ETV Bharat / state

Breaking News in Maharashtra : नागपुरात सेप्टिक टॅंकमध्ये बुडून पाच वर्षीय मुकं मुलीचा मृत्यू - ईटीव्ही भारत महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
Maharashtra breaking News
author img

By

Published : Feb 10, 2023, 6:39 AM IST

Updated : Feb 10, 2023, 10:35 PM IST

22:34 February 10

नागपुरात सेप्टिक टॅंकमध्ये बुडून पाच वर्षीय मुकं मुलीचा मृत्यू

नागपूर - उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने ५ वर्षीय मुकं चिमुकलीचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली नागपूरात घडली आहे. ज्योती राजू साहू असे मृत मुलीचे नाव आहे. ती काल पासून बेपत्ता होती. घटना नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

22:05 February 10

भिवंडीत मंडपाच्या गोदामासह गोशाळेतील गावताच्या गंजींना भीषण आग

ठाणे : भिवंडी शहर व ग्रामीण भागात आगीचे सत्र सुरु असून आज सायंकाळच्या सुमारास भिवंडी वाडा मार्गावरील मंडप डेकोरडेशनच्या गोदामासह लगतच असलेल्या गोशाळामधील गवताच्या गंजीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून पुन्हा एकदा अग्नितांडवमुळे लाखोंचे मंडप डेकोरेशनसह गवताचे गोदाम जळून खाक झाले आहे.

21:17 February 10

मुंबई -अहमदाबाद महामार्गावरील सकवार येथे भीषण अपघात; २ ठार, २ गंभीर जखमी

विरार : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्ता दुभाजकाला डिव्हायडरला ठोकर मारून भीषण अपघात सकवार गावाच्या हद्दीत गुरुवारी झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने मिरा रोडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

19:51 February 10

एचडीएफसी बँकेच्या 2 माजी कर्मचाऱ्यांना लाचखोरीप्रकरणी 3 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

पुणे - एचडीएफसी बँकेच्या दोन माजी कर्मचाऱ्यांना २ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात ३ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासह माजी रिलेशनशिप मॅनेजर नितीन निकम यांना ६० हजार रुपये आणि गणेश धायगुडे, माजी ग्रामीण विक्री कार्यकारी अधिकारी यांनी १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

18:38 February 10

एसटी कामगारांचे वेतन पुन्हा रखडले, 10 तारीख उलटली तरी पगार नाही

शासनापेक्षा प्रशासन वरचढ झाल्याचे दिसून येत आहे. एसटी कामगारांचे वेतन पुन्हा रखडले आहे. आज १० तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. अर्थ खात्यातील अधिकारी सरकारला जुमानत नाहीत का, असा सवाल यामुळे विचारला जात आहे. महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

18:35 February 10

पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारण्यासंदर्भातला निर्णय घेतला मागे

नवी दिल्ली - पशु कल्याण मंडळाने येत्या 14 फेब्रुवारीला गाईला मिठी मारण्यासंदर्भात निर्णय घेऊन त्याबाबतचे आवाहन करण्यात आले होते. मात्र हा निर्णय आता मागे घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात पत्रक जारी करण्यात आले आहे.

18:30 February 10

विकासाच्या निकषांवर बोहरा समाजाने स्वतःला सिद्ध केले आहे - मोदी

मुंबई - काळ आणि विकासाच्या बदलाच्या निकषांवर दाऊदी बोहरा समाजाने नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे. आज अल्जामिया-तुस-सैफियाह सारख्या महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थांचा विस्तार हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. या शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोहरा समाजाचा गौरव केला.

17:56 February 10

काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले

काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना अधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी पंतप्रधान मोदी यांच्या धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देत असताना सभागृहात विरोधकांच्या निषेधाचे व्हिडिओग्राफी केल्याबद्दल त्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले.

17:29 February 10

पंतप्रधानांच्या हस्ते अल्जामिया-तुस-सैफियाह अरबी अकादमीच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अल्जामिया-तुस-सैफियाह अरबी अकादमीच्या मुंबई कॅम्पसचे उद्घाटन करण्यात आले.

