ETV Bharat / state

Breaking News : आदित्य ठाकरेंनी घेतली मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची भेट - Etv Bharat Maharashtra live

Maharashtra breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Feb 17, 2023, 7:03 AM IST

Updated : Feb 17, 2023, 10:38 PM IST

22:37 February 17

आदित्य ठाकरेंनी घेतली मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची भेट

मुंबई - निकालानंतर सध्या राज्यातील राजकीय घडामोडी घडत आहेत. आदित्य ठाकरेंनी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची भेट घेतली.

22:16 February 17

आयोगाच्या निर्णायाचा फार परिणार होत नसते - शरद पवार

निकालावर चर्चा करता येत नाही. नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा फार परिणार होत नसते. काँग्रेसमध्ये वाद झाला. तेव्हा काँग्रेसची बैलजोडी ही खूण होती ती गेली. काँग्रेसने हात घेतला. लोकांनी मान्य केलं. नवीन चिन्ह मिळेल ते लोकं मान्य करतील. फार परिणाम होणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

21:44 February 17

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय सत्याचा विजय - मुख्यमंत्री शिंदे

बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा हा विजय आहे

निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय सत्याचा विजय

शिवसेना चिन्ह गोठवला जाईल असं सांगितलं होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधलेला पक्ष आणि चिन्ह सोडवला असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला

आमचे सरकार नियमानुसार आणि कायद्यानुसार आयोगाने मेरिटवर घेतलेला हा निर्णय आहे

21:03 February 17

पालिका निवडणूक लावण्यासाठीच आजचा निर्णय - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

पालिका निवडणूक लावण्यासाठीच आजचा निर्णय

सदस्य संख्या, कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र का देण्यास सांगितले

महाराष्ट्राच्या जनतेला हा निर्णय मान्य नाही

यापुढेही लढत राहणार आहे

20:54 February 17

शिवसेना नाव व चिन्ह चोरले; निर्णयानंतर उद्धव ठाकरे आक्रमक

मुंबई - निवडणूक आयोगाने शपथपत्र, कागदपत्रे का मागितील. एकनाथ शिंदे यांनी नाव न चिन्ह चोरले आहे. निवडणुकीच्या आधी त्यांनी ही सर्व खेळी केली आहे. मोहन भागवत मशिदीत गेले हे त्यांचे हिंदुत्व म्हणालचे का?असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

20:44 February 17

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार - उद्धव ठाकरे

मुंबई - निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

20:40 February 17

लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरुन दोन गटात वाद, पोलिसांचा सौम्य लाठीमार

नांदेड - जिल्हयातील लोहा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यावरुन दोन गटात वाद झाला . वाद शमवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला .. सद्या लोहा शहरात तणावपुर्ण शांतता आहे लोहा शहरातील मुख्य चौकात छत्रपतीचा पुतळा बसवन्याची अनेक वर्षांची मागणी होती .. मागच्या महिन्यात शिवप्रेमींनी पुतळा पण आणला होता . पण शिक्षक मतदार संघाची निवडणुक असल्याने आचार संहीते मुळे पुतळा बसविण्यात आला नाही . आज हा कार्यक्रम होता .. लोहा नगर परिषदेकडून तयारी देखिल करण्यात आली .. शहरात शिवप्रेमाची मोठी गर्दी झाली .. पण श्रेयवादातून काँगेस आणि भाजपाचे गट आमने सामने आले .. त्यांच्यात वाद झाला . तेव्हा जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला

20:39 February 17

मंत्री दादा भुसेंनी केला आनंद व्यक्त, मानवे न्यायदेवतेचे आभार

मालेगाव :-शिवसेना नाव आणि धनुष्यबाण मिळाल्या बद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी आनंद व्यक्त करून मी न्याय देवतेचा आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला न्याय दिला ..धनुष्यबाण प्रभू रामचंद्राचे, भगवान एकलव्याचे, धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचे, धनुष्यबाण धर्मवीर आनंद दिघेंचे, धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे, धनुष्यबाण समस्त शिवसैनिकांचे अशी प्रतिक्रिया मंत्री भुसे यांनी दिली आहे

