मुंबई : दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकांचा वैयक्तिक डेटा वेबसाइटद्वारे विकल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू : रवींद्र साळोंके, वरिष्ठ पीआय, गुन्हे शाखा
Marathi Breaking News : लोकांचा वैयक्तिक डेटा वेबसाइटद्वारे विकल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक - Etv Bharat marathi news
22:50 November 25
लोकांचा वैयक्तिक डेटा वेबसाइटद्वारे विकल्याप्रकरणी दोन संशयितांना अटक
21:43 November 25
अवकाळी पावसामुळे महामार्गावर गुडघाभर पाणी; वाहनांच्या लागल्या रांगा
सातारा - कराड तालुक्यातील उंब्रज परिसराला शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार तडका दिला. सुमारे पाऊन तास मुसळधार पावसाने झोडपल्याने महामार्गावर गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे शिवडे गावच्या हद्दीत महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गेल्या दोन दिवसांपासून कराड परिसरात ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली आहे. शुक्रवारी सायंकाळी अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले.
17:40 November 25
सिद्धू मुसेवाला हत्याकांड : गँगस्टर दीपक टिनूला चार दिवसांची पोलीस कोठडी
पंजाब | सिद्धू मुसेवाला हत्येमध्ये कथितरित्या सहभागी असलेल्या लॉरेन्स बिश्नोई-गोल्डी ब्रार टोळीचा सदस्य दीपक टिनू याला आज मोहाली येथील न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
17:39 November 25
स्मृती इरानींचा आम आदमी पक्षाचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर निशाणा
माझी महिलांना विनंती आहे की, आम आदमी पक्षाचा कोणताही नेता किंवा कार्यकर्ता त्यांना भेटला तर त्यांना विचारा की, तिहार तुरुंगात बंद असलेले त्यांचे मंत्री अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यांकडून सेवा घेत आहेत, अशी त्यांची संस्कृती काय आहे: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, सुरत
17:38 November 25
अयोध्येतील राम मंदिराचे काम प्रगतीपथावर
अयोध्या, उत्तर प्रदेश | अयोध्येत गर्भगृह आणि तळमजल्यावर पाच मंडप असलेल्या राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे. मंदिराची एकूण उंची जमिनीपासून १६१ फूट आहे: बांधकाम समिती, श्री राम मंदिर
17:37 November 25
सुप्रीम कोर्टात सुमारे 3000 हस्तांतरण याचिका प्रलंबित
येत्या आठवड्यापासून, सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक खंडपीठात 10 जामीन अर्जांवर सुनावणी होईल, त्याआधी 10 हस्तांतरण याचिकांवर सुनावणी होईल. सुप्रीम कोर्टात सुमारे 3000 हस्तांतरण याचिका प्रलंबित आहेत: दिल्लीतील संविधान दिनाच्या समारंभात CJI DY चंद्रचूड
17:37 November 25
खड्डे चुकवण्याचा नादात स्कूल बस आणि ट्रकची धडक
नंदुरबार - नंदुरबार शहरातील धुळे चौफुली नजिक खड्डे चुकाविण्याचा नादात ट्रकने स्कूल बसला धडक दिली यात स्कूलबस चालक किरकोळ जखमी झाला आहे तर काही मुले किरकोळ जखमी झाले आहेत. स्कूल बस मध्ये सुमारे 50 विद्यार्थी असल्याची माहिती चालकाने दिली आहे.Body:सुदैवाने विद्यार्थ्यांना दुखापत नाही...
16:27 November 25
तेलंगणात काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश
दिल्ली | सनाथनगर, तेलंगणाचे चार वेळा आमदार असलेले एम शशिधर रेड्डी, ज्यांनी अलीकडेच काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आणि सर्बानंद सोनोवाल आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
16:22 November 25
कर्नाटकातल्या 'त्या' गावातील लोकांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा..
मुंबई : कर्नाटकशी आमचा कोणताही वाद नाही, त्या गावांमध्ये राहणारे लोक महाराष्ट्रात सामील होऊ इच्छितात. महागुव आणि भाजप स्पोक्स सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजीचा अपमान केला, म्हणूनच त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि एक इंचही राज्य देणार नाही : संजय राऊत
16:17 November 25
आदर पूनावाला असल्याचे भासवत फसवणूक केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक
महाराष्ट्र | सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पूनावाला म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांच्या सायबर युनिटने तीन आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी फरार : पोलीस
16:14 November 25
उरणच्या कंपनीमध्ये 100 जणांसह आयकर विभागाचा छापा
उरण :
येथील नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गेटवे डिस्ट्रिपार्कस् लिमिटेड ( जीडीएल ) या कंपनीवर इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. सुमारे १०० अधिकारी, कर्मचारी सुरक्षा यंत्रणांसह सकाळी ११ वाजल्यापासून गेट बंद करून, कागदपत्रं व कंपनीच्या आर्थिक उलाढालीची कसुन तपासणी यावेळी करण्यात आली आहे. संबंधित कारवाई ही गुप्त कारवाई असल्याचे सांगण्यात आले आहे. एकंदरीत या कारवाई नंतर उरण तालुक्यातील कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे बोलण्यात येत आहे.
