सेन्सेक्सने 53,500 चा विक्रमी आकडा पार केला आहे. सध्या 558.41 गुणांच्या वाढीसह 53,509.04 वर व्यापार केला जात आहे.
Maharashtra Big Breaking : शरद पवार आणि अमित शहा दोघांमध्ये थोड्याच वेळात होणार बैठक
14:09 August 03
13:17 August 03
राष्ट्रवादीचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात थोड्याच वेळात नवी दिल्लीत बैठक होणार आहे.
12:13 August 03
मुंबई - जी नियमावली जाहीर झाली त्यात सगळ्यांचा विचार घेण्यात आला. मुंबईला 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या प्रस्तावानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकल ट्रेनसाठी चर्चा सुरू आहे. रुग्णाची संख्या वाढू नये, म्हणून सरकारचे प्रयत्न आहेत. लोकलचा निर्णय पुढील चर्चा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लोकलच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटले नाही. मात्र, हा निर्णय होल्डवर आहे. लोकल सुरू करण्यासाठी सर्व बाबींचा विचार होत आहे. मंदिरांवर असलेली स्थगिती अजूनही आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या अधिक आहे तिथे सगळे प्रोटोकॉल पाळले जात आहेत. तसेच तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. झिका व्हायरसचा एक रुग्ण पुण्यातील पुरंदर येथे आढळला आहे. त्याचा प्रसार होऊ नये म्हणून त्या त्या भागात उपाय योजना केल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
11:39 August 03
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी चौकशीसाठी बोलावले होते. आमचा अनिल देशमुखांशी संपर्क होत नाही आहे, असे ईडीने म्हटले आहे. आम्हाला माहिती नाही, ते कुठे आहेत. त्यांचे निश्चित ठिकाण माहिती नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशावर नजर ठेवून आहोत. आम्हाला आशा आहे की, ते आदेशानंतर तपासकार्यात ईडीला सहकार्य करतील, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.
11:37 August 03
नाशिक - राज्यात सगळे व्यवहार सुरु करत असताना फक्त मंदिरांचाच निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा मारला जातो, अशी टीका भाजपच्या आचार्य तुषार भोसलेंनी केला आहे. लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारे उघडा, अशी मागणी सरकारकडे त्यांनी केली. तसेच जेव्हा जेव्हा नवी नियमावली तयार होते तेव्हा तेव्हा जाणीवपूर्वक मंदिरांवर बंदी कायम केली जाते.
येणाऱ्या पाच दिवसांत आमचा पवित्र असा श्रावण महिना सुरू होत आहे. म्हणुन आमची राज्य सरकारकडे मागणी आहे की किमान लसीकरण झालेल्या भक्तांसाठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिराची दारे उघडा, मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या लाखो लोकांना जगू द्या, असेही ते म्हणाले.
11:36 August 03
नागपूर - कॉंग्रेसचे पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी ओबीसी आरक्षणा संदर्भात सेनेचे भूमिका संदिग्ध आहे. तेच राष्ट्रवादीची भूमिका स्पष्टपणे ओबीसीविरोधी असल्याचे आरोप केला आहे. यावर महाविकास आघाडीत झारीचा शुक्राचार्य आहे ज्यांना ओबीसीना आरक्षण मिळू द्यायचे नाही, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. यामुळे जनतेचा फुटबॉल करू नका. डिसेंबरपर्यंत इंपेरिकल डाटा तयार करा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला.
10:25 August 03
नाशिक - नवीन बिटको कोविड रुग्णालयाची वाहनाने तोडफोड करणाऱ्या राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे अखेर पोलिसांना शरण आला आहे. त्याने नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
09:25 August 03
औरंगाबाद - गंगापूर तालुक्यातील शिंगी येथे रात्री चोरीची घटना घडली. या घटनेदरम्यान, चोरांनी घरातील दोघांना जबर मारहाण केली. जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चोरांनी या घटनेदरम्यान, रोख रक्कम, सोने, गाडी लंपास केले आहे.
08:46 August 03
भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपांत्य फेरीत बेल्जियमकडून 5-2 ने पराभव झाला आहे.
08:07 August 03
पुणे शहराची पॉझिटिव्हीटी ४ टक्क्यांच्या आत असतानाही लेव्हल ३ चे निर्बंध कायम ठेवणे, हा पुणेकरांवर अन्याय आहे. मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? शहरात सलग महिनाभर पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली नोंदवला गेला आहे. असे असतानाही मुंबईला एक न्याय आणि पुण्याला वेगळा न्याय का? असा प्रश्न पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
07:32 August 03
सांगोला मालट्रक-ओमनी अपघात
सांगोला (सोलापूर) - तालुक्यातील सांगोला-मिरज रस्त्यावर करांडे वाडी फाट्याजवळ मालट्रक व ओमनी गाडीमध्ये भीषण अपघात झाला. यात ओमनी कार चालकासह दोन लहान मुलींचा जागीच मृत्यू झाला. तर या दुर्घटनेत 13 जण जखमी झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर मालट्रक चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.