ETV Bharat / state

Breaking news भूमकर पुलाजवळ पुन्हा अपघात, कंटेनरचे ब्रेक निकामी - Maharashtra political news

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र न्यूज
author img

By

Published : Nov 22, 2022, 6:20 AM IST

Updated : Nov 22, 2022, 8:02 PM IST

19:59 November 22

भूमकर पुलाजवळ पुन्हा अपघात, कंटेनरचे ब्रेक निकामी

पुणे - भूमकर पुलाजवळ पुन्हा अपघात. २ तासात हा दुसरा अपघात झाला आहे. भूमकर पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिराच्या समोर हा अपघात झाला आहे. कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्यामुळे या कंटेनरने समोरील वाहनांना धडक दिली. या कंटेनरने पुढे असलेल्या ३ गाड्यांना धडक दिली. यात २ चारचाकी वाहने आणि एक बस होती. यातील एका चारचाकी वाहनामध्ये कुटूंब प्रवास करत होते. सुदैवाने यातील लहान मुलांसह गाडीतील इतर व्यक्तींना काही झालेले नाही. कंटेनरची धडक बसल्याने गाडीचे टायर फुटले. कंटेनरचा ड्रायव्हर घटनास्थळी असून पोलिस त्याच्याकडे चौकशी करत आहेत.

19:24 November 22

आफताबची रोहिणी एफएसएल येथे पॉलिग्राफ चाचणी सुरू

नवी दिल्ली - श्रध्दा हत्या प्रकरणातील आरोपी आफताबची रोहिणी एफएसएल येथे पॉलिग्राफ चाचणी सुरू झाली आहे. आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी आधी त्याच्या संबंधित विविध चाचण्या करण्यात आल्या.

19:08 November 22

दादर येथे ब्लश स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट

मुंबई - दादर येथे ब्लश स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट, मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश.

19:02 November 22

आदित्य ठाकरे उद्या बिहार दौऱ्यावर

मुंबई - युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे उद्या बिहार दौऱ्यावर. बिहारचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांची घेणार भेट. शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई व शिवसेना उपनेते खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित असणार आहेत.

17:23 November 22

पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात, 2 गाड्यांचे नुकसान

पुणे - पुण्यातील नवले पुलावर पुन्हा अपघात. भरधाव वेगात असणारा कंटेनर रस्त्याच्या मधील असणाऱ्या दुभाजकावर जाऊन धडकला. या धडकेत २ चार चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे. हा ट्रक कात्रजच्या दिशेने मुंबईकडे जात होता. रविवारी झालेल्या भीषण अपघातनंतर आज पुन्हा त्याच ठिकाणी हा अपघात झाला आहे.

17:03 November 22

पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अभाविपप्रणित विद्यापीठ विकास मंच पॅनेलची आघाडी

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट निवडणुकीत अभाविपप्रणित विद्यापीठ विकास मंच पॅनलची आघाडी. दोन उमेदवार पहिल्याच फेरीत विजयी. गणपत पोपट नांगरे एसटी प्रवर्ग, विजय निवृत्ती सोनवणे एनटी प्रवर्ग यांनी आवश्यक मतांचा कोटा पहिल्याच फेरीत पूर्ण केला आहे. त्यामुळे कार्यकर्तांच्या जल्लोषाला सुरुवात झाली आहे.

16:45 November 22

सोनाली फोगट खून प्रकरणात आरोपपत्र दाखल

पणजी - सीबीआयने सोनाली फोगट खून प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. गोव्यातील कर्लीज बारमध्ये सोनालीचा संशयास्पद मृत्यू झाला. सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी तिला जबरदस्तीने ड्रग्ज देऊन तिची हत्या केल्याचा आरोप आहे. सोनालीच्या हत्येप्रकरणी दोघांनाही एकाच वेळी अटक करण्यात आली होती. आता सीबीआयने दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.

15:59 November 22

झाकीर नाईक यांना निमंत्रण दिल्याने फिफा विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

पणजी (गोवा) - वादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक यांना कतारने फिफा विश्वचषकाचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स यांनी भारतीय फुटबॉल संघटनेला बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

15:56 November 22

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गौरी भिडे यांना स्वतःच नियुक्तिवाद करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई - उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गौरी भिडे यांना स्वतःच्या याचिकेवर वकील म्हणून नियुक्तिवाद करण्याच्या परवानगीस उच्च न्यायालयाचा नकार. तुम्ही स्वतंत्र वकील नेमणार की तुम्हाला न्यायालय कडून वकील पाहिजे, मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांचा सवाल.

