ETV Bharat / state

Breaking News : औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल - maharashtra state news

Maharashtra Breaking News
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Mar 5, 2023, 6:36 AM IST

Updated : Mar 5, 2023, 8:52 PM IST

20:50 March 05

मुंबई पोलीस दलातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त खास भेट

मुंबई : मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांना आपलं कुटुंब आणि समाजासाठी कर्तव्य या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय चोखपणे पार पाडाव्या लागतात. या जबाबदाऱ्या पार पडताना करावी लागणारी तारेवरची कसरत ही नावाजण्याजोगी आहे. 8 मार्चला होणाऱ्या जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांना खास भेट मिळणार आहे. प्राथमिक तत्त्वावर प्रथम आझाद मैदान आणि एन एम जोशी मार्ग तसेच प्रोटेक्शन विभागात महिला दिनानिमित्त पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते हिरकणी कक्षाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

18:49 March 05

औरंगजेबाचे पोस्टर हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या अज्ञातांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर - नामांतनाच्या मुद्द्यावरून एमआयएम तर्फे सुरू असलेल्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकावल्यानाऱ्या अज्ञात युवकांवर सिटी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी आंदोलन दरम्यान फोटो हातात घेऊन घोषणाबाजी केल्याने नव्या वादाला तोंड फुटल होत. यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार टीका करण्यात आली होती. तर आंदोलनाला वेगळी दिशा देण्यासाठी खोडसाळ पणे युवकांना पाठवलं असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता.

18:00 March 05

माजी मंत्री विजय शिवतारे यांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप

पुणे:- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्या बारामती लोकसभा मतदार संघातील खासदार सुप्रिया सुळे हे दर आठवड्याच्या शनिवारी आणि रविवारी त्यांच्या मतदार संघात दौरा आयोजित करत असतात. काल झालेल्या त्यांच्या दौऱ्यावर शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी गंभीर आरोप केलं आहे.त्यांनी त्यांच्या फेसबुक वर पोस्ट करत हे आरोप केलं आहे.

15:58 March 05

जव्हार, विक्रमगड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल

पालघर- हवामान खात्याने दिलेल्या ईशारानुसार 4 फेब्रुवारी रोजी रात्री विक्रमगड तालुक्यात व जव्हार तालुक्यात काही भागात अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसू लागल्या होत्या. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी पिके तुर, हरभरा, वाल काढणीस शेतकऱ्यांनी सुरवात केली होती. असे असताना अचानक अवकाळी पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्याची तारांबळ उडाली.

14:20 March 05

नोकरीचे आमिष दाखवून सेक्स रॅकेटमध्ये अडकविले, दोघांना अटक

एका महिलेला गल्फ किंगडम ऑफ ओमानमध्ये नोकरीचे आमिष दाखवून तेथील सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांच्या हवाली केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी दिली.

14:17 March 05

अभिनेता शिजान खानची तुरुंगातून अखेर सुटका

अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणी डिसेंम्बर 2022 पासून अटकेत असणाऱ्या अभिनेता शिजान खानला वसई कोर्टाने काल जामीन दिल्यानंतर आज सकाळी त्याची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली. सकाळी साडेअकराच्या सुमारास तो बाहेर आल्यानंतर त्याच्या बहिणी आणि परिवारातील इतर सदस्यांनी भाऊकपणे त्याच स्वागत केले. माध्यमाशी काहीही न बोलता शिजान लगेच बहिणींसह रवाना झाला.

13:46 March 05

माजी पंतप्रधान इम्रान खानला थोड्याच वेळात होणार अटक, पोलिस निवासस्थानी पोहोचले

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान अडचणीत सापडले आहेत. तोशाखाना प्रकरणात अटक करण्यासाठी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या इस्लामाबाद येथील जमान पार्क येथील निवासस्थानी पोलीस पोहोचले आहेत.

13:14 March 05

12वीच्या गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी 3 विद्यार्थ्यांसह 4 लोकांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वीच्या गणिताची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी 3 विद्यार्थ्यांसह 4 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दादरच्या डॉ.अँटोनियो डिसिल्वा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील एका विद्यार्थ्याच्या मोबाईल फोनमधून प्रश्नपत्रिकेचा काही भाग जप्त करण्यात आला. मुमई पोलिसांनी माहिती दिली आहे.

12:09 March 05

शिवराज पाटील चाकुरकर यांच्या चुलतभावाची आत्महत्या

माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर उर्फ हणमंत पाटील यांनी लातुरातील शिवराज पाटील चाकुरकर यांच्या देवघर येथील निवासस्थानी आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. सकाळी 9 वाजताची घटना आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

11:31 March 05

रामदास कदमांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची आज मशाल पेटणार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सपत्नीक खेडमध्ये पोहोचले आहेत. ते थोड्यात वेळात रामदास कदम यांचा बालेकिल्ला असलेल्या खेडमध्ये सभा घेणार आहेत.

10:53 March 05

भारतीय विद्यार्थ्याने अमेरिकन विमानात सहप्रवाशावर केली लघुशंका

विद्यार्थ्याने 4 मार्च रोजी JFR-DeL अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये सहप्रवाशावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. विद्यार्थी हा मद्यधुंद अवस्थेत होता, असे अमेरिकन एअरलाइन्सने तक्रारीत म्हटले आहे.