16:34 February 10

वंदे भारत ट्रेन हे आधुनिक भारताचे भव्य चित्र - मोदी

मुंबई - वंदे भारत ट्रेन हे आजच्या आधुनिक भारताचे एक भव्य चित्र आहे. ही ट्रेन भारताच्या गती आणि प्रमाणाचे प्रतिबिंब आहे. आज देशभरात 10 वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत. त्यावरुनच वेग लक्षात येईल. पंतप्रधानांनी मुंबई-सोलापूर आणि मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी या बाबी स्पष्ट केल्या.

16:30 February 10

आज वंदे भारत गाड्यांची ही क्रेझ आहे - पंतप्रधान मोदी

मुंबई - वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, 21व्या शतकातील भारताला आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था झपाट्याने सुधारावी लागेल. आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जितक्या लवकर आधुनिक होईल तितके लोकांचे राहणीमान सुसह्य होईल आणि त्यांच्या जीवनमानात सुखद सुधारणा दिसून येतील. एक काळ असा होता जेव्हा खासदार आपल्या भागातील स्थानकांवर १-२ मिनिटांच्या थांब्यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यासाठी पत्र लिहायचे. आता खासदार भेटले की त्यांच्या भागात वंदे भारताची मागणी करतात. आज वंदे भारत गाड्यांची ही क्रेझ आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

16:05 February 10

मुंबईत वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होत आहे - मोदी

पंतप्रधान मोदींनी दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मराठीतून भाषणास सुरुवात केली. त्यांनी या रेल्वे सुरु केल्याचा आनंद होत असल्याचा आनंद होत असल्याचे सांगितले. रेल्वेच्या क्षेत्रात मोठी मोठी क्रांती होत आहे, असे मोदी म्हणाले.

16:00 February 10

मुंबई शिर्डीला वंदे भारतला पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा, फक्त साडेपाच तासात शिर्डीत पोहोचणार

यापूर्वी मुंबई-शिर्डी साईनगर या ३४३ किमी अंतरासाठी ७ तास २० मिनिटे लागत होते. आता वंदे भारत ट्रेन ५ तास २५ मिनिटांत मुंबई-शिर्डी साईनगर अंतर कापणार आहे.

15:56 February 10

मुंबई सोलापूरसाठी पूर्वी 8 तास लागत होते, आता वंदे भारतने लागणार साडेसहा तास

मुंबई - यापूर्वी मुंबई-सोलापूर या ४५५ किमी अंतरासाठी रेल्वे प्रवासाला ७ तास ५५ मिनटे लागत होते. आता वंदे भारत ट्रेन ६ तास ३० मिनिटे एवढ्या वेळात मुंबई-सोलापूर अंतर कापण्यासाठी घेईल.

15:52 February 10

सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा

मुंबई - सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवला हिरवा झेंडा

15:47 February 10

२ हजार कोटी रुपये मुंबईच्या रेल्वेसाठी पंतप्रधानांनी बजेटमध्ये दिले त्याबद्दल आभार

मुंबई - पंतप्रधान मोदी यांनी १२ पटीने रेल्वेचे बजेट वाढवले आहे. 2009 ते 2014 च्या कालखंडात जेवढे बजेट महाराष्ट्रासाठी मिळत होते, तेवढे बजेट आज फक्त मुंबईसाठी त्यांनी दिलेले आहे. २ हजार करोड रुपये मुंबईच्या रेल्वेसाठी त्यांनी दिले आहेत. याबाबत आभार मानत असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.

15:44 February 10

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेच्या निधीसाठी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मुंबई - मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. मुंबईसाठी रेल्वे अर्थसंकल्पात मोठी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल हे आभार मानण्यात आले.