15:48 November 22

आसाम-मेघालय सीमेवर गोळीबारात 6 ठार; मेघालयातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

शिलाँग (मेघालय) - सीमेवरील पश्चिम जयंतिया हिल्समधील मुक्रोह येथे गोळीबारात आसामच्या एका वन अधिकाऱ्यासह सहा जण ठार झाल्यानंतर मेघालयने राज्यातील सात जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा 48 तासांसाठी बंद केली आहे.

15:40 November 22

सीबीआयने मध्य प्रदेशात एका आयकर अधिकाऱ्याला लाच मागितल्याबद्दल केली अटक

मंदसोर - सीबीआयने मध्य प्रदेशातील मंदसौर येथे एका आयकर अधिकाऱ्याला तक्रारदाराकडून 5 लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल अटक केली आहे. महाराष्ट्रात इलेक्ट्रिक स्विचचे उत्पादन करण्याचा त्याचा कारखाना आहे.

13:34 November 22

जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केली पोलिसांची पाठराखण

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन पोलिसांची पाठराखण केली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, माझ्यावर राजकीय दबावापोटी दोन खोटे गुन्हे मागील आठवड्यात 72 तासांत दाखल करण्यात आले. उद्या गुन्ह्यांविरुद्ध मी कोर्टात जाईन तेव्हा त्याचा नाहक त्रास हा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकाऱ्यांना होईल. त्या गरिबांचा काहीच दोष नाही. वरीष्ठ अधिकारी जसे निर्देश देतात, तसे ते कागदपत्रे बनवतात.

13:33 November 22

मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी कॅगची टीम दाखल

मुंबई - महापालिकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी कॅगची टीम दाखल. कॅगला सहकार्य करण्याचे आयुक्तांचे आदेश.

13:24 November 22

शिकार विरोधी ऑपरेशनमध्ये असलेल्या झोरबाचा मृत्यू

झोरबा, भारतातील प्रमुख जैवविविधता संवर्धन संस्थांपैकी एक असलेल्या आरण्यकच्या पहिल्या के ९ युनिट श्वानाचे काल रात्री वय आणि आरोग्याच्या समस्यांमुळे निधन झाले. आसाममधील अनेक गेंड्यांच्या संरक्षण क्षेत्रांचा समावेश असलेल्या 8 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीत, झोरबा शिकार विरोधी ऑपरेशनमध्ये सक्रियपणे गुंतले होता.

12:45 November 22

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे

मुंबई - 100 कोटी कथित मनी लॉन्ड्रीग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याकडून अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे. ऋषिकेश देशमुख यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर ऋषिकेश देशमुख यांच्या वतीने वकील इंद्रपाल सिंग यांनी युक्तिवाद केला होता. मात्र ईडीकडून तीन तारखा घेऊनसुद्धा युक्तिवाद करण्यात आला नव्हता.

12:40 November 22

श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी आफताबने दिली खुनाची कबुली

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणातील आरोपी, आफताब अमीन पूनावाला याने मंगळवारी दिल्ली न्यायालयात सांगितले की, रागाच्या भरात मैत्रिणीची हत्या केली आहे. आफताब पूनावालाला विशेष सुनावणीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केल्यानंतर साकेत न्यायालयाने आज त्याच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ केली.

12:38 November 22

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीनाविरोधात एनआयएनेची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली - भीमा कोरेगाव प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात NIA ने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सुप्रीम कोर्ट शुक्रवार, 25 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेणार आहे.

12:29 November 22

न्यूझीलंडचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

नेपियर येथे भारताविरुद्धच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

12:17 November 22

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात

आळंदी (पुणे) - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा सव्वा बाराच्या सुमारास पार पडला. ज्ञानोबांच्या संजीवन समाधीवर पुष्पवृष्टी करून सोहळा झाला. आळंदीत लाखो भाविक दाखल झाले होते. निर्बंधमुक्त वातावरणात हा सोहळा झाला असल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

12:12 November 22

चाकूने भोसकून मित्राचा मृतदेह फेकला नदीपात्रात

लातूर - चाकूने भोसकून मित्राचा मृतदेह फेकला नदीपात्रात. पत्नी सोबतच्या अनैतिक संबंधातून मित्रानेच केला मित्राचा खून. नदीपात्रात फेकलेल्या मृतदेहाचा पोलिसांकडून शोध सुरू.