10:08 March 05

खेडमध्ये अतिविराट सभा होणार-संजय राऊत

राज्यभरात शिवगर्जना मेळावे सुरू आहेत. खेडमध्ये अतिविराट सभा होणार आहे. थोड्याच वेळात उद्धव ठाकरे सभेसाठी निघणार आहेत. खेडच्या सभेकडे राज्याचे लक्ष असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

09:23 March 05

राज्यपाल मंत्रिमंडळात हस्तक्षेप करतात, आक्षेप घेत ९ विरोधी पक्षाच्या नेत्यांचे पंतप्रधानांना पत्र

अबकारी धोरण प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटकेवर अरविंद केजरीवाल यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षाच्या ९ नेत्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. आम्ही लोकशाहीपासून निरंकुशतेकडे जात असल्याचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. राज्यपाल मंत्रिमंडळात हस्तक्षेप करत असल्याचेही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रात म्हटले आहे.

09:03 March 05

बॉयलरचा स्फोट होऊन चार कामगार जखमी

विजयपुरा येथील नंदी सहकारी साखर कारखान्यात काल नव्याने बसवलेल्या बॉयलरचा स्फोट होऊन चार कामगार जखमी झाले. पोलिस तपास सुरू आहे.

08:32 March 05

उत्तरेकडील राज्यांतून आलेले स्थलांतरित कामगारांना भीती नाही- तामिळनाडू पोलीस

तामिळनाडूत उत्तरेकडील राज्यांतून आलेले स्थलांतरित कामगार कोणत्याही भीतीशिवाय जगत आहेत. शांतता बिघडवण्यासाठी आणि तणाव निर्माण करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जात असल्याचे तामिळनाडू पोलिसांनी म्हटले आहे.

07:51 March 05

सानिया मिर्झा आज हैदराबादमध्ये खेळणार फेअरवेल सामना

दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये टेनिस स्टार सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती घेतली. आता ती हैदराबादमध्ये फेअरवेल सामना खेळणार आहे. सानिया मिर्झा आज अखेरचा निरोप सामना हैदराबादच्या लाल बहादूर स्टेडियमवर खेळणार आहे. मिर्झा म्हणाली, 'मी माझा शेवटचा टेनिस सामना खेळणार आहे, जिथे मी १८-२० वर्षांपूर्वी खेळायला सुरुवात केली होती. मी माझे सर्व मित्र, माझे कुटुंब आणि चाहत्यांसमोर शेवटचे खेळणार आहे.

07:43 March 05

सरकारी शाळेच्या गेटवर 'आय लव्ह मनीष सिसोदिया'चे बॅनर, दिल्ली पोलिसांनी दाखल केला गुन्हा

आपचे नेते मनिष सिसोदिया यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतरही दिल्लीत राजकीय वातावरण तापलेलेच आहे. अशातच दिल्ली पोलिसांनी आणखी एक कारवाई केली आहे. सरकारी शाळेच्या गेटवर 'आय लव्ह मनीष सिसोदिया' बॅनर लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

06:57 March 05

दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या लष्करी कवायती बंद करा-उत्तर कोरियाची मागणी

दक्षिण कोरिया-अमेरिकेच्या लष्करी कवायतीची उत्तर कोरियाने धास्ती घेतली आहे. या कवायती बंद करा, अशी मागणी उत्तर कोरियाने संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे.

06:48 March 05

भूमिगत पाइपलाइन फुटल्याने स्कूटीवरील महिला जखमी

यवतमाळमध्ये भूमिगत पाइपलाइन फुटल्याने रस्ता खचला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्कूटीवर बसलेली एक महिला जखमी झाली.

06:47 March 05

कचरा प्लांटला भीषण आग, घरीच राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

ब्रह्मपुरम कचरा प्लांटला भीषण आग लागली आहे. कोचीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धुरामुळे लोकांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे.

06:46 March 05

तुर्कस्थानमधील मृतांची संख्या 45,968 वर पोहोचली!

तुर्कस्थानला भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. सरकारी आकडेवारीनुसार भूकंपातील मृतांची संख्या 45,968 वर पोहोचली आहे.

06:25 March 05

Breaking News : मुंबई पोलीस दलातील महिलांसाठी महिला दिनानिमित्त खास भेट

मुंबई - घाटकोपर भटवाडी येथील एका घराची भिंत कोसळून आठ जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या घराचे बांधकाम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी एकाही व्यक्तीची प्रकृती गंभीर नसल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. घाटकोपर पश्चिम भटवाडी येथील आर बी कदम मार्गावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळली. तळ अधिक एक मजली असलेल्या घराच्या भिंतीखाली आठ जण अडकले होते. या अडकलेल्या आठ जणांना जवळच्या न्यू लाईफ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आठही जणांवरती उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दुर्घटनेत बबन भोर 69 वर्ष, निर्मला भोर 55 वर्ष, सुरेखा भोर 38 वर्ष, रिंकू कनोजीया 29 वर्ष, रहमत अली 24 वर्ष, बबलू चव्हाण 28 वर्ष, धर्मेंद्र चव्हाण 18 वर्ष, बजरंगी यादव ४५ वर्ष, अशी या जखमींची नावे आहेत. घराचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नाही.

Last Updated : Mar 5, 2023, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.