16:08 November 25
पंढरपूर कॉरिडॉरला व्यापारी अन् नागरिकांचा मोठा विरोध.. आंदोलन सुरु
वाराणसी आणि उज्जैनच्या धरतीवर पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरचा विकास करण्यासाठी पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे.या कॉरिडॉर आणि विकास आराखड्याला स्थानिक नागरिकांचा टोकाचा विरोध होताना दिसत आहे. शासनाकडून हा विकास आराखडा राबवण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे. आज शुक्रवार (दि.25)रोजी सकाळपासून विठ्ठल मंदिराच्या पश्चिम द्वारसमोर शेकडो व्यापारी आणि परिसरातील नागरिकांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
16:06 November 25
मुख्यमंत्र्यांसह 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जातील
जळगाव : निवडणूक असल्याने याबाबत मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली असून त्यामुळे मी गुवाहाटी ला जाणार नसून आमचे बाकीचे आमदार जाणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले तसेच मुख्यमंत्र्यांसह 40 रेडे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात असल्याचे म्हणत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
16:01 November 25
अतिप्रसंगाला विरोध करणाऱ्या विवाहितेला पेटवून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
जळगाव ब्रेकींग-
महिलेले विरोध केल्याने अतिप्रसंग करणाऱ्या अज्ञाताने महिलेला जिवंत जाऊन ठार मारण्याचा केला प्रयत्न
जखमी व भाजलेल्या अवस्थेत आढळून आली पीडित महिला
महिलेला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले असून महिलेची प्रकृती ठीक असल्याची पोलीस सूत्रांची माहिती
सदर घटनेने जिल्ह्यात खळबळ, तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी केली पाहणी
पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न सुरू
15:56 November 25
आफताबला फाशी द्या.. खटला जलदगती न्यायालयात चालवा : अजित पवारांची मागणी
मुंबई :
आफताबवर 2020 मध्ये मुंबई पोलिसांकडे तक्रार होती. एकमेकांना दोष देण्याऐवजी पोलीस अधिकारी किंवा कर्मचार्यांनी कर्तव्यात कसूर केली तर त्यांना चौकशीअंती शिक्षा होईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा: श्रद्धा हत्येप्रकरणी महाराष्ट्र विरोधीपक्षनेते अजित पवार
अशा जघन्य गुन्ह्यासाठी फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी कोणतीही शिक्षा नाही, असा संदेश समाजाला द्यायला हवा. त्याला फाशी द्यावी.
15:54 November 25
भाजप नेते सुवेंदू अधिकारी ममता बॅनर्जींच्या भेटीला..
कोलकाता, पश्चिम बंगाल | मी आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी 3-4 मिनिटांची सौजन्यपूर्ण भेट घेतली. नंदीग्राममधून निवडणूक लढवणे हा ममता (बॅनर्जी) जींविरुद्धचा वैयक्तिक लढा नव्हता, तर राजकीय आणि वैचारिक लढा होताः भाजप नेते सुवेंदू अधिकारी
15:39 November 25
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्पपत्राचे विमोचन
दिल्ली | केंद्रीय मंत्री पियुष गोयल, प्रदेश भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता आणि LoP रामवीर सिंह बिधुरी आणि खासदारांनी MCD निवडणुकीसाठी भाजपचे 'संकल्प पत्र' लॉन्च केले
15:37 November 25
दिल्लीचे मंत्री जैन यांना हवंय तुरुंगात घरच जेवण.. उद्या सुनावणी
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने तुरुंगात बंद आम आदमी पार्टीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या जेवणाच्या याचिकेवरील आदेश पुढे ढकलला. उद्या दुपारी 2 वाजता आदेश पारित होईल.
