पुणे : पुण्यातील लोणी काळभोर मध्ये असलेल्याएमआयटी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या तरुण जॉर्डन पब्लीसियेस याने महाविद्यालयाच्या संकुलात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमकी ही आत्महत्या का केली?याचा पोलीस तपास करत आहेत.
Breaking News Live : पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाची आत्महत्या - रितेश देशमुख भूखंड वाटप
22:11 October 20
पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणाची आत्महत्या
20:25 October 20
खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ
खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ
जात पडताळणी प्रकरणात नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ
शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाकडून राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट
शिवडी न्यायालयाने राणा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते
मात्र या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने सदर वॉरंटला स्थगिती न दिल्याने कारवाई करण्याची शिवडी कोर्टाचे पोलिसांना निर्देश
या प्रकरणी पुढील सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी
खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ
19:40 October 20
सासूला गुन्ह्यात अडकविण्यासाठी जावयाने रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव
ठाणे - जावयाला दोन बायका असून सासूच्या कटकटीपाई दुसरी बायको घरातून निघून गेली. याच वादातून सासूला अपहरणाच्या गुन्ह्यात अडविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा जावयाने बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जावयासह चौघांवर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत. संदीप गायकवाड असेअटक केलेल्या जावयाचे नाव आहे. तर जावेद खान, आकाश अभंग, अवr पाटील असे अपहरण नाट्यात जावयाला मदत करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
19:07 October 20
आम्ही धर्माच्या नावावर आमचे हक्क मागतो - केरळ राज्यपाल
नागपूर - इंग्रजांच्या काळापासून आमची सवय आहे, आम्ही धर्माच्या नावावर आमचे हक्क मागतो. संविधान वाचले तर लक्षात येईल की अधिकार सर्व नागरिकांना आहेत. धर्माच्या नावावर स्वातंत्र्य आहे ते वैयक्तिक धर्माचरणाचे, अधिकार नाहीत, असे केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी म्हटले आहे.
17:34 October 20
आम्हाला सापत्न वागणूक का, योग्य बोनससाठी कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांचा मोर्चा
नवी मुंबई - आम्ही भारतीय रेल्वेचा भाग नाही का, मग आम्हाला सापत्न वागणूक का दिली जात आहे. भारतीय रेल्वे कर्मच्याऱ्यांप्रमाणे आम्हालाही बोनस मिळायला हवा. या मागणीसाठी सीबीडी येथील कोकण रेल्वे मुख्यालय आवारात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात 300 हून अधिक कर्मचारी, अधिकारी सहभागी झाले होते. कोकण रेल्वे कर्मचारी संघटना भारतीय रेल सेना तसेच अन्य सर्व संघटनानी एकत्रित आंदोलन करून बोनसची मागणी केली. सुमारे 78 दिवसाच्या पगाराइतका बोनस देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकांनी दिला.
17:22 October 20
अंमली पदार्थाच्या नशेत युवक चढला स्कायवॉकवर
मुंबई - मुंबईतील स्कायवॉकच्या छतावर 24 वर्षीय व्यक्ती बुधवारी अंमली पदार्थांच्या नशेत चढला, असे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सकाळपासूनच्या नाट्यमय फुटेजमध्ये त्या व्यक्तीला अधिकाऱ्यांनी नाना चौकातील स्कायवॉकवरून खाली उतरण्यास प्रवृत्त करताना दिसले.
16:53 October 20
बळीराजा खचू नको, शासन आहे पाठीशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
मुंबई - सध्या राज्यात परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने संकटाला सामोरे जा. शासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज दिली.
16:40 October 20
जवानांनी 10 किलोचा पाइप बॉम्ब केला जप्त
छत्तीसगड - कोयालीबेडा पोलिस स्टेशन हद्दीतील अंतागड-टेकपानी गावात सुरक्षा दलाच्या जवानांनी 10 किलोचा पाइप बॉम्ब जप्त केला आहे. जवानांनी पाईप बॉम्ब घटनास्थळीच निकामी केला, असे अंतागड एसडीओपी अमर सिदार यांनी सांगितले.
16:27 October 20
पुण्यात ओके भाईकडून गावठी बनावटीच्या पिस्तुलसह ५ काडतुसे जप्त
पुणे - रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल व ५ काडतुसे व 2 तलवारी जप्त करण्यात आल्या. वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी ही कारवाई केली आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार ओके भाई यास त्याच्या साथीदारासह जेरबंद करण्यात वानवडी पोलीसांना मोठे यश आले आहे. यावेळी गावठी पिस्तूल, जीवंत काडतुसे व धारधार घातक हत्यारे हस्तगत करण्यात आली आहेत. ओके भाई ऊर्फ ओमकार चंद्रशेखर कापरे, रा. कोंढवा खुर्द, असे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
16:12 October 20
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू
मुंबई - राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू. अनिल देशमुख यांची अँजिओग्राफी टेस्ट करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या चाचणीवरील रिपोर्ट दोन दिवसात येणार आहेत. अनिल देशमुख यांना खासगी रुग्णालयात उपचार करण्याची मुंबई सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.