20:22 February 17

मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुणे : शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा की उद्धव ठाकरे यांचा यावर आता निवडणूक आयोगाने निकाल दिला असून, पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण आणि नाव शिवसेना हे दोन्हीही शिंदे गटाला मिळाले. यामुळे शिंदे गटांमध्ये उत्साहाचं वातावरण असून, त्याचा आनंदोत्सव महाराष्ट्रात सर्वत्र कार्यकर्ते करत आहेत.

19:33 February 17

जनता आमच्या सोबत आहे, आम्ही नवे चिन्ह घेऊन पुन्हा जनतेच्या दरबारात जाऊ - संजय राऊत

मुंबई - आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जनता आमच्या सोबत आहे. आम्ही नवे चिन्ह घेऊन या शिवसेनेला पुन्हा एकदा जनतेच्या दरबारात उभे करू, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

19:14 February 17

निवडणूक आयोग भाजपचा एजंट, नाव आणि चिन्हाच्या निर्णयावरुन ठाकरे गटाची टीका

नवी दिल्ली - आम्हाला ज्याचा संशय होता तेच घडत आहे अशी प्रतिक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्याने दिली आहे. प्रवक्ते आनंद दुबे यांनी म्हटले आहे की, आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टासमोर आहे आणि कोणताही अंतिम निर्णय घेतला गेला नाही. अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने घाईने निर्णय देणे म्हणजे ते केंद्र सरकारच्या अंतर्गत भाजपचे एजंट म्हणून ते काम करतात हेच दिसून येते. आम्ही याचा निषेध करतो, असे दुबे यांनी पुढे म्हटले आहे.

18:55 February 17

एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव तसेच धनुष्य बाण हे चिन्ह

नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव तसेच धनुष्य बाण हे चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने नुकताच याबाबतचा निकाल दिला आहे.

18:26 February 17

मुंबईत पोलीस भरतीची शारीरिक चाचणी देताना तरुणाचा मृत्यू

मुंबई - पोलीस भरतीदरम्यान शारीरिक चाचणी देताना गणेश उगले नावाच्या उमेदवाराचा मृत्यू झाला आहे.

18:16 February 17

मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा एसटीमधून प्रवास, कर्मचाऱ्यांच्या नेत्यांनी मात्र दिला टोला

रत्नागिरी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी एसटी बसमधून प्रवास केला आहे. त्यावर नुसता एसटी मधून प्रवास करून भागणार नाही तर एसटीला भरघोस आर्थिक निधी दिला पाहिजे असे मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बर्गे यांनी मांडले आहे.

18:13 February 17

वॉचमनने केले दीड वर्षाच्या मुलीचे अपहरण; शोधाशोध सुरू

पालघर - पोलिसांनी एका 18 महिन्यांच्या मुलीचे अपहरण करणार्‍या सुरक्षा रक्षकाचा माग काढण्यासाठी तपास सुरू केला आहे. आरोपी राजेंद्र कुमार हा नालासोपारा येथील एका गृहनिर्माण संस्थेत काम करत होता. तिथे मुलीचे अपहरण केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. त्यावरुन पोलिसांची शोधाशोध सुरू झाली आहे.

17:31 February 17

ओंकारेश्वर मंदिरात मॉकड्रिल, अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त

पुणे - केंद्रीय सुरक्षा पथकाकडून ओंकारेश्वर मंदिरात मॉकड्रिल करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची शहरात कडक सुरक्षा तैनात केली आहे.