15:37 November 25
केरळ स्टुडंट्स युनियनकडून मोठा निषेध मोर्चा
केरळ स्टुडंट्स युनियन (KSU) ने तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनवर निषेध मोर्चा काढला आणि महापौर आर्य राजेंद्रन यांनी सीपीआयएमचे जिल्हा सचिव अनवर नागप्पन यांना तात्पुरत्या पदांवर नियुक्त केलेल्या पक्षाच्या लोकांची यादी मागितल्याबद्दल त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
15:34 November 25
कोकणातील रिफायनरीला भाजपचे समर्थन.. विरोध केला तर... चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
रिफायनरी प्रकल्प ज्या ठिकाणी ठरेल, त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पाला भाजपा पूर्णपणे संघटनात्मक समर्थन करेल आणि कोणी विरोध केला तर समोर संघटनाही उभी करू. जर इच्छाशक्ती असेल तर जनतेचा विरोध हा संपवता येतो, असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे, ते आज रत्नागिरीत बोलत होते.
15:34 November 25
भयग्रस्त भाजपाचा खोटारडेपाणा- अतुल लोंढे
कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या गेल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हारय होतो आहे. मात्र, यात कुठलेही तथ्य़ नसून राहूल गांधी यांच्या या्त्रेमुळे घाबरलेल्या भाजपाने व्हिडिओत छेडछाड करून खोटा प्रचार सुरू केला असल्याचा आरोप कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.
15:28 November 25
श्रद्धा वालकरचा मित्र रजत शुक्ला दिल्ली पोलिसांनी बोलावले
वसई:
- दिल्लीत क्रूर हत्या झालेल्या श्रद्धा वाळकर हिच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत...
- श्रद्धा हत्याकांड प्रकरणात श्रद्धाचा मित्र रजत शुक्ला याला दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले असून रजतने सांगितले कि श्रद्धाला न्याय देण्यासाठी देश माझ्या सोबत आहे.
- श्रद्धा बाबत अनेक बाबी माहित आहेत तिला न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. अफताब चे आई वडील फरार असल्याने या हत्याकांडात ते सुद्धा सामील असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
15:24 November 25
आनंद तेलतुंबडेना जामीन देण्याविरोधात एनआयएची याचिका फेटाळली
नवी दिल्ली: एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणात विद्वान-कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांना मिळालेल्या जामीनाविरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली.
मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की ते तेलतुंबडेला जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करणार नाही.
15:22 November 25
भाजपाच्या नगरसेवकावर भररस्त्यात जीवघेणा हल्ला
ठाणे : भिवंडी कल्याण मार्गवरील लाहोटी कंपाऊंड परिसरात भाजपा नगरसेवक नित्यानंद नाडर यांच्यावर २० ते २५ जणांच्या हल्लेखोर टोळीने भररस्त्यात कार अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
15:16 November 25
सीमावाद पेटला; शिवसेनेकडून कर्नाटक बसेस वर जय महाराष्ट्र लिहत वाहतूक बंद करण्याचा दिला इशारा
सध्या सीमा प्रश्न चांगलाच पेटला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटीना बंदी घातल्याची बातमी कळताच कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अचानक मोर्चा काढण्यात आला आहे. कर्नाटकच्या बसेस ना कोल्हापुरात प्रवेश देऊ नका या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आंदोलकांनी कर्नाटकच्या बसेस वर जय महाराष्ट्र लिहीत बोम्मई यांचा निषेध केला...
15:00 November 25
India Vs New Zealand: न्यूझीलंडने भारतावर ७ गडी राखून मिळवला विजय
ऑकलंडच्या ईडन पार्कवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने भारतावर ७ गडी राखून विजय मिळवला.
14:59 November 25
परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांची 11 आफ्रिकन देशांच्या शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक
दिल्ली | परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी 11 आफ्रिकन देशांच्या शिक्षण मंत्र्यांसोबत बैठक घेतली
14:58 November 25
ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या.. आरोपीला ३० नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी
नवी दिल्ली : दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने हत्येचा आरोपी राजविंदर सिंगला 30 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला 2018 मध्ये ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली होती.
14:54 November 25
उत्तर-पश्चिम चीनच्या शिनजियांग प्रांतात अपार्टमेंटला लागलेल्या आगीत 10 ठार, 9 जखमी

बीजिंग: उत्तर-पश्चिम चीनच्या शिनजियांग उईगुर स्वायत्त प्रदेशात एका उच्चभ्रू निवासी इमारतीला लागलेल्या आगीत किमान 10 लोक ठार आणि नऊ जण जखमी झाले, त्यानंतर मध्य चीनमध्ये आणखी एका आगीत 38 जणांचा मृत्यू झाला.
