मुंबई - क्राईम ब्रँच युनिट 6 ने सांताक्रूझ परिसरातून पाच ड्रग्ज तस्करांना अटक केली. त्यांच्याकडून 49 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले.
Breaking News : क्राईम ब्रँच युनिट 6 ने सांताक्रूझ परिसरातून पाच ड्रग्ज तस्करांना केली अटक - ईटीव्ही भारत महाराष्ट्र लाईव्ह अपडेट
19:58 March 18
क्राईम ब्रँच युनिट 6 ने सांताक्रूझ परिसरातून पाच ड्रग्ज तस्करांना केली अटक
18:39 March 18
बालाघाटमध्ये महाराष्ट्रातून गेलेले प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, दोन्ही पायलट ठार
बालाघाट - येथे लांजी पोलीस ठाण्यांतर्गत लोडगी चौकी परिसरात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले आहे. या अपघातात विमानाचा पायलट आणि सहवैमानिकाचा मृत्यू झाला आहे. लांजी येथील भक्कू टोला या नक्षलग्रस्त गावात ही घटना घडली. या प्रशिक्षणार्थी विमानाने महाराष्ट्रातील बिरसी हवाई पट्टीवरून दुपारी 2 वाजता उड्डाण केले. त्यानंतर काही वेळातच विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, बालाघाटमधील लांजी आणि किरणापूर पोलीस स्टेशन हद्दीतील भक्कुटोलाच्या टेकडीवर हे विमान कोसळले आहे. या अपघातात महिला प्रशिक्षणार्थी पायलट रुक्षंका आणि प्रशिक्षक मोहित यांचा मृत्यू झाला आहे. गोंदियाचे एटीसी एजीएम कमलेश मेश्राम यांनी अपघात आणि मृतांच्या नावांना दुजोरा दिला आहे.
18:13 March 18
मुंबई हायकोर्टाची बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमाला परवानगी
मुंबई - बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा मीरा भायंदरमध्ये आज आणि उद्या कार्यक्रम होत आहे. त्यांच्या कार्यक्रमाला काँग्रेस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने विरोध केला आहे. या कार्यक्रमाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात त्यांचा कार्यक्रम होऊ नये यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी झाली आणि मुंबई हायकोर्टाने बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे.
17:25 March 18
भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइनचे उद्घाटन केले.
15:30 March 18
अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई सुरू
अमृतसर - पंजाब पोलिसांनी खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांवर कारवाई सुरू केली आहे. खलिस्तानी सहानुभूतीदार 'वारीस पंजाब दे' प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध राज्य पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने पंजाबच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा प्रतिबंधित केली आहे.
15:03 March 18
शितल मात्रे व्हिडिओ प्रकरण - शिवसेनेचे विभाग प्रमुख यशवंत विचले यांना न्यायालयीन कोठडी
मुंबई - शितल मात्रे व्हिडिओ प्रकरणात शिवसेनेचे विभाग प्रमुख यशवंत विचले यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता, त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली.
13:52 March 18
अभिनेता रजनीकांत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट
मुंबई - सुपरस्टार थलायवा अभिनेता रजनीकांत यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. ही कोणतीही राजकीय भेट नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सिम चाहते असणारे रजनीकांत कौटुंबिक नातेसंबधांमुळे सदिच्छा भेट घेण्यासाठी आले आहेत.
13:07 March 18
धीरेंद्र शास्त्री कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना मुंबई पोलिसांची नोटीस
मुंबई - मीरा रोड येथील बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना मीरा रोड पोलिसांनी CRPC कलम 149 अंतर्गत नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून तक्रार आल्यानंतर नोटीस पाठवली आहे. शास्त्री यांचा आज व उद्या मुंबईत कार्यक्रम आहे.
13:02 March 18
इम्रान खान यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान हे तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीच्या संदर्भात इस्लामाबादला जात असताना अपघात झाला आहे. हा अपघात त्यांच्या वाहनाला झाला नसून त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला झाला आहे.