17:21 February 17

अविश्वासाची नोटीस नाही तर केवळ विधानसभाच मला हटवू शकते - झिरवाळ

मुंबई - सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. केवळ अविश्वासाची नोटीस बजावून त्यांना पदावरून हटवता येणार नाही, असे ते म्हणाले आहेत. जर त्यांना पदमुक्त करण्यासाठी नोटीस पुरेशी असेल तर ते सभापतींच्या निवडणुकीसाठी निर्णय अधिकारी कसे होऊ शकतात असा सावाल केला आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे त्यावेळी भाजपचे राहुल नार्वेकर यांची त्यांच्या अधिपत्याखाली निवड झाली होती.

16:57 February 17

नवनीत राणांच्या वडिलांचे फरार घोषणे विरुद्धचे अपील न्यायालयाने फेटाळले

मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या वडिलांनी न्यायदंडाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपील मुंबईतील सत्र न्यायालयाने फेटाळले. एका मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गेल्या महिन्यात राणांचे वडील हरभजन कुंडलेस यांच्या विरोधात अनेक समन्स जारी केली असतानाही ते हजर न राहिल्याबद्दल कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे.

16:49 February 17

पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत, मुलाला कायमस्वरूपी नोकरी द्या - शिवसेना

रत्नागिरी - शासनातर्फे पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी आणि त्यांच्या मुलाला कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. रत्नागिरी येथील दिवंगत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या कुटुंबीयांची आज शिवसेना नेते व खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार राजन साळवी यांनी सांत्वनपर भेट घेतली. तसेच शिवसेना पूर्ण सर्व ताकदीनिशी सदैव वारीसे कुटुंबीयांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही खासदार संजय राऊत यांनी दिली.

16:33 February 17

दुसरी कसोटी - ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात सर्वबाद २६३ धावा

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये दिल्लीत अरुण जेटली स्टेडियमवर भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद २६३ धावा केल्या आहेत.

15:58 February 17

भगतसिंह कोश्यांरींचा थेट नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने काढला जोरदार चिमटा

मुंबई : माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे थेट नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा चांगलाच चिमटा काढला आहे. एनसीपीच्या ट्विटर हँडलवर एक उपहासात्मक प्रगतीपुस्तक दिले आहे. त्यामध्ये व्हॉट्सअप विद्यालयाचे गुणपत्रक असल्याचे त्यात दाखवण्यात आले आहे. त्यातील प्रगती शब्द खोडून अधोगती असे लिहिले आहे. तसेच इतिहासात शून्य गुण दाखवण्यात आले आहेत. सोबतच्या पत्रात सदर विद्यार्थी भलताच कलागती असल्याच्या आशयाचा मजकूर देण्यात आला आहे.

15:42 February 17

पृथ्वी शॉसोबत मारहाण आणि भांडण प्रकरणी सपना गिलला अटक, 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई - सोशल मीडियावर प्रभावी असणाऱ्या सपना गिलला पृथ्वी शॉसोबत मारहाण आणि भांडण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. तिला पोलिसांनी ओशिवरा पोलीस ठाण्यातून अंधेरी न्यायालयात नेले आहे. तिची 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

15:35 February 17

पालिका अधिकारी मारहारण प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक पूर्व जामीन मंजूर

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक पूर्व जामीन मंजूर झाला आहे. पालिका अधिकारी यांना मारहारण केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आज सकाळी आव्हाड यांच्या वकिलांनी अटकपूर्व जमीनसाठी अर्ज केला होता. त्यानंतर आता आव्हाड यांचा अटक पूर्व जामीन मंजूर झाला आहे.

15:20 February 17

सुशांत प्रकरणी 8 आरोपींच्या आवाजांचे नमुने एनसीबी नोंदवणार

मुंबई - सुशांत सिंह राजपूत प्रकरणी तब्बल दोन वर्षांनी विशेष न्यायालकडून एनसीबीला आवाज घेण्याची अनुमती दिली आहे. कथित ड्रग प्रकरणासंदर्भात आठ आरोपींच्या आवाजांचे नमुने आता एनसीबीकडून नोंदवले जाणार आहेत.