शिनजियांग प्रांताची राजधानी उरुमकी येथील तियानशान जिल्ह्यातील समुदायातील एका निवासी इमारतीला गुरुवारी रात्री आग लागली.
14:44 November 25
शिवसेना नेते संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायाधीशांचा नकार
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या जामीन रद्द करणारी ईडीची याचिकावर सुनावणी घेण्यास न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांचा नकार
दुसऱ्या खंडपीठांसमोर दाद मागण्याचे ईडीला निर्देश
14:18 November 25
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक; काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
कोल्हापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील जत आणि सोलापूर जिल्ह्यावर केलेल्या दाव्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने कोल्हापुरात प्रतीकात्मक अंतयात्रा काढत निषेध नोंदवला. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती नाला अशी काढण्यात येत होती.
13:49 November 25
मागणी झाली कमी.. सोन्याच्या भावामध्ये मोठी घसरण
नवी दिल्ली: सट्टेबाजांनी आपली स्थिती कमी केल्याने शुक्रवारी सोन्याचा भाव 154 रुपयांनी घसरून 52,517 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये डिसेंबर डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १५४ रुपयांनी किंवा ०.२९ टक्क्यांनी घसरून ५२,५१७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीचे श्रेय स्पर्धकांनी कमी केल्यामुळे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
जागतिक पातळीवर, न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.43 टक्क्यांनी वाढून USD 1,767.90 प्रति औंस झाला.
13:38 November 25
माओवाद्यांचा प्लॅन फसला.. झारखंडमध्ये माओवाद्यांनी पेरलेले आयईडी जप्त
लातेहार (झारखंड): सुरक्षा कर्मचार्यांनी झारखंडच्या लातेहार जिल्ह्यातील बुडापहाड येथून बंदी घातलेल्या सीपीआय (माओवाद्यांनी) पेरून ठेवल्याचा संशय असलेल्या 12 सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) जप्त केली आहेत, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले.
छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेले बुडापहाड हे बेकायदेशीर सीपीआय (माओवाद्यांचे अड्डे) मानले जाते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
13:29 November 25
संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट.. राज्यपालांना हटवण्यासाठी महाविकास आघाडीकडून बंदची हाक
संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट
राज्यपाल यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडी कडून पुकारण्यात येईल
याबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट
राज्यपालांना पदावरून हटवण्यात यावं महाविकास आघाडीची मागणी - राऊत
13:21 November 25
दिल्ली दारू घोटाळा: सीबीआयकडून आम आदमी पक्षाच्या नेत्यांविरोधात दोषारोपपत्र दाखल
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने दिल्ली मद्य धोरण प्रकरणी आम आदमी पार्टीचे विजय नायर, अभिषेक बोईनपल्ली आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. राऊस अॅव्हेन्यू कोर्टात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एम के नागपाल यांच्यासमोर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी 2 वाजता प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
13:05 November 25
जम्मू काश्मिरात बसमध्ये सापडली संशयास्पद बॅग.. पोलिसांकडून तपासणी सुरु
जम्मू काश्मीर | रामबन येथील नाश्री नाक्याजवळ एका बसमध्ये संशयास्पद पॉलिथिन बॅग आढळून आली आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे: J&K पोलीस
12:57 November 25
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी.. सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
विशेष विवाह कायद्यांतर्गत समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळावी यासाठी समलिंगी जोडप्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे.
12:56 November 25
तरुणाला मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
मुंबई : जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील तरुण अनंत करमुसे या तरुणाला २०२० साली मारहाण केल्याच्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी आता अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. कारण या प्रकरणाचा तपास आता सीबीआय कडे देण्यात यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात तरुणाने केली आहे.
12:52 November 25
१५ वर्षीय मुलीवर बलात्कार करून फोटो टाकले फेसबुक, इंस्टाग्रामवर.. शाळेत जातानाच नेले होते उचलून
बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एका 15 वर्षीय मुलीवर दोन मुलांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे, त्यांनी या घटनेचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
पहासू पोलिस ठाण्यात तिच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार, बुधवारी शाळेत जात असताना मुलांनी तिला उचलून अज्ञात ठिकाणी नेले.
संशयितांनी तरुणीवर बलात्कार करून तिचे फोटो फेसबुक आणि इंस्टाग्रामवर टाकले. मुलीला संध्याकाळी घराजवळ सोडण्यात आले, असा आरोप तिच्या भावाने केला.
