मुंबई - वांद्रे युनिटच्या अँटी नार्कोटिक्स सेलने अंधेरी येथून दोन विदेशी अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 11 लाख रुपयांच्या एमडीसह अमली पदार्थ जप्त केले आहेत. एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Breaking News Live : अंधेरीतून 2 विदेशी अंमली पदार्थ तस्करांना अटक - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
18:26 February 02
अंधेरीतून 2 विदेशी अंमली पदार्थ तस्करांना अटक, 11 लाख रुपयांचे एमडी जप्त
18:03 February 02
कोल्हापूर - जिल्हा बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात
कोल्हापूर - जिल्हा बँकेच्या 5 कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांनी घेतले ताब्यात. जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांचा विरोध. Ed ने ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांमध्ये डॉ. अशोक माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, आर जे पाटील, व्यवस्थापक (CMA) साखर कारखाना, अल्ताफ मुजावर उप व्यवस्थापक (साखर कारखाना कर्ज वाटप विभाग), सचिन डोंडकर, निरीक्षक (साखर कारखाना कर्ज वाटप विभाग)
17:34 February 02
जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा श्री श्री रविशंकर गुरुजींनी फोनवर आशीर्वाद दिला - मुख्यमंत्री
जालना - आम्ही कार्यक्रम केला म्हणून असे कार्यक्रम होऊ लागले म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन ठाकरे सरकारला टोला लगावला. आज जालन्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्यावतीनं भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.. त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते.. आम्ही जेव्हा गुवाहाटीला होतो तेव्हा गुरुजींनी मला फोन करून आशीर्वाद दिला होता.. असा खुलासाही मुख्यमंत्र्यांनी केलाय..
16:56 February 02
महाराष्ट्र एटीएसने पीएफआय प्रकरण संदर्भात मुंबई सत्र न्यायालयात केले आरोपपत्र दाखल
मुंबई - महाराष्ट्र एटीएसने पीएफआय प्रकरणाच्या संदर्भात मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात 21 जणांना एजन्सीने अटक केली होती. यात मुंबईतील 5 जणांचा समावेश आहे. एटीएसने 4 एफआयआर दाखल केले होते.
15:59 February 02
सुकमामध्ये सात माओवाद्यांना अटक
सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा येथे सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांनी सात माओवाद्यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेले सर्व ७ जण निम्मलागुडेमच्या रिव्होल्युशनरी पीपल्स कौन्सिल (RPC) या बंदी घातलेल्या CPI माओवादी पक्षाचे सदस्य होते. केंद्रिय राखीव पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
15:01 February 02
निकालापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले समर्थकांचा जल्लोष
नागपूर - विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकालाची प्रतीक्षा अद्याप कायम असली तरी महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबालेंची वाटचाल निर्णायक आघाडीच्या दिशेने सुरू असल्याने अडबाले समर्थकांनी जल्लोष करण्यात सुरुवात केली आहे. उत्साही कार्यकर्त्यांनी ढोलताश्याच्या गजरात गुलालाची उधळण सुरू केली आहे. सुधाकर अडबाले हे पहिल्या फेरीत पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. मात्र,प्रत्यक्षात निकालाची घोषणा होण्यास अजून काही तास लागू शकतात.
13:59 February 02
बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी यांचे निधन
मुंबई - हभप बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी यांचे आज सकाळी मुंबई नेरूळ येथे निधन झाले.अंत्ययात्रा संध्याकाळी ५ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. अमरधाम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
13:54 February 02
परदेशी विद्यापीठांसंदर्भात सूचनांसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
नवी दिल्ली - UGC (युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन) ने भारतातील परदेशी उच्च शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसची स्थापना आणि संचालन विनियम, 2023 साठी टिप्पण्या, सूचना, फीडबॅक मिळविण्याची अंतिम तारीख आता 20 फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.
12:56 February 02
सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द
सोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या सत्र परीक्षा अचानकपणे रद्द. विद्यार्थ्यांत गोंधळाची परिस्थिती. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी परिक्षेवर बहिष्कार घातला आहे. एबीव्हीपीची महाविद्यालयाबाहेर घोषणाबाजी केली.
12:24 February 02
हिंडेनबर्ग अहवालाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीची विरोधकांची मागणी
नवी दिल्ली - अदानी एंटरप्रायझेसच्या विरोधात हिंडेनबर्ग अहवालाची संयुक्त संसदीय समितीने चौकशी करण्याची विरोधकांनी मागणी केली आहे.
11:49 February 02
स्कॉर्पिओ व हायवा ट्रकची समोरासमोर धडक, स्कॉर्पिओ चालक ठार
वसई - मुंबई अहमदाबाद महामार्गांवरील खानीवडे टोल नाक्याजवळ भीषण अपघात झाला आहे. स्कॉर्पिओ व हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाली. स्कॉर्पिओचा टायर फुटल्याने अपघात घडला आहे. स्कॉर्पिओ चालकाचा जागीच मृत्यू झाला तर ट्रक चालक जखमी झाला आहे.