12:46 March 18
अल्पवयीन मुलीवर बलात्कारच्या आरोपीची निर्दोष मुक्तता
ठाणे - अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील 24 वर्षीय तरुणाची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्तींनी हे सहमतीमधून संबंधाचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे. विशेष न्यायाधीश (POCSO) व्हीव्ही विरकर यांनी हा आदेश १५ मार्च रोजी दिला होता. तो आज हाती आला आहे. आपल्या शेजाऱ्यासोबत तुळजापूरला पळून गेल्याचा आणि तिच्याशी लग्न करेन असे आश्वासन देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी २०१४ मध्ये लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
12:43 March 18
लाच घेताना क्लार्कला रंगेहात अटक
ठाणे - एका क्लार्कला लाच मागितल्याप्रकरणी आणि त्याचा काही भाग घेतल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दिली आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेतील बाला जाधव (52) याने तक्रारदाराकडे 30,000 रुपयांची मागणी केली होती. ज्याने त्याच्या वडिलांनी तेथून VRS (स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना) घेतल्यावर नागरी संस्थेत नोकरीसाठी अर्ज केला होता, त्याच्या मान्यतेसाठी लाच मागितली होती, असे एसीबीने स्पष्ट केले.
12:38 March 18
रविवारी सीएसटी ते विद्याविहार स्टेशन दरम्यान मेगा ब्लॉक
मुंबई - मध्य रेल्वेवर प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी देखभालीची कामे केली जातात. उद्या रविवारी १९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्टेशन दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. तसेच कुर्ला येथील पुलावरील प्लेट गर्डर्सच्या कामासाठी आज शनिवारी रात्री रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे.
12:26 March 18
करौली देवीच्या दर्शनासाठी जाणारे 10 भाविक चंबळ नदीत गेले वाहून, 3 मृतदेह मिळाले
करौली - मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर मोठी दुर्घटना घडली आहे. करौली देवीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक चंबळ नदीत वाहून गेले. मध्यप्रदेशातील शिवपुरी येथून राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील कैलादेवीच्या दर्शनासाठी सुमारे 20 भाविक जात होते. यादरम्यान मंद्रयाळच्या रोहाई घाट चंबळ नदीत हा अपघात झाला. सध्या स्थानिक पाणबुड्यांच्या मदतीने 1 महिलेसह 3 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 11 जणांना वाचवण्यात यश आले आहे. इतरांचा शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
12:14 March 18
आदित्य ठाकरेंचे महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाबद्दल केंद्रिय मंत्र्यांना पत्र
मुंबई - केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांना महाराष्ट्राच्या बिघडत्या वायू प्रदूषणाच्या संकटाबद्दल शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहिले आहे. पूर्णवेळ पर्यावरण मंत्र्याची अनुपस्थिती आणि राज्याच्या बेकायदेशीर सरकारमधील सार्वजनिक समस्यांबद्दल संवेदनशीलतेचा अभाव यामुळे हे संकट अधिकच बिकट झाल आहे, कारण जमिनीवर कोणतीही कारवाई होत नाही. @mybmc ची स्टडी कमिटी आणि स्मॉग टॉवर्सची कृती ही केवळ त्याच्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
11:50 March 18
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या अधिकृत नाण्याचे अनावरण
नवी दिल्ली - येथील पुसा मधील ग्लोबल मिलेट्स कॉन्फरन्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्टल स्टॅम्प जारी केले. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 च्या अधिकृत नाण्याचे अनावरण केले.
11:07 March 18
किसान लाँग मार्च स्थगित, जेपी गावित यांची घोषणा
किसान लाँग मार्च स्थगित सातव्या दिवशी स्थगित झाला आहे. राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी जे. पी. गावित यांना दिले. त्यानंतर गावित यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करत सरकारचे आभार मानले आहेत.