12:43 November 25
अमिताभ बच्चन यांचा आवाज, फोटो वापरण्यास न्यायालयाकडून बंदी
अमिताभ बच्चन यांचा आवाज, प्रतिमा यांच्या अनधिकृत वापरावर न्यायालयाने बंदी घातली आहे
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (पीटीआय) दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज, प्रतिमा किंवा कोणत्याही व्यक्तीद्वारे त्यांची ओळख पटवण्यायोग्य इतर कोणत्याही वैशिष्ट्याचा अनधिकृत वापर करण्यास प्रतिबंध करणारा अंतरिम आदेश पारित केला.
12:42 November 25
मेघालयात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नाही: मुख्यमंत्री
शिलाँग: मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड के संगमा यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यात पेट्रोल आणि डिझेलची कमतरता नाही.
कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना केले.
ते म्हणाले की, त्यांच्या सरकारने साठा आणि पुरवठ्याची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
12:42 November 25
12:38 November 25
दिल्ली सरकारने शाळांमध्ये शौचालये बांधली, त्यांची वर्गखोली म्हणून गणना केली: भाजप
नवी दिल्ली: भाजपने शुक्रवारी म्हटले आहे की दिल्ली सरकारी शाळांमधील वर्गखोल्यांच्या बांधकामातील "अनियमितता" बाबत दक्षता संचालनालयाच्या अहवालावरून असे दिसून आले आहे की मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना फक्त "आपल्याकडे जाणाऱ्या काळ्या पैशाची चिंता आहे, मुलांच्या शिक्षणाची नाही. "
12:37 November 25
टोयोटा किर्लोस्कर मोटर हायब्रिड वाहनांवर लक्ष केंद्रित करते: अध्यक्ष विक्रम किर्लोस्कर
मुंबई: टोयोटा किर्लोस्कर मोटर भविष्यात भारतात इलेक्ट्रिक वाहने आणणार आहे, परंतु याक्षणी ते सर्वांगीण कार्बन घट पूर्ण करण्याच्या उद्देशाने हायब्रीड वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे, असे कंपनीचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांनी सांगितले.
12:36 November 25
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची आदरांजली
सातारा - संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
12:34 November 25
मल्टीस्टारकास्ट असलेली मराठी वेब सिरीज 'अथांग' झाली प्रदर्शित!

मराठी साहित्य अत्यंत प्रगल्भ असल्याचे नेहमीच जाणून येते. बऱ्याच कलाकृतीचा प्राण याच साहित्यात असल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे मराठी चित्रपट आशयघन विषय हाताळताना दिसतात त्याचप्रमाणे मराठी वेब सिरीज मध्येसुध्दा उत्तम संहिता केंद्रबिंदू असलेल्या दिसतात. आगामी अथांग या वेब सिरीज देखील हा समज खोटा पाडत नाही.
12:33 November 25
लिंग-आधारित हिंसाचार बंद करा.. संयुक्त राष्ट्राने तालिबानला सुनावले
काबुल : अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र मिशनने तालिबानला अर्थपूर्ण आणि शाश्वत शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून महिलांवरील हिंसाचार आणि महिलांच्या अधिकारांचा व्यापक ऱ्हास थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. .
12:31 November 25
पुण्यात माजी सरपंचाने १७ वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार
पुणे: जिल्ह्यातील एका माजी सरपंचाचे घृणास्पद कृत्य...१७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लॉजवर नेऊन केला बलात्कार
12:24 November 25
पेन्शन योजनेचे १७ हजार कोटी रुपये परत करण्याची मागणी
दिल्ली | अर्थसंकल्पपूर्व बैठक: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्रीय FM निर्मला सीतारामन यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेची 17240 कोटी रुपयांची रक्कम परत करण्यास सांगितले, राज्याचा हिस्सा वेगळ्या पेन्शन फंडात जमा केला जाईल.