15:40 February 10

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यावर सट्टेबाज करणाऱ्या चौघांना जामठा मैदानाबाहेरून अटक

नागपूर - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यावर सट्टेबाज करणाऱ्या चौघांना जामठा मैदाना बाहेरून अटक करण्यात आली. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन जामठा मैदानाबाहेरून चार सट्टेबाजांना नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

15:39 February 10

वंदे भारत ट्रेनचे पेंटिंग देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेशाची मूर्ती व रेल्वे केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेन चे पेंटिंग देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

15:33 February 10

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी स्थानकात पोहचले

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएसएमटी स्थानकात पोहचले आहे. तिथे ते वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

15:25 February 10

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वागतासाठी हजर

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. आयएनएस शिक्रावरून रस्ते मार्गे ते सीएसएमटी येथे जात आहेर. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी हजर आहेत.

15:02 February 10

हिंडनबर्गविरुद्ध लढा देण्यासाठी अदानींनी अमेरिकन वकील लावले कामाला

नवी दिल्ली - गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने नुकत्याच समूहावर लावलेल्या आरोपांविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेतील कायदे सल्लागारांना नियुक्त केले आहे. फायनान्शियल टाईम्सने याबाबतचे वृत्त दिल्याची माहिती एएनआयने दिली आहे. ब्रिटीश दैनिकाच्या वृत्तानुसार, अदानी समूहाने वॅचटेल, लिप्टन, रोसेन आणि कॅट्झ येथील वरिष्ठ वकिलांशी संपर्क साधून समूहाला तोंड देत असलेल्या संकटाचा सामना कसा करावा याबद्दल सल्ला विचारला आहे. न्यूयॉर्क-आधारित कायदेशीर फर्म कॉर्पोरेट कायद्यात जाणकार आहे.

14:45 February 10

रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई - रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेवर मेल एक्स्प्रेस गाड्या उशिराने धावतील. तर पनवेल, बेलापूर करीता सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

14:28 February 10

महेश कदम यांचा भाजपामध्ये प्रवेश, मनसेला खिंडार

ठाणे : मनसेचे ठाणे शहरातील माजी विभाग अध्यक्ष व कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणुकीतील उमेदवार महेश कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये आज प्रवेश केला. भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वांचे स्वागत केले.

13:56 February 10

रशियाचा युक्रेनच्या झापोरिझ्झियावर तासाभरात तब्बल 17 वेळा हल्ला केला, वीज प्रकल्पांना केले लक्ष्य

कीव्ह - रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यांनी शुक्रवारी सकाळी युक्रेनच्या झापोरिझ्झियामधील वीज प्रकल्पांना लक्ष्य केले. एका तासात या ठिकाणी 17 वेळा हल्ला करण्यात आला. कीव्ह इंडिपेंडंटने झापोरिझ्झिया सिटी कौन्सिलचे सचिव अनातोली कुर्तिएव्ह यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

13:44 February 10

तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बापानेच केला खून

पुणे - पुण्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कॅनॉलच्या येथे ऑनर किलिंगची घटना घडली आहे. तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा सख्या बापानेच खून केला. तिचा मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून दिला आहे. त्यानंतर बापानेदेखील विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

13:40 February 10

पाकिस्तानमध्ये अनेक ठिकाणी पंपांमध्ये पेट्रोल संपले, जनजीवन झाले विस्कळीत

पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात असताना आता जनजनीव विस्कळित होत आहे. पंपांमध्ये पेट्रोल संपल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.

13:17 February 10

काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू-नाना पटोले

काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

13:09 February 10

बीबीसीवरील बंदीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली, मोदींवरील माहितीपटावरुन झाला होता वाद

सुप्रीम कोर्टाने, २००२ च्या गुजरात दंगलीशी संबंधित ‘इंडियाः द मोदी क्वेश्चन’ या माहितीपटाच्या प्रसारणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) आणि बीबीसी इंडियावर भारतात काम करण्यावर संपूर्ण बंदी घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

13:07 February 10

रोहित शर्माचे दमदार शतक

रोहित शर्माचे दमदार शतक. कसोटी, एक दिवसीय आणि ट्वेंटी ट्वेंटी प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू अशी त्याची नोंद इतिहास यानिमित्ताने घेईल.