10:48 March 18
गतीमंद असलेली 15 वर्षीय मुलगी गर्भवती, बलात्काराचा गुन्हा दाखल
पालघर जिल्ह्यात गतीमंद असलेली 15 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचे आढळल्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली.
10:46 March 18
इम्तियाज जलील नामांतराच्या निषेधार्थ सुरू असलेले घेणार मागे आंदोलन
औरंगाबादच्या नामांतराच्या निषेधार्थ सुरू असलेले आंदोलन रविवारी येथे होणाऱ्या रॅलीपूर्वी थांबवले जाईल, असे एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी सांगितले. शहरात जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा त्यांनी दावा केला.
10:03 March 18
माझ्या जागावाटपाच्या वक्तव्याचा विपर्यास काढण्यात आला- चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
2024 च्या निवडणुकीसाठी कोणताही फॉर्म्युला ठरला नाही. भाजप २४० जागा लढविणार आहे. भाजप-सेनाच्या जागावाटपाबाबत कोअर टीममध्ये कोणतीच चर्चा ठरली नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले.
09:42 March 18
शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांसंदर्भात समिती स्थापन, अजित नवलेंचे नाव वगळले
शेतकरी लाँगमार्चचा वाशिंदमध्ये मुक्काम आहे. राज्य सरकारकडून लेखीपत्र मिळाले नसल्याने आंदोलन पूर्णपणे स्थगित करण्यात आलेले नाही. सरकारने वाढता दबाव लक्षात घेऊन शेतकरी लाँगमार्चच्या मागण्यांसंदर्भात समिती स्थापन केली आहे. यामध्ये महाराष्ट्र किसान सभेचे अध्यक्ष अजित नवले यांचा समावेश नाही.
09:12 March 18
मुंबईत २७० कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा, काँग्रेसचा न्यायालयात जाण्याचा इशारा
मुंबईत रस्ते सुशोभीकरणाच्या नावाखाली २७० कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यावर कारवाई केली नाहीतर न्यायालयात जाण्याचा इशारादेखील काँग्रेने दिला आहे.
08:14 March 18
कात्रज नवीन बोगद्यातून मुंबईकडे जाणारी वाहतूक शनिवार, बुधवारी सहा तास राहणार बंद
सातारा - साताऱ्याकडून मुंबईकडे कात्रज नवीन बोगद्यातून जाणारी वाहतूक व्हीएमएस आणि व्हीएसडी सिस्टीम बसविण्यासाठी शनिवारी (दि. १८) आणि बुधवारी (दि. २३) रात्री ११ ते २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत या मार्गावरील वाहतूक जुना कात्रज बोगदा मार्ग कात्रज चौक, नवले पुल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरुन मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. मुंबईकडून सातान्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरू राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी दिली आहे.
08:12 March 18
हेलिकॉप्टर अपघातात वीरमरण आलेल्या लेफ्टनंट कर्नल विजय भानू रेड्डी यांना अखेरची श्रद्धांजली अर्पण
16 मार्च रोजी अरुणाचल प्रदेशात झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात लेफ्टनंट कर्नल विजय भानू रेड्डी यांना वीरमरण आले. हैदराबादमध्ये त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहण्यात आली. लेफ्टनंट कर्नल विजय भानू रेड्डी यांच्या वडिलांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहिली.
08:09 March 18
पुलवामाच्या मित्रीगाम भागात चकमक, सुरक्षा दलाची मोहिम सुरू
पुलवामाच्या मित्रीगाम भागात चकमक झाली. पोलीस आणि सुरक्षा दलाची मोहिम सुरू आहे.