15:16 February 17

वारीशे खून प्रकरणी संजय राऊत यांनी उपस्थित केले कळीचे सावल, निःपक्षपाती तपासावर शंका

रत्नागिरी - वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे होईल का अशी शंका खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केली आहे. वारिशे यांच्या खुनाच्यावेळी तेथील सीसीटीव्ही एकाचवेळी बंद कसे होते, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. त्याचबरोबर आपल्यालाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न केला गेला होता असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

15:09 February 17

बोईसर-तारापूरात फार्मा कंपनीत स्फोट, कामगार ठार

पालघर - बोईसर-तारापूर परिसरातील फार्मा कंपनीत झालेल्या स्फोटात एक कामगार ठार झाला तर चार जखमी झाले. स्फोट झाला तेव्हा कंपनीत ४९ कामगार होते. तारापूर अग्निशमन दलाने ही माहिती दिली आहे.

15:06 February 17

प्रतिक्रिया देऊन फडणवीसांचे महत्व वाढवायचे नाही - शरद पवार

पुणे - देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीसंदर्भात त्यांच्या म्हणण्याचा पुनरुच्चार केला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या मतावर प्रतिक्रिया देऊन त्यांचे महत्व वाढवायचे नाही असे म्हटले आहे.

14:52 February 17

फार्म हाऊसमध्ये माय लेकीवर जीवघेणा हल्ला;आईचा मृत्यू, मुलगी गंभीर

ठाणे : मायलेकी फार्म हाऊसमध्ये असतानाच चहा पिण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या हल्लेखोराने आई व मुलीवर जीवघेणा हल्ला केला. धक्कादायक बाब म्हणजे या हल्ल्यात आईचा मृत्यू झाला. तर मुलगी गंभीर जखमी आहे. या दोघांना वाचविण्याच्या आलेल्या सुरक्षा रक्षकावरही वार करून त्याला जखमी केले आहे. ही घटना मुरबाड शहरानजीक असलेल्या डोहळ्याचा पाडा येथील फार्म हाऊसवर घडली आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून फरार हल्लेखोर भरत मधुकर हरड याचा शोध सुरू केला आहे.

14:22 February 17

सहआयुक्त मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी

ठाणे - सहआयुक्त मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी कार्यकर्ते यांना 20 तारखेपर्यंत 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.

14:14 February 17

मोबाईल पहाताना रागावल्याच्या कारणातून मुलाने आईचा केला खून

पुणे : उरळी कांचन येथे एक विचित्र खून झाला आहे. अभ्यास करताना मोबाईल पाहात असलेल्या मुलाला आईने रागावले. त्यामुळे बारावीत शिकणार्‍या एका मुलाने आईला भिंतीवर ढकलून दिले. त्यानंतर तिचा खून केला आहे.

14:11 February 17

ठाणे जिल्ह्यात अवैध टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश; एकाला अटक

ठाणे - पोलिसांनी बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज चालवणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय कॉल स्थानिक नंबरवर वळवणाऱ्या 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने आज एएनआयला ही माहिती दिली. बुधवारी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकल्यानंतर तबरेज सोहराब मोमीन याला भिवंडी येथून अटक करण्यात आली, असे भोईवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश बांगर यांनी सांगितले.

13:58 February 17

गोवंडीत दीड लाखांच्या ई सिगारेट जप्त, 3 आरोपींना अटक

मुंबई - गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दीड लाखांच्या ई सिगारेट जप्त केल्या आहेत. या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.

13:55 February 17

भिवंडीत आग लागून कारखाना जळून खाक, मनुष्यहानी नाही

ठाणे - भिवंडी येथील यंत्रमाग निर्मिती कारखान्याला शुक्रवारी सकाळी आग लागली, असे एका नागरी अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले. नारपोली परिसरात असलेल्या युनिटला लागलेल्या आगीत कोणीही जखमी झाले नाही, असे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले.

13:46 February 17

अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ इटानगरमध्ये आंदोलन

इटानगर - अरुणाचल प्रदेश लोकसेवा आयोग (APPSC) पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ इटानगरमध्ये सुरक्षा कर्मचारी आणि आंदोलकांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी सुरक्षा रक्षकांना विद्यार्थ्यांना नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा लागला.