12:23 November 25
लचित बारफुकनच्या 400 व्या जयंती उत्सवात पंतप्रधान मोदींचे भाष्य
नवी दिल्ली : औपनिवेशिक मानसिकता मागे टाकून, राष्ट्राला आपल्या वारशाचा अभिमान आहे. आज, भारत केवळ आपली सांस्कृतिक विविधताच साजरी करत नाही तर आपल्या संस्कृतीच्या ऐतिहासिक नायकांचे अभिमानाने स्मरण करत आहे: लचित बारफुकनच्या 400 व्या जयंती उत्सवात पंतप्रधान
जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करत आहे अशा वेळी लचित बारफुकनची 400 वी जयंती साजरी करण्याची संधी आम्हाला मिळाली. हा ऐतिहासिक प्रसंग आसामच्या इतिहासातील एक अभिमानास्पद अध्याय आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी

औपनिवेशिक मानसिकता मागे टाकून, राष्ट्राला आपल्या वारशाचा अभिमान आहे. आज, भारत केवळ आपली सांस्कृतिक विविधताच साजरी करत नाही तर आपल्या संस्कृतीच्या ऐतिहासिक नायकांचे अभिमानाने स्मरण करत आहे: लचित बारफुकनच्या 400 व्या जयंती उत्सवात पंतप्रधान
लचित बारफुकन सारखी महान व्यक्ती आणि भारत मातेची अमर संतती या अमृत कालाच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी आमची निरंतर प्रेरणा आहेत: दिल्लीत लचित बारफुकन यांच्या 400 व्या जयंती उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी
12:23 November 25
आमदार बच्चू कडू मुंबई सत्र न्यायालयाय सुनावणीस गैरहजर

वकिलांमार्फत कोर्टात केला अर्ज सादर
बच्चू कडू सध्या राजकीय व्यस्ततेमुळे हजर राहुल शकले नाही
सुनावणीत अनुपस्थित राहण्याची केली विनंती
कोर्टाने कडू यांचा अर्ज मंजूर करत पुढील सुनावणी 15 डिसेंम्बर रोजी ठेवली आहे
मारिन ड्रॉईव्ह पोलीस ठाण्यात दाखल मारहाण प्रकरण
12:13 November 25
‘झुंड’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला पुन्हा चोरीच्या आरोपाखाली अटक
महानायक अमिताभ बच्चन स्टारर ‘झुंड’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रियांशू क्षत्रिय याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नागपूर शहर पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे.
12:09 November 25
खा. नवनीत राणा यांना 5 डिसेंबरपर्यंत दिलासा कायम
खा. नवनीत राणा यांना 5 डिसेंबर पर्यंत दिलासा कायम
नवनीत राणा केस सुनावणी तहकुब
कोर्टानं,5 डिसेंबर तारीख केली निश्चित
तरी,नवनीत राणा यांचे वकील रिझवान मर्चंट, सुनावणी आजच घेण्यासाठी अग्रही
दोन्ही वकिलांचा युक्तिवाद पुर्ण झाला तरी, तारीख का ? - मर्चंट यांचा सवाल
सरकारी वकिलांनी आपला सादर केलाय लेखी युक्तिवाद
मूळ तक्रारदार यांचा वकील मात्र तारखेसाठी अग्रही
तरी, सुनावणी 5 डिसेंबरलाच होणार - कोर्टाचा निर्णय
मात्र, तोपर्यंत नवनीत राणा विरोधातील, शिवडी कोर्टानं बजावलेलं अटक वॉरंटवर, पोलीस कारवाई करणार नाही
12:04 November 25
ऑस्ट्रेलियन महिलेच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून आरोपीला अटक
2018 मध्ये क्वीन्सलँडमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेची हत्या केल्याचा आरोप असलेल्या राजविंदर सिंग याला दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने अटक केली आहे.
क्वीन्सलँड पोलिसांनी आरोपीच्या माहितीच्या बदल्यात AUD 1 दशलक्ष देऊ केले होते, जे आतापर्यंत विभागाकडून दिलेले सर्वात मोठे आहे.
गुप्तचर माहितीच्या मदतीने सीबीआय, इंटरपोल आणि स्पेशल सेलसोबत राबविण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत आरोपीला पकडण्यात आले.
12:00 November 25
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला आत्मनिर्भरतेच मंत्र दिला : केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी, तुम्ही 'मेक इन इंडिया' उपक्रमाद्वारे देशातील जनतेला आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला, मला तुमची लचित बारफुकनला श्रद्धांजली वाटते कारण त्यांनी मुघलांविरुद्धच्या लढाईत वापरलेली शस्त्रे आणि उपकरणे ही सर्व काही तेथील लोकांनी बांधली होती. आसाम: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल
मला वाटते की आत्मनिर्भर भारताचा प्रवास तेव्हापासून सुरू झाला होता आणि आज तुम्ही नागरिकांना जगासमोर त्याचा प्रचार करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे: केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल दिल्लीत लचित बारफुकनच्या 400 व्या जयंती उत्सवात
11:57 November 25
अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीत सुधारणा
पुणे, महाराष्ट्र | अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे, हळूहळू पण स्थिर सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत, हातपाय हलवत आहे आणि पुढील ४८ तासांत व्हेंटिलेटर सपोर्ट बंद होण्याची शक्यता आहे. त्यांचे बीपी आणि हृदय स्थिर आहे: पीआरओ शिरीष याडगीकर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल
11:54 November 25
आसाम पेट्रोलियम मजदूर युनियनने सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर मेघालयात इंधन वाहतूक थांबवली
गुवाहाटी (आसाम): आसाम-मेघालय सीमेवर गोळीबाराच्या घटनेनंतर, आसाम पेट्रोलियम मजदूर युनियनने शुक्रवारी सांगितले की त्यांनी मेघालयला इंधनाची वाहतूक बंद केली आहे. युनियनने PSU तेल विपणन कंपन्यांना पत्र पाठवून टँकरमध्ये इंधन लोड न करण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहिती दिली.
"आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की मेघालयातील मुख्यतः री-भोई, खासी हिल्स आणि जैंतिया हिल्स जिल्ह्यांमध्ये परिस्थिती असामान्य आहे. आमचे सदस्य पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी वरील भागात जाण्यास घाबरत आहेत," असे आसाम पेट्रोलियम मजदूर युनियनने म्हटले आहे.
"म्हणूनच आम्ही आजपासून आणि जोपर्यंत मेघालय सरकार त्यांना T/T (टँक ट्रक) क्रूच्या सुरक्षेची आणि सुरक्षिततेची हमी देत नाही तोपर्यंत कोणताही भार न घेण्याचा निर्णय घेतला आहे," असे पत्रात म्हटले आहे.
आसाम-मेघालय सीमेवरील मुक्रोह भागात मंगळवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत मेघालयातील पाच आणि आसाम वनरक्षकासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर हा निर्णय झाला.
मेघालय पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे.
ही कथित चकमक आसामच्या पश्चिम कार्बी आंगलाँग जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या भागात आणि मेघालयातील पश्चिम जैंतिया हिल्समधील मुक्रोह गावामध्ये झाली. ठार झालेल्यांमध्ये आसाममधील वनरक्षकाचा समावेश आहे.
11:53 November 25
मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा कपूरला नियमित जामीन मंजूर
नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर यांना 466.51 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नियमित जामीन मंजूर केला.
या प्रकरणाचा तपास अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहे.
न्यायमूर्ती सुधीर कुमार जैन यांच्या खंडपीठाने शुक्रवारी त्यांना जामीन मंजूर केला.
ट्रायल कोर्टाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, मनी लाँड्रिंग प्रकरणात येस बँकेचे राणा कपूर आणि अनेक कर्मचार्यांचा समावेश असलेल्या अवंथा समूहाचे प्रवर्तक गौतम थापर यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) आरोपपत्राची (अभ्यासाची तक्रार) दखल घेतली.
11:44 November 25
आयएएस अधिकाऱ्याला खुनाच्या गुन्ह्यातून वगळण्याच्या आदेशाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती
केरळ उच्च न्यायालयाने 2019 मध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणात एका पत्रकाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आयएएस अधिकारी श्रीराम वेंकीतारामन यांच्यावरील खुनाचा आरोप वगळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली.
11:11 November 25
व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अमिताभ बच्चन यांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव
बॉलीवूडचे दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. प्रख्यात वकील हरीश साळवे त्यांची बाजू मांडत आहेत. न्यायमूर्ती नवीन चावला यांच्यासमोर हे प्रकरण सुरू आहे.
10:52 November 25
राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
दिल्ली उच्च न्यायालयाने येस बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ राणा कपूर यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावर ४६६.५१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे.
10:30 November 25
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिलेल्या स्क्रीप्टप्रमाणे बोलतात - संजय राऊत
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दिलेल्या स्क्रीप्टप्रमाणे बोलत आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे शिवरायांच्या अपमानाचे वक्तव्य मागे पाडण्याचा प्रयत्न असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
09:43 November 25
मराठा महासंघाकडून कर्नाटकाविरुद्ध पुण्यात निषेध
मराठा महासंघाने कर्नाटकाविरुद्ध निषेध केला. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावर केलेल्या वक्तव्यावर त्यांनी कर्नाटकच्या बसवर लिहून निषेध व्यक्त केला ाहे.
09:30 November 25
प्रेमप्रकरणातून तरुणाची नांदेडमध्ये हत्या
नांदेड शहरात प्रेमप्रकरणातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. माळटेकडी परिसरातील एका तरुणाचे त्याच्या घरासमोरील महिलेशी प्रेम संबंध होते. दोन दिवसांपूर्वी एका टोळक्याने या तरुणाची हत्या केली होती. स्वप्नील नागेश्वर असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या टोळक्याने आधी स्वप्नीलचे अपहरण करून त्याला आणि महिलेला नांदेड शहरातील उर्वशी मंदिराजवळ जागेत नेले.