15:37 October 20
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची राज ठाकरे यांची मागणी
मुंबई - ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात. तसेच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा, असे पत्र मनसे नेते राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
15:32 October 20
बलात्कारी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम सिंगच्या सत्संगाला भाजप नेत्यांची उपस्थिती
कर्नाल - बलात्कारी डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहिम सिंग याच्या सत्संगाला भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे खळबळ माजली आहे. बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या राम रहीमची 40 दिवसांच्या पॅरोलवर सुनारिया तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. याच काळात त्याने ऑनलाईन सत्संग घेतला. त्याला अनेक भाजप नेते उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
15:11 October 20
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा आता १५ लाख
मुंबई - अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्याज परतावा योजनेची मर्यादा आता १५ लाख रुपये करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याची माहिती दिली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
14:53 October 20
फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, लहान मुलासह चार जणांचा मृत्यू
मोरेना (मध्यप्रदेश) : शहरातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या भीषण अपघातात संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. या दुर्घटनेत एका लहान मुलासह चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटना जैतपूर रोडची आहे. दिवाळीच्या सणासाठी फटाके बनवण्याचा कारखाना बांधला जात होता. असे असतानाच स्फोट झाला.
14:44 October 20
बेपत्ता संजय पिराजी निर्मळ यांचा मृतदेह सापडला
जालना - संजय पिराजी निर्मळ हे गेल्या काही दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये हरवल्याची नोंद करण्यात आली होती. आज दुपारच्या सुमारास सिंदखेडराजा रोडच्या बाजूला रस्त्याच्याखाली मृतदेह सापडला. पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी करत आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता.
14:39 October 20
ढामऱ्या नाल्यात वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वरास युवकांनी वाचवले
अहमदनगर - ढामऱ्या नाल्यात वाहून जाणाऱ्या दुचाकी स्वरास युवकांनी वाचवले. मात्र ही दुचाकी वाहून गेली आहे. पुराच्या पाण्यात दुचाकीसह एकजण वाहून जात असल्याचे दिसले. त्यावेळी प्रसंगावधान राखून काहीजणांनी पाण्यात उड्या मारून वाहून जाणाऱ्यास वाचवले. मात्र दुचाकी वाहून गेली.
14:15 October 20
मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आले निर्णय
नीति आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इस्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्र स्थापन करणार. शासनाला दर्जेदार सल्ला व धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट- ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड पदभरतीसाठी परीक्षा टीसीएस, आयबीपीएस घेणार. या माध्यमातून 75 हजार पदे भरण्याचा मार्ग सुकर
ऐच्छिकरित्या वाहनांचे स्क्रॅपिंग करणाऱ्यांना व्याज व दंडमाफ करणार. भंगार स्थितीतील वाहनांचा प्रश्न सुटणार.
5 जी तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा वेगाने वाढविण्यासाठी दूरसंचार पायाभूत सुविधा धोरण
मराठवाडा, विदर्भ,उत्तर महाराष्ट्रात अल्पसंख्याक महिलांचे 2800 बचत गट निर्माण करणार. 1500 महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण.
भू विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. एकूण 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी. भूविकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार
महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (MAGNET) संस्थेस अनुदान स्वरुपात निधी देणार. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे शक्य
राजकीय आणि सामाजिक आंदोलनातील 30 जून 2022 पर्यंतचे खटले आता मागे घेणार.
माहिती तंत्रज्ञान तज्ञ विभागातील राजपत्रित पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेतून वगळणार
बुलडाणा जिल्ह्यातील अरकचेरी आणि आलेवाडी बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता. 1918 हेक्टर जमिनीला सिंचनाचा फायदा
राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनीचे भागभांडवल 311 कोटी करणार.
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 200 कोटींची तात्पूरती वाढ करण्याचा निर्णय.
1250 मे टन प्रतिदिन गाळप क्षमता 2500 मे.टन पर्यंत वाढविण्यासाठी शासकीय भागभांडवल देणार.
13:40 October 20
नोकरीचे आमिष दाखवणार्या कनिष्ठ अभियंत्याचे तडकाफडकी निलंबन
पुणे - पुणे महापालिकेच्या पदभरतीत सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील सूरज पवार या कनिष्ठ अभियंत्याचे तडकाफडकी निलंबन करून चौकशी सुरू करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंत्याने उमेदवारांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांनी यासंबंधीचे आदेश काढले आहेत.
13:09 October 20
सुप्रिया सुळे यांनाही पावसाचा फटका, रस्त्यावर उतरून केली वाहतूक सुरळीत
पुणे - दोन दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने थैमान घातले होते. त्यानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर काल रात्री पुन्हा झालेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक पुणेकरांना बसला आहे. शहरात काल रात्रीच्या पावसाने अनेक भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळेवाडी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने याचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांनाही बसला. त्यांनी गाडीतून उतरुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.
12:59 October 20
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू
मुंबई - अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू. 100 कोटी वसुली प्रकरणी सीबीआय केसमध्ये देशमुख यांनी जामिनासाठी केला आहे. न्यायाधीशांनी अनिल देशमुख हजर का झाले नाही अशी विचारणा केली. ते रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती देशमुख यांच्या वकिलांनी कोर्टत दिली.
