कोल्हापूर : स्वतःला मूल नसल्याने चिमुकल्याचे अपहरण करणारे दाम्पत्य अखेर 48 तासांच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बाळूमामा येथून दोन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या मुलाला कोल्हापूर पोलिसांनी 48 तासांत शोधून काढले आहे. पळवून नेणाऱ्या जोडप्याला काल 6 मार्च रोजी रात्री उशिरा अटक केली. स्वतःला मूल नसल्याने मुलाला दुचाकीवरून पळवून नेले होते. त्यांना सोलापूरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असे या दाम्पत्याचे नाव असून दोघेही साताऱ्यातील मेढा मधील रहिवासी आहेत.
Breaking News : मूल नसल्याने कोल्हापूरातील चिमुकल्याचे अपहरण; साताऱ्यातील दाम्पत्याला अटक
20:05 March 07
मूल नसल्याने कोल्हापूरातील चिमुकल्याचे अपहरण; साताऱ्यातील दाम्पत्याला अटक
20:00 March 07
महिलेच्या पोटातून काढली ११ किलो वजनाची गाठ
मुंबई - महिलेच्या पोटातून काढली ११ किलो वजनाची 'फायब्रॉइड' गाठ. राजावाडी रुग्णालयात झाली यशस्वी शस्त्रक्रिया.
19:56 March 07
बांगलादेशची राजधानी ढाक्यात स्फोट 14 ठार, 100 जखमी
ढाका - बांगलादेशची राजधानी येथे एका सात मजली इमारतीत झालेल्या स्फोटात किमान 14 लोक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाले. पोलिसांनी ही माहिती दिली. अग्निशमन सेवा नियंत्रण कक्षाला ही माहिती मिळताच मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी पाचच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण कळू शकले नाही.
18:45 March 07
अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीच्या मूल्यांकनाचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
ठाणे - राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हंगामापूर्वी उभ्या असलेल्या पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे किंवा मूल्यांकन करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
18:32 March 07
मुलुंड चाळीत बाल्कनीचा भाग कोसळल्याने चार जण जखमी
मुंबई - मुलुंड परिसरात मंगळवारी दुपारी एका चाळीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने तीन लहान मुलांसह चार जण जखमी झाले. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
18:15 March 07
दिल्लीमध्ये आतिशी, सौरभ भारद्वाज यांच्या मंत्रिमंपदावर राष्ट्रपतींची मोहोर
नवी दिल्ली - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सल्ल्यानुसार आम आदमी पक्षाचे आमदार आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची शपथ घेतल्याच्या तारखेपासून दिल्ली मंत्रिमंडळात मंत्री म्हणून नियुक्ती केली. गृह मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. केजरीवाल यांनी मंत्रिमंडळात नियुक्तीसाठी नावे नायब राज्यपालांकडे पाठवली होती.
18:04 March 07
कुर्ला पश्चिम बैल बाजारात ऑल इंडिया गॅस फॅक्टरीमध्ये आग
मुंबई - कुर्ला पश्चिम बैल बाजार येथील ऑल इंडिया गॅस फॅक्टरी मध्ये आग लागली आहे. सुमारे 4.35 वाजता लागलेली ही आग लेव्हल 2 ची आग असल्याचे सांगण्यात आले. आगीमध्ये इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक वस्तू, रेफ्रिजरेटर, लाकडी सामान, स्टीलचे रॅक, किचनमधील सामान जळून खाक झाले. या दुर्घटनेत कोणीही जखमी नसल्याचे वृत्त नाही.
17:21 March 07
श्रद्धा हत्याकांड: आफताब आहे ‘प्रशिक्षित आचारी’, त्याला मांस टिकवण्याची होती माहिती
नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आज न्यायालयाला सांगितले की आरोपी आफताब अमीन पूनावाला हा प्रशिक्षित शेफ आहे. त्याला मांस कसे प्रिझर्व करायचे हे माहीत आहे. मंगळवारी दिल्लीतील साकेत न्यायालयात आरोपींविरुद्ध सुनावणी सुरू झाली. आफताब हा ताज हॉटेलमध्ये प्रशिक्षित शेफ आहे. त्याला मांस कसे टिकवायचे हे माहीत आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपींनी श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर ड्राय आइस, अगरबत्ती इत्यादी साहित्यही मागवले होते. गुन्ह्यानंतर त्याने नवीन मैत्रिणीला अंगठीही दिली, असे पोलिसांनी साकेत न्यायालयात सांगितले.