11:45 November 22

श्रद्धा खून प्रकरणी सीबीआय तपासाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणी पोलिसांकडून सीबीआयकडे तपास सोपवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, या याचिकेवर विचार करण्याचे कोणतेही योग्य कारण नाही. त्यामुळे या केसचा तपास दिल्ली पोलीसच करतील असे स्पष्ट झाले आहे.

11:22 November 22

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची पॉलीग्राफिक चाचणी घेण्याकरिता तयारी सुरू

दिल्ली पोलिसांनी श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची पॉलीग्राफिक चाचणी घेण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीशी (एफएसएल) संपर्क साधला आहे. तयारी सुरू आहे. चाचणी आज घेतली जाऊ शकते, अशी माहिती सूत्राने दिली.

11:21 November 22

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या जामिनाविरोधात एनआयची सर्वोच्च न्यायालयात धाव

भीमा कोरेगाव प्रकरणात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आनंद तेलतुंबडे यांना जामीन देण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात एनआयने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालय शुक्रवार, 25 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी घेण्यास सहमत आहे.

10:36 November 22

भाजपने राजभवनाला पक्षाचे मुख्यालय केल्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालपदाची प्रतिष्ठा संपली -संजय राऊत

कोणत्याही राज्यपालावर असा राग कधीच नव्हता. लोक आंदोलन करत आहेत. भाजपने राजभवनाला पक्षाचे मुख्यालय केल्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालपदाची प्रतिष्ठा संपली आहे: राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानावर संजय राऊत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

09:46 November 22

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावा-संजय राऊत

विरोधी पक्ष म्हणून खंबीरपणे लढणार आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घ्यावा. शिवरायांचा अवमान पाहत बसणारे सीमावादावर काय न्याय देणार

कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी अत्यंत जागरुक आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसोबत काय बोलत आहोत, याचे रेकॉर्डिंग जनेताला दाखवावे. हा राजकीय प्रश्न आहे. २० लाखांचा मराठी भाषिक कर्नाटकाच्या घश्यात घातला आहे. महाराष्ट्र सरकारने हिमतीने पंतप्रधानांशी बोलावे व जनतेला कळवावे, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

09:07 November 22

राज कुंद्रा यांच्याविरोधातील आरोपपत्रावर वकिलाने दिली प्रतिक्रिया

राज कुंद्रा अश्लील प्रकरणात महत्त्वाचे अपडेट आहे. मुंबई सायबर क्राईमने या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याचे मीडिया रिपोर्ट्सवरून आम्हाला कळले आहे. कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करण्यासाठी आणि आरोपपत्राची प्रत गोळा करण्यासाठी आम्ही न्यायालयात हजर राहू, असे कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी म्हटले आहे. तथापि, एफआयआर आणि मीडिया रिपोर्ट्सवरून आम्हाला जे काही आरोप समजले आहेत, ते सुरक्षितपणे असा निष्कर्ष काढू शकतो की माझ्या क्लायंटचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. त्याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा दाखल झालेला नाही, असे वकिलांनी म्हटले आहे.

09:06 November 22

आपचे आमदार गुलाबसिंग यादव यांना पक्ष कार्यकर्त्यांकडून मारहाण

एमसीडी निवडणुकीचे तिकीट विकल्याबद्दल आपचे आमदार गुलाबसिंग यादव यांना पक्ष कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

07:45 November 22

पंतप्रधान मोदी आज ७१,००० जणांना करणार नियुक्ती पत्रांचे वाटप करणार

रोजगार मेळा अंतर्गत रोजगारासाठीपंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुमारे 71,000 नियुक्ती पत्रे नव्याने भरती झालेल्यांना वितरित करणार आहेत. पंतप्रधान मोदी यावेळी नोकरी मिळालेल्या व्यक्तींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील, असे पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एका निवेदनात म्हटले आहे.

06:56 November 22

इंडोनेशिया सियांजूरमध्ये भूकंपात 162 ठार, शेकडो जखमी

इंडोनेशियाच्या जावा बेटावर सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृतांची संख्या 162 झाली आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत.

06:49 November 22

कोरियाच्या मिसाईल डागण्याच्या कृत्याचा भारताकडून संयुक्त राष्ट्रसंघात निषेध

डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरियाने नुकता मिसाईल डागण्य्याचा कृत्याचा भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत निषेध केला.

06:08 November 22

Maharashtra Breaking news

ओडिशामध्ये मालगाडी रुळावरून घसरल्याने 19 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 20 वळविण्यात आल्या आहेत.

Last Updated : Nov 22, 2022, 8:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.