डेचा निषेध केला.

19:59 February 14

मोदी मंत्रिमंडळात गडकरी हे एकमेव काम करणारे मंत्री सुप्रिया सुळे

परभणी - नितीन गडकरी हे केंद्रीय मंत्रिमंडळाचे एकमेव सदस्य आहेत जे काम करतात, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सुळे बोलत होत्या.

19:49 February 14

सीबीएससीची दहावी बारावीची परीक्षा उद्यापासून

नवी दिल्ली - CBSE यावर्षी 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिल दरम्यान इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेणार आहे. बोर्डाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

19:26 February 14

एअर इंडिया एअरबसकडून 250 विमाने घेणार, पंतप्रधानांसह बैठकीनंतर घोषणा

नवी दिल्ली : एअर इंडियाने 250 विमाने घेण्यासाठी एअरबसशी आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विमान करारावर स्वाक्षरी केली आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह इतरांनी ऑनलाईन बैठकीनंतर या कराराची घोषणा केली. चंद्रशेखरन म्हणाले की एअर इंडियाने या करारासाठी एअरबससोबत सहमती पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

18:47 February 14

मेघवाडीत केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पप्पूचा जीवघेणा हल्ला, पोलिसांना आवळल्या मुसक्या

मुंबई - मेघवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिपळूणकर दांपत्याच्या घरी केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पप्पूने जीवघेणा हल्ला केला आहे. आरोपी पप्पू सिद्धेश्वर एक्सप्रेसने पळून जात असताना मेघवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

18:34 February 14

लगान फेम अभिनेता जावेद खान यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन

लगान फेम अभिनेता जावेद खान यांचे वयाच्या 70 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी चक दे इंडिया, लगान त्याचबरोबर वन्स अपॉन ए टाइम, अंदाज अपना-अपना अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

17:57 February 14

साताऱ्यात गोवा बनावटीचा ६० लाखांचा दारूसाठा जप्त

सातारा - राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीचा ६० लाखांचा दारूसाठा जप्त केला आहे. नूडल्सच्या नावाखाली कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात होती. कंटेनर गोव्याहून नाशिकला जात असताना पुणे-बंगळुरू महामार्गावर मालखेड (ता. कराड) हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

17:53 February 14

बीबीसीच्या कार्यालयांवरील छाप्यांवर इंग्लंड सरकारचीही नजर

आम्ही भारतातील बीबीसीच्या कार्यालयात केलेल्या कर सर्वेक्षणाच्या अहवालांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत, असे इंग्लंडच्या सरकारी सुत्रांनी स्पष्ट केले आहे.

17:36 February 14

भाजपाला गरज असेल तर मंत्रिमंडळात घेतील : महादेव जानकर

पुणे : भाजपा आणि राष्ट्रीय समाज पक्षाची युती ही फक्त महाराष्ट्रपुरती आहे. बाकी सगळीकडे आम्ही पक्ष वाढवत आहोत. त्यामुळे आम्ही मागणारे नाही, तर मी पक्षाचा कॅप्टन आणि आदेश देणारा आहे. त्यामुळे भाजपाला गरज वाटली तर ते मला मंत्रिमंडळात घेतील नाही तर आपला मार्ग मोकळा आहे, असं राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी म्हटले आहे.

17:35 February 14

आयआयटी विद्यार्थी आत्महत्या प्रकरण; जातीय भेदभावाचे आरोप संस्थेने फेटाळले

मुंबई - आयआयटीमध्ये विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. ही आत्महत्या जातीय भेदभावातून केल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, हा आरोप आयआयटी संस्थेने फेटाळला आहे. पोलीस चौकशी झाल्यानंतरच यावर सविस्तर माहिती बाहेर येईल असेही प्रशासनाने सांगितले आहे.

17:06 February 14

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेचा शून्य टक्के परिणाम; शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

सातारा - ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पाटण तालुक्यातील मल्हारपेठच्या सभेत उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला शंभूराज देसाई यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारेंच्या सभेचा पाटण विधानसभा मतदार संघात मायनस शून्य टक्के परिणाम होईल, असे शंभूराज देसाईंनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

16:03 February 14

साताऱ्यात डाळीबांच्या शेतातून १ कोटीचा गांजा जप्त, एलसीबीची मोठी कारवाई

सातारा - स्थानिक गुन्हे शाखेने माण तालुक्यातील लोणार खडकी गावात छापा मारला आहे. या कारवाईत डाळींबाच्या शेतातून तब्बल १ कोटी रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहेत. अंमली पदार्थासंदर्भात पोलिसांनी केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. डाळींबाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे पोलिसांना आढळून आले. गांजाचे वजन ४२३.०२ किलो आहे. बाजारात गांजाच्या झाडांची किंमत १ कोटी ५ लाख ७५ हजार रूपये आहे.