13:03 February 10

मुंबई, पुणे, नाशिकच्या रहिवाशांना वंदे भारत ट्रेनची भेट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

मुंबई - आजपासून दोन वंदे भारत ट्रेन सुरू होत आहेत. मुंबई, पुणे, नाशिक येथील रहिवाशांना आणि शिर्डी साईबाबा आणि त्र्यंबकेश्वरच्या भक्तांना ही भेट दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आभार मानले. आज मुंबईत 2 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी येणार आहेत.

12:58 February 10

राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी जुन्या अर्थसंकल्पावरुन मागितली माफी, म्हणाले चुकून झाले

राजस्थान विधानसभेत सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केल्याने गोंधळ झाला होता. त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. जे काही झाले ते चुकून झाले असे ते म्हणाले. अर्थसंकल्प सादरीकरणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी जुना अर्थसंकल्प वाचल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे गोंधळ झाला होता.

12:32 February 10

काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांचा राज्यसभेतून वॉकआउट

नवी दिल्ली - राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लीकार्जुन खरगे यांनी केलेल्या काही टीकेवर अध्यक्षांनी आक्षेप घेतला. त्यानंतर काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेतून सभात्याग केला. तत्पूर्वी, अध्यक्ष धनखर यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या चेंबरमध्ये चर्चा करण्यासाठी बोलावले. त्यांना सभागृहाचे पावित्र्य राखण्यात स्वारस्य आहे का, अशी विचारणाही केली होती.

12:15 February 10

मोदी म्हणाले की केवळ तेच या देशाला वाचवू शकतात, हा अहंकार आहे - खरगे

नवी दिल्ली - पंतप्रधानांनी भाषणात स्वतःचे कौतुक केले. त्यांनी आमच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही, अशी टीका मल्लीकार्जुन खरगे यांनी केली आहे. बेरोजगारी, महागाई, अदानी, रुपयाची घसरण आणि इतर मुद्द्यांवर ते बोलले नाहीत. मोदी म्हणाले की केवळ तेच या देशाला वाचवू शकतात, हा अहंकार आहे, या शब्दात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सुनावले.

12:02 February 10

उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने मुक्या चिमुकलीचा मृत्यू

नागपूर - उघड्या पाण्याच्या टाकीत पडल्याने ५ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ज्योती राजू साहू असे मृत मुलीचे नाव आहे. ज्योती कालपासून बेपत्ता होती. नागपूर शहरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे. ज्योतीला बोलता येत नव्हते. काल दुपारी ती खेळायला गेली होती. खेळता-खेळता ती टाकीत पडली असावी. बोलता येत नसल्याने ती ओरडू शकली नाही. त्यातून तिचा बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला जातो आहे.

11:55 February 10

दाऊदी बोहरा समाजातील बहिष्काराच्या प्रथेविरुद्धची याचिका 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे

नवी दिल्ली - दाऊदी बोहरा समुदायातील बहिष्काराच्या प्रथेविरुद्धच्या याचिकेवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण नऊ न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे सुपूर्द केले. न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सांगितले की, सबरीमाला निकालाची योग्यता ठरवण्यासाठी नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ दाऊदी बोहरा समुदायातील बहिष्काराच्या प्रथेवरही निर्णय घेईल.

11:44 February 10

शिवसेनेने भापच्या 'काऊ हग डे'ची उडवली खिल्ली

मुंबई - शिवसेनेने भाजपच्या 14 फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डेच्या 'काउ हग डे' उपक्रमाची खिल्ली उडवली आहे. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी पंतप्रधानांसाठी पवित्र गाय असल्याचा दावा करणाऱ्या नरेंद्र मोदींवर शिवसेनेने टीका केली आहे. मोदीच अदानी नावाच्या पवित्र गायीला सोडतील तेव्हा तर आम्ही मिठी मारणार ना, अशी उपरोधिक टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

11:29 February 10

सर्वोच्च न्यायालयाकडून कंताराच्या निर्माता व दिग्दर्शकाला दिलासा

सर्वोच्च न्यायालयाने विजय किरगंडूर आणि ऋषभ शेट्टी, अनुक्रमे निर्माता आणि अभिनेता-दिग्दर्शक यांना दिलासा दिला आहे. जेव्हा ते गाण्यावरील कॉपीराइट उल्लंघनाच्या चौकशीच्या संदर्भात 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी हजर होतील, तेव्हा त्यांना अटक केली जाणार नाही.