13:03 February 17

वर्धा जिल्हा पुरवठा अधिकारी 20 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

वर्धा - उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना 20 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. स्वस्त धान्य दुकानदाराकडून लाच स्वीकारताना अटक करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

12:34 February 17

उद्धव ठाकरे यांचीच खरी शिवसेना, 21 फेब्रुवारीला सत्याचा विजय होईल - संजय राऊत

मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना आहे. तसेच 21 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल तेव्हा सत्याचा विजय होईल, असे ठामपणे सांगितले आहे. शिवसेनेच्या विभाजनामुळे जून 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाशी संबंधित याचिका 2016 च्या नबाम रेबियाच्या निकालाचा पुनर्विचार करण्यासाठी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठविण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. त्यानंतर ही प्रतिक्रिया आली आहे.

12:21 February 17

आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास सत्ता संघर्षावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई - सुप्रीम कोर्टातील आजच्या निरीक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. लोकशाहीत बहुमताने सत्तेवर येणे खूप मोलाचे असते. आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम करत आहोत. त्यामुळे न्यायपालिकेने गुणवत्तेच्या आधारे निर्णय घ्यावा, अशी आमची इच्छा आहे.

12:04 February 17

ट्विटरने मुंबई-दिल्लीतील कार्यालये केली बंद, कामगारांना सांगितले वर्क फ्रॉम होम

नवी दिल्ली - ट्विटरने त्यांच्या दिल्ली आणि मुंबईतील कर्मचाऱ्यांना घरी घालवले आहे. त्यांना घरून काम करण्यासाठी सांगण्यात आहे. ट्विटरला खर्च कमी करायचा आहे. त्यासाठी कामगारकपातीऐवजी आपण कार्यालये बंद करुन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्विटरने स्पष्ट केले आहे.

11:53 February 17

गोदरेजने घेतला राज कपूर यांचा बंगला, आलिशान अपार्टमेंट बांधणार

मुंबई : गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने ज्येष्ठ चित्रपट कलावंत दिवंगत राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर येथील बंगला एक आलिशान गृहनिर्माण प्रकल्प विकसित करण्यासाठी विकत घेतला आहे. ही जमीन राज कपूर यांचे कायदेशीर वारस असलेल्या कपूर कुटुंबाकडून खरेदी करण्यात आली होती, असे गोदरेज कंपनीने म्हटले आहे.

11:32 February 17

महाराष्ट्राच्या राजकीय प्रकरणे लगेचच 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठविण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या राजकीय संकटाशी संबंधित प्रकरणे लगेचच मोठ्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठविण्यास नकार दिला आहे. वास्तविक 2016 च्या नबाम रेबियाच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर पुनर्विचार करण्यासाठी या मोठ्या खंडपीठाकडे निर्णय सोपवला जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी तात्पुरती ही शक्यता संपुष्टात आली आहे.

09:48 February 17

गॅस टँकरची ट्रकला धडक, चार जण ठार

अजमेर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री गॅस टँकरने ट्रकला धडक दिल्याने चार ठार झाले आहेत.

09:32 February 17

सोन्याच्या कारखान्यात हेराफेरी करणाऱ्या मॅनेजर, सिक्युरिटी गार्डसहित चार जणांना अटक

मुंबईच्या वनराई पोलिसांनी सोन्याच्या कारखान्यात हेराफेरी करणाऱ्या प्रोसेसिंग मॅनेजर आणि सिक्युरिटी गार्डसहित चार जणांना अटक केली आहे. अटक केलेले चारही जण मागील चार महिन्यापासून सिक्युरिटी गार्ड सोबत मिळून चोरी करत होते. या चौघांनी चोरी केलेल्या मालाची अंदाजे किंमत एक कोटी 56 लाख रुपये इतकी असल्याचे समजते.