12:01 October 20
दिवाळीच्या न्यायालयीन सुट्ट्यांविरोधातील जनहित याचिकांवर दिवाळीनंतर सुनावणी
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर न्यायालयात दीर्घ सुट्ट्या घेण्याच्या प्रथेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी केली जाईल. यामुळे खटले दाखल करणे आणि सुनावणीवर परिणाम होतो. उच्च न्यायालयाची दिवाळी सुटी 22 ऑक्टोबरपासून असून ती 9 नोव्हेंबरला न्यायालये पुन्हा सुरू होणार आहेत.
11:33 October 20
राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, मंत्रिमंडळ विस्तारावर खलबत होणार
मुंबई - राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक बोलवण्यात आली आहे. बैठकीत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसान, दिवाळीच्या तोंडावर शंभर रुपयांत दिल्या जाणाऱ्या भेट वस्तूंचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली जाणार असून नाराजांची विविध महामंडळावर बोलवण करण्याबाबत खलबत होणार आहेत.
10:54 October 20
आज सकाळी 10.26 वाजता गुजरातमध्ये झाला भूकंप
आज सकाळी 10.26 वाजता सुरत, गुजरात, भारताच्या 61km एसईवर 3.5 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 7 किमी होती, असे नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने म्हटले आहे.
10:13 October 20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँटोनियो गुटेरेस यांची घेतली भेट
केवडिया येथील एकता नगर येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली.
10:06 October 20
पीएफआयचे पनवेल येथून चार जणांना अटक, ही आहेत आरोपींची नावे
पीएफआयचे पनवेल येथून अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची नावे समोर आली आहेत. पीएफआय पनवेलचे सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद यांच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि तन्वीर हमीद खान अशी आरोपींची नावे आहेत.
09:39 October 20
पनवेलच्या सचिवासह आणखी तीन जणांना पहाटे चारच्या सुमारास अटक
पीएफआय पनवेलच्या सचिवासह आणखी तीन जणांना पहाटे रात्री चारच्या सुमारास अटक करण्यात आली. काळाचौकी मुंबई पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
09:31 October 20
पावसामुळे मिरची व्यापाऱ्यांना दीड ते दोन कोटींचा आर्थिक फटका
नंदुरबार - राज्यात मिरची उत्पादनात अग्रेसर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीलाच परतीच्या पावसाने मोठा झटका दिला आहे. हंगाम सुरू होऊन काही दिवस झाले असतानाच परतीच्या पावसामुळे सुमारे २० ते २२ हजार क्विंटल मिरचीचे नुकसान झाले असून दीड ते दोन कोटींचा आर्थिक फटका व्यापाऱ्यांना बसला आहे. यंदा मिरचीचे भाव गगनाला पोहोचण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.
08:51 October 20
काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू
आंध्र प्रदेशातील कुर्नूलमधील बनवासी गावातून काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली आहे.
08:01 October 20
पीएफआय पनवेल सचिव आणि इतर 2 सदस्यांना एटीएसने केली अटक
महाराष्ट्र एटीएसने पीएफआय पनवेल सचिव आणि बंदी घातलेल्या संघटनेच्या इतर 2 सदस्यांना पनवेलमध्ये त्यांच्या बैठकीची माहिती मिळाल्यानंतर अटक केली. दहशतवाद विरोधी पथक या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहे.
07:47 October 20
जकार्तामध्ये आग लागल्याने मशीदचा घुमट कोसळला
जकार्तामधील इस्लामिक सेंटर ग्रँड मशीदचा विशाल घुमट आग लागल्यानंतर कोसळला आहे.
07:19 October 20
शिर्सूफळच्या माजी सरपंच, उपसरपंचावर फसवणूकीसह सावकारीचा गुन्हा
बारामती- पतीला वैद्यकीय उपचारासाठी खर्च झाल्याने अडचणीत आलेल्या महिलेला फसविण्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेला व्याजाने पैसे देत तिचे रो हाऊस खरेदी खताद्वारे घेत फसवणूक केल्या प्रकरणी शिर्सूफळच्या माजी सरपंच, उपसरपंचासह पाचजणांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसणूकीसह सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06:52 October 20
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिशन लाइफ लाँच करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधील केवडिया येथे मिशन लाइफ लाँच करणार आहेत. केवडियातील 10व्या मिशन प्रमुखांच्या परिषदेत पंतप्रधान सहभागी होतील.
06:41 October 20
Breaking News मंत्रिमंडळ बैठकीत हे घेण्यात आले निर्णय
मुंबई- राज्यात भूखंड वाटपातील अनियमतेत आता नवे प्रकरण समोर आले आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया देशमुख यांनी अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत 'देश ॲग्रो' या कृषी प्रक्रिया आधारित उद्योगासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंड वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप लातूरमधील भाजप नेत्यांनी केला आहे. मात्र, हे वाटप नियमानुसारच झाले असल्याचा दावा रितेश देशमुखच्या कंपनीने केला आहे.