11:23 February 10

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फेरी काढण्याची मद्रास उच्च न्यायालयाकडून परवानगी

मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू पोलिसांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक रस्त्यावर मार्गक्रमण करण्याची परवानगी देण्याचे निर्देश दिले.

11:13 February 10

रिलायन्स उत्तर प्रदेशमध्ये करणार ७५ हजार कोटींची गुंतवणूक

रिलायन्सची पुढील चार वर्षात उत्तर प्रदेशातील जिओ, रिटेल आणि नूतनीकरणयोग्य व्यवसायांमध्ये अतिरिक्त 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात 1 लाखांहून अधिक नोकऱ्या निर्माण होतील, अशा विश्वास रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला.

11:11 February 10

डाव्या खासदारांचे संसदेतील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन

पीएफ पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी आणि किमान पेन्शन 9,000 रुपये प्रति महिना करण्याची मागणी करत डाव्या खासदारांनी संसदेतील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन केले.

11:09 February 10

पंतप्रधानांकडून भाषणात स्वतःचे कौतुक, हा अहंकार-मल्लिकार्जुन खरगे

पंतप्रधानांनी भाषणात स्वतःचे कौतुक केले. त्याने आमच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही. बेरोजगारी, महागाई, अदानी, रुपयाची घसरण आणि इतर मुद्द्यांवर ते बोलले नाहीत. ते म्हणाले की केवळ तेच या देशाला वाचवू शकतात, हा अहंकार आहे, अशा कठोर शब्दात काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.

10:28 February 10

यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये पंतप्रधानांसह उद्योगपती पोहोचले!

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पंतप्रधान मोदी लखनऊमध्ये यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 मध्ये पोहोचले. समिटमध्ये रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानीदेखील पोहोचले आहेत.

10:26 February 10

पालघरमध्ये 16.60 लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह एका व्यक्तीला अटक

पालघरमध्ये 16.60 लाख रुपयांच्या मेफेड्रोनसह एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी दिली. एका मॉलजवळ संशयास्पदरीत्या फिरताना दिसल्यानंतर त्याला बुधवारी आचोळे पोलिस ठाण्याजवळ ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

10:25 February 10

इमारतीचे प्लास्टर पडल्याने धोका

ठाण्यात एका इमारतीचे प्लास्टर पडले तर आणखी एका इमारतीला भेगा पडल्या, त्यामुळे दोन्ही इमारती कोसळण्याचा धोका निर्माण झाला. दोन्ही घटनांमध्ये कोणीही जखमी झाले नसल्याचे ठाणे महापालिकेने म्हटले आहे.

10:20 February 10

अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी गप्प का ?- संजय राऊत

मुंबई महापालिका मोदींना जिंकायची आहे. भाजप आणि शिंदे गट मुंबई महापालिका जिंकू शकत नाही. मुंबई महापालिका आम्हीच जिंकणार असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. अदानींच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी गप्प का, असा प्रश्नही खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.

09:30 February 10

ठाण्यातील मनसेला मोठे खिंडार मनसे नेते महेश कदम घेणार आज भाजपमध्ये प्रवेश

मागील अनेक दिवसांपासून होते नाराज झालेे मनसे नेते महेश कदम आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत करणार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

09:22 February 10

मुंबई विमानतळच्या सीमाशुल्क अधिकार्‍यांनी 1.44 कोटी रुपयांचे सोने केले जप्त

8 ते 9 फेब्रुवारी 2023 रोजी, मुंबई विमानतळ कस्टमच्या अधिकार्‍यांनी 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 1.44 कोटी रुपयांचे सुमारे 2.8 किलो सोने जप्त केले आणि 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 92.43 लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त केले.