08:03 March 18
अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धीरेंद्र शास्त्रींविरोधात पोलिसात तक्रार, दरबारसाठी शास्त्री मुंबईत दाखल
काल रात्री बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे शेकडो भाविकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. सर्वत्र जय श्री रामचा नारा लागला होता. धीरेंद्र शास्त्री हसत हसत आपल्या भक्तांचा अभिवादन स्वीकारत होते. गर्दी जास्त असल्याने विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला मोठी धडपड करावी लागली. मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड येथे 18 आणि 19 मार्च रोजी बागेश्वर बाबांच्या दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र विरोध केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
06:49 March 18
पुण्यात प्रथमच भारत-आफ्रिका चीफ कॉन्केव्ह, आफ्रिकेच्या २५ तुकड्या होणार सहभागी
पुण्यातील पहिल्या भारत-आफ्रिका चीफ कॉन्क्लेव्हमध्ये आफ्रिकेतील 25 जण सहभागी होणार आहेत.
06:49 March 18
अंधेरी परिसरातून 8 कोटी रुपये किमतीचे 15.743 किलो केटामाइन ड्रग जप्त
मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाने अंधेरी परिसरातून 8 कोटी रुपये किमतीचे 15.743 किलो केटामाइन ड्रग जप्त केले आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली. प्राथमिक तपासादरम्यान, हे अंमली पदार्थ तस्कर आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग असल्याचे आढळून आले. ते ड्रग्जचा पुरवठा करण्यासाठी मुंबईत आले होते. अटक करण्यात आलेले आरोपी औषधांसह कुरिअरद्वारे ऑस्ट्रेलिया आणि यूकेला अमली पदार्थ पाठवत असत. मुंबईतून दर आठवड्याला 10 किलो केटामाईन औषध पाठवले जात होते. ते गुजरातमधून ड्रग्ज आणायचे, ते औषधांनी पॅक करून परदेशात पाठवायचे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
06:49 March 18
शेतकरी हिंदू आहेत, त्यांना भाजप का वाचवित नाही- नाना पटोले
बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराजांचा अपमान केला आहे. काँग्रेस हिंदूंचा आदर करते. भाजप हिंदूंना समोर आणते जेव्हा त्यांची पापे बाहेर पडतात. आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, ते हिंदू आहेत, भाजप त्यांना का वाचवत नाही?, असा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
06:49 March 18
अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करणाऱ्या आरोप असलेल्या डिझाईनविरोधात खंडणीचे कलमही लागू
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नीला ब्लॅकमेल करणार्या डिझायनर अनिक्षाविरुद्ध कारवाईची व्याप्ती वाढली आहे. तिच्याविरोधात पोलिसांनी खंडणीचे कलम जोडले आहे.
06:49 March 18
जी 20 परिषदेसाठी नागपूरमध्ये आकर्षक सजावट
G20 शिखर परिषदेच्या C-20 बैठकीसाठी नागपूर शहरात आकर्षक सजावट करण्यात येत आहे. 20 ते 22 मार्च दरम्यान होणाऱ्या या परिषदेत G20 देश आणि इतर देशांमधील नागरी समाजाचे सुमारे 250 प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
06:23 March 18
लाँगमार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या लाँगमार्चमधील शेतकऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुडंलीक जाधव असे शेतकऱ्याचे नाव असून ते नाशिकवरून मोर्चात सामील झाले होते.
06:19 March 18
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची फेसबुकसह युट्युबवर पुन्हा एन्ट्री!
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. त्याला जबाबदार धरत डोनाल्ड ट्रम्प यांचे सोशल मीडिया अकाउंटवर कारवाई करत आली होती. त्यांचे फेसबुक अकाउंट पूर्ववत केल्यानंतर मी परत आलो आहे, असे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दोन वर्षांच्या बंदीनंतर ट्रम्प यांनी पहिली ही फेसबुक पोस्ट लिहिली. त्याचबरोबर त्यांचे युट्युब अकाउंटही पूर्ववत करण्यात आले आहे.
06:04 March 18
Maharashtra Breaking News : अधिवेशनाकरिता बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अंमलदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या अंमलदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. पोलीस हवालदार सुजित पवार असे मृत अंमलदाराचे नाव आहे. मुंबई पोलीस दलात वारंवार अशा घटना घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.