15:48 February 14

प्रतिबंधीत ई-सिगारेटचा मोठा साठा मुंबईत जप्त

मुंबई - शाळेच्या बाजूला अंदाजे १०० मीटर परिसरात भारत सरकारने प्रतिबंधीत केलेली ई-सिगारेट विक्री करण्यासाठी साठा करून ठेवलेला एकूण रु.५,४१,७५८ अंदाजे किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यास अंमलबजावणी, गुन्हे शाखेस यश आले आहे.

15:46 February 14

सातारा पोलिसांचा दणका, १२ जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

सातारा - सातारा पोलिसांनी फलटणमधील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करत संघटीत गुन्हेगारीला दणका दिला आहे. खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण, अपहरण आणि दमदाटीचे गंभीर गुन्हे असणाऱ्या १२ जणांच्या टोळीला मोक्का लावण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पाठविलेल्या मोक्का प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली आहे.

15:09 February 14

आयकर विभागाला पूर्णपणे सहकार्य करणार - बीबीसी

मुंबई - बीबीसीवर आयकर विभागाचे छापे पडले आहेत. त्यानंतर बीबीसीने प्रतिक्रिया दिली आहे. बीबीसीने म्हटले आहे की, आमचे पूर्ण सहकार्य आहे. आम्हाला आशा आहे की ही परिस्थिती लवकरात लवकर बदलेल. बीबीसीने दिल्ली आणि मुंबई कार्यालयात आयकर सर्वेक्षणांदरम्यान हे ट्वीट केले आहे.

14:59 February 14

मंत्रिमंडळ बैठकीत शालेय विद्यार्थी, शेतकऱ्यांनाठी महत्वपूर्ण निर्णय

मुंबई - मंत्रिमंडळ बैठकीत आज काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करण्यात येतील. धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देणार, त्यासाठी १ हजार कोटी निधीस मान्यता. ५ लाख शेतकऱ्यांना त्याला लाभ होईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा करणार. त्यासाठी अध्यादेश काढण्यात येणार आहे. यासह इतरही निर्णय घेण्यात आले.

13:55 February 14

पीएमएलएच्या तरतुदींनुसार नवाब मलिक खरेच आजारी आहेत का, मुंबई हायकोर्टाचा सवाल

मुंबई - पीएमएलएच्या तरतुदींनुसार नवाब मलिक आजारी आहेत का, तसेच ते यानुसार जामिनाचे हक्कदार आहेत का, असा सवाल मुंबई हायकोर्टाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी विचारले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार परिभाषित केल्याप्रमाणे आजारी व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांना जामीन मिळण्याचा हक्क आहे का.

13:50 February 14

माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज वसईत!

वसई : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज वसई दौऱ्यावर येत आहेत. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते वसईत दाखल होत असून सुरूवातीला ते वसई पश्चिमेतील भुईगाव येथील सहयोग सेंटरच्या लोककला मंचाचे उद्घाटन करून जूचंद्र येथील निष्ठावंत क्रिकेट चषकाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर नायगाव पूर्वतील परेरानगर येथील एका कौटुंबिक मेळाव्याला ते हजर राहणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागताची शिवसैनिकांनी जय्यत तयारी केली आहे.

13:48 February 14

बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारल्याने भावाचा खून

बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या ५६ वर्षीय नराधमाला जाब विचारल्याच्या वादातून १७ वर्षीय भावाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.

12:46 February 14

दिल्ली, मुंबईतील बीबीसी कार्यालयावर आयकर विभागाचा छापा?

आयकर विभागाचे अधिकारी दिल्लीतील बीबीसी कार्यालयात दाखल झाले आहेत. मुंबईतील बीबीसीच्या कार्यलयावरही आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. ते तिथे सर्वेक्षण करत आहेत. एएनआयने ही माहिती दिली आहे.

12:30 February 14

सातवा वेतन आयोगाच्या नावाखालीसरकारकडून कर्मचाऱ्यांची फसवणूक?