16:39 March 07
दोन विद्यार्थांना अमानुष मारहाण प्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल
ठाणे : दोन विद्यार्थांना प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे एका खासगी शिकवणीत शिक्षिकेने अमानुषपणे अंगावर वळ येईपर्यंत मारहाण केली. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात शिक्षिकेवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपा अगरवाल असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.
15:28 March 07
शंभूराज देसाईंच्या घराशेजारील इमारतीवर उदयनराजेंचे चित्र काढण्यावरून तणाव
सातारा - ऐन धुळवडीच्या सणादिवशी साताऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या घराशेजारील इमारतीवर खासदार उदयनराजे भोसले यांचे छायाचित्र काढण्यात येत होते. क्रेनच्या सहाय्याने भिंत रंगविल्यानंतर चित्रकाराने शनिवारी चित्र काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, क्रेन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाच्या प्रवेशव्दारावर उभी करण्यास पालकमंत्र्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी हरकत घेतली. शंभूराज देसाईंशी चर्चा करुन पुढील कार्यवाही करण्यास त्यांनी संबंधितांना सांगितले. यावरून मंगळवारी सातार्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत चित्रकाराला ताब्यात घेतले आहे. पोवई नाका परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
15:23 March 07
विक्टोरिया मेमोरियल अंधशाळेतील सात मुलांना अन्नामधून विषबाधा
मुंबई - विक्टोरिया मेमोरियल अंधशाळेतील सात मुलांना अन्नामधून विषबाधा झाली आहे. पालिकेच्या नायर रुग्णालय त्यांना दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
15:19 March 07
गुजरातच्या समुद्रात 5 इराणी नागरिकांसह बोट पकडली, 425 कोटींचे अमली पदार्थही जप्त
गांधीनगर - गुजरात पोलिस आणि भारतीय तटरक्षक दलाच्या दहशतवाद विरोधी पथकाने ओखापासून 180 सागरी मैल अंतरावर 5 इराणी नागरिकांसह एक संशयास्पद बोट पकडली आहे. बोटीतून सुमारे 425 कोटी रुपयांचे 61 किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. गुजरातचे डीजीपी विकास सहाय यांनी ही माहिती दिली.
14:56 March 07
चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे - राहुल गांधींचा आरोप
लंडन - चीन आपल्या 2,000 चौरस किमी भूभागावर तो बळकावून बसला आहे, अशी थेट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आमच्या पंतप्रधानांनी विरोधी नेत्यांसोबतच्या बैठकीत सांगितले की, भारताची एक इंचही जमीन घेतली जात नाही. लष्कराला हे माहीत आहे. पण आमचे पंतप्रधान म्हणतात की असे काही झाालेलेच नाही. राहुल गांधींनी अशा प्रकारची टीका केली आहे.
12:12 March 07
चिमुकल्याचे अपहरण करणारे दाम्पत्य 48 तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात
कोल्हापूर - स्वतःला मूल नसल्याने चिमुकल्याचे अपहरण करणारे दाम्पत्य 48 तासांच्या आत पोलिसांच्या ताब्यात. बाळूमामा येथून अपहरण केलेल्या मुलाला कोल्हापूर पोलिसांनी 48 तासांत शोधून काढले. पळवून नेणाऱ्या जोडप्याला 6 मार्च रोजी रात्री केली अटक. स्वतःला मूल नसल्याने नेले होते पळवून, सोलापूरातून घेतले ताब्यात. मोहन अंबादास शितोळे आणि छाया मोहन शितोळे असे या दाम्पत्याचे नाव. दोघेही साताऱ्यातील मेढा मधील रहिवासी. सात वेगवेगळ्या तपास यंत्रणा राबवून 24 तासांत मुलाला काढले शोधून. तब्बल 90 ते 95 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तापासून लागला शोध.