09:03 February 17

शिर्डीला सहलीसाठी आलेल्या तब्बल शंभर विद्यार्थांना अन्नातून विषबाधा

अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या तब्बल शंभर विद्यार्थांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथिल आदर्श हायस्कूल येथील हे विद्यार्थी आहेत. दोन दिवसापासून ते सहलीसाठी निघाले होते. शिर्डीत येण्यापुर्वी दुपारचे जेवन केले. त्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतले. रात्री देवगड येथे मुक्कामी निघले असताना मुलांना उलट्या आणि जुलाब सुरु झाले.

08:12 February 17

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज पदभार स्वीकारणार

नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस आज मुंबईत पदभार स्वीकारणार आहेत. तर मावळते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्रातून उत्तराखंडला जाणार आहेत.

08:04 February 17

यूट्यूबच्या सीईओ पदी भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन यांची नियुक्ती

यूट्यूबच्या सीईओपदावरून सुसान वोजिककी पायउतार होत आहेत. त्यांच्या जागी भारतीय-अमेरिकन नील मोहन येणार आहेत.

07:34 February 17

६० तासानंतर प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिल्ली व मुंबईमधील बीबीसी कार्यालय सोडले

मंगळवारी सकाळी 11:30 च्या सुमारास दिल्ली आणि मुंबईतील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (BBC) कार्यालयात प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यास सुरुवात केली. ही तपासणी सुमारे ६० तास चालली. बीबीसीने यावर म्हटले आहे, की बीबीसी ही विश्वसनीय, स्वतंत्र अशी माध्यम संस्था आहे. कोणतेही भय व पक्षपातीपणा न करता आमचे काम सुरूच ठेवणार आहोत.

07:28 February 17

जम्मू-काश्मीरच्या कटरा येथे भूकंपाचे धक्के

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार शुक्रवारी पहाटे जम्मू-काश्मीरच्या कटरा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. आज पहाटे ५.०१ वाजता रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला. भूकंपाची खोली 10 किमी इतकी नोंदवण्यात आली आहे.

07:19 February 17

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला आलेल्या धमकीच्या फोनचा तपास सुरू

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला आलेल्या धमकीच्या फोनचा तपास सुरू केला आहे. आमदार असल्याचा दावा करणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील सह पोलीस आयुक्तांना फोन करून शेजारच्या मीरा-भाईंदर परिसरात बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा केला होता.

07:18 February 17

25 वर्षे फरार झाल्यानंतर चेक फसवणूक प्रकरणात अटक

मुंबई, गेल्या 25 वर्षांपासून फरार असलेल्या 62 वर्षीय व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मध्य मुंबईतील रफी अहमद किडवाई मार्गावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

07:10 February 17

एकाच महिन्यात भाजपच्या चार प्रमुख कार्यकर्त्यांची हत्या

एका महिन्यात बस्तर भागात भाजपच्या चार प्रमुख कार्यकर्त्यांची हत्या झाली. भाजप कार्यकर्त्यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे काँग्रेस अस्वस्थ झाली असून हा कटाचा भाग आहे असे मला वाटते. हे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी असल्याचा आरोप छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी केला आहे.

07:07 February 17

तुर्कस्तान आणि सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांची संख्या ४१ हजारांहून अधिक

तुर्कस्तान आणि सीरियाला उद्ध्वस्त करणाऱ्या भूकंपातील मृतांची संख्या ४१,००० च्या वर गेली आहे.

06:31 February 17

Maharashtra Breaking News: सिमेंट ब्लॉक कोसळून २ ठार झालेल्या घटनेत बिल्डिंग सुपरवायझरसह ३ जणांना अटक

मुंबई: मुंबईतील इमारतीच्या 42 व्या मजल्यावरून सिमेंटचे ब्लॉक पडून दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका बांधकामाधीन इमारतीच्या पर्यवेक्षकासह तिघांना अटक केली आहे.

Last Updated : Feb 17, 2023, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.