मुंबई - रखडलेल्या बक्षी समितीच्या खंड दोन नुसार सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राच्या धर्तीवर सुधारित सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्याचा निर्णय सरकारने नुकताच जाहीर केला. केवळ 20 विभागातील 104 संवर्गातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना म्हणजेच केवळ 25 टक्के लोकांसाठी हा निर्णय लागू होणार आहे. उर्वरित अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्णयाचा लाभ मिळणार नाही. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांची एकप्रकारे फसवणूक केल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून केला जातो आहे.

12:12 February 14

आईला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाचा शेजाऱ्याने केला खून

ठाणे - भिवंडी शहराजवळील एका गावात एका 17 वर्षीय मुलाने आपल्या आईला मारहाणीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या 56 वर्षीय शेजाऱ्याची चाकूने भोसकून हत्या केली.

11:40 February 14

सभागृहाचे अधिवेशन चालू असतानाच स्पीकरला दिली जावी-कपिल सिब्बल

सभागृहाचे अधिवेशन चालू असतानाच स्पीकरला हटवण्याची नोटीस दिली जावी. त्यामुळे होणार्‍या सर्व गैरप्रकारांना आळा बसेल, असे कपिल सिब्बल यांनी युक्तीवादात म्हटले आहे. योग्य निर्णय होत नसले तर १० व्या सुचीचा उपयोग काय, असेही त्यांनी म्हटले.

11:34 February 14

अध्यक्षांना हटविण्यासाठी राज्यपालांनी अजेंडा सेट केला-कपिल सिब्बल

राज्यपालांनी वेळेच्या आधीच अधिवेशन बोलाविले. रेबिया केसनुसार सभागृहाची रचना बदलता येत नाही. ठाकरे गटाकडून सिब्बल हे युक्तीवाद करत आहेत.

11:09 February 14

सध्या राजकीय नैतिकता उरलेली नाही-कपिल सिब्बल

सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला शिंदे गटाचे ज्येष्ठ वकील हरिष साळवे यांनी दिला आहे. त्याला ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला आहे.

10:10 February 14

त्रिपुरामध्ये भाजपचे बहुमतामधील सरकार येणार-अमित शाह

त्रिपुरामध्ये भाजपचे बहुमतामधील सरकार येणार असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. नक्षलवाद्यांनी आत्मसर्मण केले आहे.

09:36 February 14

सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनवरील मेट्रो शेडला आग

सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनवरील मेट्रो शेडला आग लागली होती. या आगीवर अग्नीशमन विभागाने नियंत्रण मिळविले आहे.

09:34 February 14

माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज वसईत

वसई : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री तथा शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज वसई दौर्यावर येत आहे. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ते वसईत दाखल होत असून सुरूवातीला ते वसई पश्चिमेतील भुईगाव येथील सहयोग सेंटरच्या लोककला मंचाचे उद्घाटन करून जूचंद्र येथील निष्ठावंत क्रिकेट चषकाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर नायगाव पूर्वतील परेरानगर येथील एका कौटुंबिक मेळाव्याला ते हजर राहणार आहेत.

09:33 February 14

पोलिसांना बघताच आरोपीने घेतली तिसऱ्या माळ्यावरून उडी,उपचारादरम्यान मृत्यू

आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बघतात भांबवलेल्या तरुणाने थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्याचा हाच प्रयत्न त्याच्या जीवावर घेतला आहे. ही घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उप्पलवाडी येथे घडली आहे.

08:09 February 14

निवडणूक आयोगाच्या त्रिपुरामध्ये मोठ्या कारवाया

त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी बेकायदेशीर चलन, गांजा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. याचे एकूण मुल्य 44 कोटी रुपये आहे.

08:08 February 14

अमित शाह आज हरियाणाच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह आज कर्नाल येथील हरियाणा पोलीस अकादमीमध्ये कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

07:46 February 14

पुणे -नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पाच महिला ठार

पुणे -नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच महिला ठार झाल्या आहेत.

07:10 February 14

वाहतूक पोलीस हवालदाराला १ किमी जास्त ओढत नेले, चालकाला अटक

पालघरमधील वसई परिसरात सिग्नल ओलांडण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करताना वाहतूक पोलीस हवालदाराला काल गाडीच्या बोनेटवर 1 किमी पेक्षा जास्त ओढून नेण्यात आले. चालक 19 वर्षांचा होता आणि त्याच्याकडे वैध परवाना नव्हता. चालकाला अटक करण्यात आल्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले.

06:39 February 14

Maharashtra Breaking News : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिटने ४ ड्रग्ज तस्करांना केली अटक

मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने काल काळाचौकी परिसरातून 4 ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 26 लाख रुपयांची चरस जप्त केली. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.

Last Updated : Feb 14, 2023, 10:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.