11:53 March 07
होळीच्या दिवशी ठाण्यात ठाकरे-शिंदे गटात राजकीय धुळवड
मुंबई - होळीच्या दिवशीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये पुन्हा एकदा शाखेवरुन वाद ऐरणीवर आला आहे. शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गट एकमेकांना भिडले. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. दोन्ही गटांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
11:22 March 07
55 लाख रुपयांच्या मेफेड्रोन पावडरसह दोघांना अटक
ठाणे शहराच्या हद्दीतून 55 लाख रुपयांच्या मेफेड्रोन पावडरसह अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली.
11:16 March 07
मर्द असाल तर समोर या. असे भ्याड हल्ले करू नका-संजय राऊत
शिवसेनेत दोन गट पडल्यापासून शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून राड्याची बातम्या येत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी पुन्हा एकदा राडा झाला आहे. यापूर्वी पालघर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातही हे दोन गट समोरा समोर आले होते. या सर्व प्रकरणावर आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना थेट आव्हान दिलं आहे. 'मर्द असाल तर समोर या. असे भ्याड हल्ले करू नका' असा थेट इशाराच खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.
09:43 March 07
भारतीय नौदलाने MRSAM ची घेतली चाचणी
भारतीय नौदलाने आयएनएस विशाखापट्टणमवरून MRSAM (मध्यम श्रेणीच्या पृष्ठभागावरून हवाई क्षेपणास्त्र) ची चाचणी घेतली. ही यंत्रणा DRDO आणि IAI द्वारे संयुक्तपणे विकसित करण्यात आली आहे.
09:02 March 07
तुम्हाला मी आवडत नसल्यास माझा शिरच्छेद करा-ममता बॅनर्जी
पश्चिम बंगालच्या विधानसभेत महागाई भत्ता (DA) आणि इतर मागण्यांबाबत निदर्शने करण्यात आली आहेत. त्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला मी आवडत नसल्यास माझा शिरच्छेद करा. पण यापलीकडे मी काहीही करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
07:37 March 07
कारखान्याचे शटर कोसळून एकाचा मृत्यू
बारा भरी गावात निर्माणाधीन पराग रस्क कारखान्याचे शटर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आठ मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
07:35 March 07
आरएसएस ही संघटना मुस्लिम ब्रदरहुडच्या धर्तीवर-राहुल गांधी
आरएसएस ही संघटना मुस्लिम ब्रदरहुडच्या धर्तीवर आहे. स्पर्धेचा उपयोग सत्तेत येण्यासाठी आणि नंतर लोकशाही स्पर्धेला उधळण्याची कल्पना आहे, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केली आहे.
07:35 March 07
गावातील रहिवाशांना वाघाचे चार पिल्ले सापडले!
आंध्रप्रदेशमध्ये नंद्याल जिल्ह्यातील पेड्डा गुम्मदापुरम गावातील रहिवाशांना वाघाचे चार पिल्ले सापडले. गावकऱ्यांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवून वन अधिकाऱ्यांना माहिती दिली.
07:35 March 07
जगभरातील नेत्यांकडून मिळालेले कौतुक आपल्यासाठी खरोखरच अभिमानास्पद -पियुष गोयल
पंतप्रधान मोदी आणि एक राष्ट्र म्हणून भारताला जगभरातील नेत्यांकडून मिळालेले कौतुक आपल्यासाठी खरोखरच अभिमानास्पद आहे. जग भारताकडे पाहत आहे, असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात म्हटले आहे.
06:42 March 07
Maharashtra Breaking News : ठाण्यात शिवसेनेचे स्थानिक कार्यालय घेण्यावरून ठाकरे व शिंदे समर्थकांमध्ये हाणामारी
मुंबई: ठाण्यातील शिवसेनेच्या स्थानिक कार्यालयाचा ताबा घेण्यावरून उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. त्यांनी चावी दिली नाही म्हणून शिवसेनेच्या शाखेचे कुलूप तोडल्याची प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी आहे.