09:14 February 10

पत्रकार शशिकांत यांच्या मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर जिल्हा रुग्णालयात दाखल

पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या पंढरीनाथ आंबेरकरला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या पंढरीनाथ आंबेरकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पत्रकार संघटना आंदोलन करणार आहेत.

08:55 February 10

शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर, वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. वीज कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांचा माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार आहे.

08:43 February 10

नाशिकमध्ये भाजपचे आजपासून राज्य अधिवेशन सुरू होणार

नाशिकमध्ये भाजपचे राज्य अधिवेशन सुरू होणार आहे. भाजपचे केंद्रीय मंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री, राज्यातील सर्व 23 खासदार व 104 आमदार उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या दौऱ्यामुळे अमित शाह नाशिकमध्ये येण्याची चिन्हे कमी आहेत. अधिवेशन सातपूर येथील डेमोक्रसी येथे आयोजित केले आहे. 10 आणि 11 फेब्रुवारील अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये पक्षसंघटन बांधणी, पक्षाचे विविध उपक्रम व जिल्हास्तरावर सोशल मीडियाच्या माध्यमातून करावयाचे सादरीकरण या विषयांवर विशेष संवाद साधला जाणार आहे. दोन दिवशीय अधिवेशनात उद्या राज्यातील 200 प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक होणार आहे.या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत.

08:33 February 10

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीकरिता अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीकरिता अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत राहुल कलाटे हे अर्ज मागे घेणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. आज निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

08:31 February 10

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा पुणे दौरा

केंद्रीय गृहमंत्री १८ व १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. हा दौरा कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे.

08:30 February 10

पंतप्रधान आज श ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 चे उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लखनौमध्ये उत्तर प्रदेश ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023 चे उद्घाटन करणार आहेत.

08:04 February 10

इस्रो आज लहान उपग्रह करणार प्रक्षेपित

आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 चा उपग्रहांना 450 किमीच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवण्यासाठी इस्रो आज लहान उपग्रह व्हेईकल प्रक्षेपित करणार आहे.

07:50 February 10

पत्रकार हत्येची न्यायालयीन चौकशी व्हावी, राष्ट्रीय पातळीवरील मीडिया संघटनांची मागणी

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी माध्यम संघटनांनी गुरुवारी केली. प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रेस असोसिएशन आणि दिल्ली युनियन ऑफ जर्नालिस्ट यांनी येथे जारी केलेल्या संयुक्त निवेदनात या क्रूर गुन्ह्याचा निषेध केला. उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

07:22 February 10

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

43 वर्षीय कर्जबाजारी व्यक्तीने पत्नीचा खून केला आणि नंतर मध्य मुंबईतील राहत्या घरी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.

07:06 February 10

बायडेन यांचे वक्तव्य चीनला झोंबले

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला, या अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या वक्तव्याचा चीनने निषेध केला. बायडेन यांची ही टिप्पणी अत्यंत बेजबाबदार असल्याचे चीनने म्हटले आहे.

07:04 February 10

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख भूंकपग्रस्त सीरियाला देणार भेट

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस हे भूकंपग्रस्त सीरियासाठी रवाना झाले आहेत.

07:04 February 10

गिरगाव येथील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग

मुंबईतील गिरगाव येथील एलआयसी कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गुरुवारी रात्री 9.30 च्या सुमारास आग लागली. या घटनेदरम्यान कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझविली. अद्याप कोणतीही दुखापत/हानी झाल्याचे वृत्त नाही.

06:28 February 10

Breaking News in Maharashtra : पंतप्रधान आज वंदे भारत एक्सप्रेसला दाखविणार हिरवा कंदील

मुंबई : भारतीय रेल्वेची अर्ध-द्रुतगती ट्रेन असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि सोलापूर या मार्गावर आजपासून धावणार आहे. या ट्रेनला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे हिरवा कंदील दाखवणार आहेत. या ट्रेनच्या गतीमुळे तसेच धार्मिक स्थळांना जोडण्याचे काम या ट्रेनमुळे होणार आहे

Last Updated : Feb 10, 2023, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.