09:22 November 25
चीनमधील २१ मजली इमारतीला आग, दहा ठार, नऊ जण जखमी
उत्तर-पश्चिम चीनच्या शिनजियांग उईगुर स्वायत्त प्रदेशाची राजधानी उरुमकी येथील 21 मजली निवासी इमारतीला गुरुवारी रात्री आग लागली. आगीत दहा जण ठार आणि नऊ जण जखमी झाले.
08:48 November 25
आयएफएस दीपक मित्तल यांची पंतप्रधान कार्यालयात कार्यालय अधीक्षक म्हणून नियुक्ती
आयएफएस दीपक मित्तल यांची पंतप्रधान कार्यालयात कार्यालय अधीक्षक ( ओएसडी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आयएफएस रुद्र गौरव श्रेष्ठ यांना पंतप्रधान कार्यालयाच्या सहसचिवपदी मुदतवाढ देण्यात आली आहे.
08:44 November 25
आमदार आर मनोहरन यांच्याविरोधातील कारवाईला स्थगिती
राज्य शिस्तपालन कृती समितीचे अध्यक्ष के.एन. रामासामी यांनी आमदार आर मनोहरन यांना निलंबित केले होते. या आदेशाला आणि शिस्तभंगाच्या कारवाईला राष्ट्रीय काँग्रेसने स्थगिती दिली आहे.
08:21 November 25
ओवरहेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत
ओवरहेड वायर तुटल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही गाड्या विविध स्टेशनवरती खोळंबून, तर काही गाड्या उशिरा धावत आहेत. या गाड्या 2 ते 4 तास उशिराने धावत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनादेखील विस्कळीत वाहतुकीचा फटका बसला आहे.
07:05 November 25
मध्य प्रदेशातील बोरगाव येथून काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू
मध्य प्रदेशातील बोरगाव येथून काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू झाली. यात्रेचा आज 79 वा दिवस आहे. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेशच्या राज्यातील 7 जिल्ह्यांतून जाणार आहे.
07:03 November 25
महाराष्ट्राची एक इंचही जमीन आम्ही कुणाच्याही हाती जाऊ देणार नाही-एकनाथ शिंदे
महाराष्ट्राची एक इंचही जमीन आम्ही कुणाच्याही हाती जाऊ देणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर म्हटले आहे.
07:00 November 25
एलॉन मस्कने घेतला मोठा निर्णय, ऑनलाईन सुरक्षा तज्ञांनी दिला इशारा
नवीन ट्विटर मालक एलॉन मस्क यांनी निलंबित केलेल्या ट्विटर अकाउंटला माफी देणार आहे. याचा अर्थ ते ट्विटर अकाउंट सुरू होणार आहेत. ऑनलाइन सुरक्षा तज्ञांच्या अंदाजानुसार त्यामुळे छळ, द्वेषयुक्त भाषण आणि चुकीची माहिती वाढेल.
07:00 November 25
चांदणी चौकातील आग अजूनही नियंत्रणात नाही
चांदणी चौकातील आग अजूनही नियंत्रणात नाही. इमारतींचे मोठे नुकसान झाल्याची माहिती अग्नीशमन अधिकाऱ्यांनी दिली.
06:59 November 25
जंगलात शरीराचे अवयव असलेली सुटकेस सापडली
फरीदाबादच्या सूरजकुंड येथील जंगलात शरीराचे अवयव असलेली सुटकेस सापडली. प्रथमदर्शनी असे दिसते की एका व्यक्तीची इतरत्र हत्या करण्यात आली होती. ओळख टाळण्यासाठी मृतदेहाचा काही भाग येथे फेकण्यात आला होता, असे फरिदाबाद पोलिसांनी सांगितले.
06:52 November 25
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने जिंकली नाणेफेक, भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकली आहे. ऑकलंडमध्ये भारताविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक वनडे पदार्पण करण्याच्या तयारीत आहेत.
06:44 November 25
Marathi Breaking News सिद्धू मुसेवाला हत्याकांड : गँगस्टर दीपक टिनूला चार दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई बारसू रिफायनरी प्रकल्पाला समर्थन करणाऱ्या आमदार राजन साळवी यांच्या विरोधात बारसु- सोलगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवला. दरम्यान, साळवींच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालून, शेण फासत रिफायनरीला विरोध दर्शवला. एकच जिद्द, रिफायनरी रद्द आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या.