11:39 February 02
मुस्लीम महिला केवळ कोर्टातच घटस्फोट घेऊ शकतात-मद्रास उच्च न्यायालय
मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे की मुस्लीम महिला केवळ कोर्टातच घटस्फोट घेऊन विवाह मोडण्याचा अधिकार वापरू शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे.
11:37 February 02
तेलुगू देसम पार्टीचे नेते वेन्ना बालाकोटी गोळीबारात जखमी
तेलुगू देसम पार्टीचे नेते, आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील रोमपिचेर्ला मंडलातील वेन्ना बालाकोटी रेड्डी यांच्यावर बुधवारी त्यांच्या राहत्या घरी गोळी झाडण्यात आला. या घटनेत ते जखमी झाले आहेत.
11:36 February 02
अदानी समूह आरबीआयच्या रडारवर, मागविली सर्व माहिती
भारताच्या मध्यवर्ती बँकेने अदानी समुहाच्या कंपन्या, सरकारी आणि बँकिंग स्त्रोतांशी त्यांच्या एक्सपोजरचे तपशील मागितले आहेत.
11:23 February 02
राज्यसभा व लोकसभेचे कामकाज दोन दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित
राज्यसभा व लोकसभेचे कामकाज दोन दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. अदानी प्रकरणावरून विरोधकांनी दोन्ही सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
10:05 February 02
मतमोजणी सुरू असतानाच सत्यजित तांबे जिंकल्याचे पुण्यात लागले बॅनर
निकालाआधीच सत्यजित तांबे जिंकल्याचे पुण्यात बॅनर लागले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
09:50 February 02
केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पनची आज अखेर सुटका
केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पनची आज अखेर सुटका झाली आहे. उत्तर प्रदेश सरकारने यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून सोडण्यात आले.
09:34 February 02
भाजपकडून देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त-संजय राऊत
मुंबईत भाजपच्या टोळधाडी येत आहेत. मुंबईच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. मुंबईला बजेटमधून काय मिळाले, असा प्रश्न खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
09:34 February 02
अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पीडितेचा अखेर मृत्यू
18 दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर अॅसिड हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गीता विरकर नावाच्या 54 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
09:11 February 02
बॉम्बे लॉयर्स असोसिएशनची केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्याविरोधात जनहित याचिका
बॉम्बे लॉयर्स असोसिएशनने काल बॉम्बे हायकोर्टात उपाध्यक्ष जगदीप धनकर आणि केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या न्यायव्यवस्थेबद्दलच्या विधानांविरोधात एक जनहित याचिका दाखल केली आहे.
08:24 February 02
भारतीय सैन्याला स्फोटके पुरविण्याऱ्या कंपनीवर सायबर हल्ला, पोलिसांकडून तपास सुरू
नागपूरच्या बाजारगाव येथील स्फोटक तयार करणाऱ्या सोलर इंडस्ट्रीजवर सायबर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. सोलर ग्रुप स्फोटके तयार करणारा देशातील अग्रणी समूह आहे. अज्ञात सायबर हल्लेखोरांनी सोलर इंडस्ट्रीजच्या सर्वर सिस्टीमवर सायबर हल्ला करून अत्यंत गोपनीय डेटा चोरलेल्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या आधारे नागपूरच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवण्यात आली असून तपास सुरू झाला आहे.
07:05 February 02
भारताचे G20 अध्यक्षपद एक महत्त्वाचा क्षण, युएनडीपीने केले स्वागत
भारताचे G20 अध्यक्षपद एक महत्त्वाचा क्षण आहे. यात महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. भारताने आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात ठरवलेल्या प्राधान्यक्रमांचे स्वागत करतो, असे युएनडीपीचे प्रशासक अचिम स्टेनर यांनी सांगितले.
07:03 February 02
डिलिव्हरी बॉयच्या हत्येप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी नउ जणांना केली अटक
डिलिव्हरी बॉय अंकुश याच्या पेट्रोल पंपावर झालेल्या भांडणानंतर झालेल्या हत्येप्रकरणी मीरा रोड पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष सिंगसह नऊ जणांना अटक केली. तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी अविनाश अंबुरे यांनी सांगितले.
06:59 February 02
शीझानच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी करा- तुनिषा शर्माच्या काकांची गृहविभागाकडे मागणी
आम्ही गृहविभागात गेलो आणि त्यांना हा खटला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात हलवण्याचे आवाहन केले. या कटात सहभागी असलेल्या आरोपी शीझानच्या कुटुंबातील इतर सदस्यांचीही चौकशी झाली पाहिजे, असे आवाहन केल्याचे तुनिषा शर्माचे काका पवन शर्मा यांनी सांगितले.
06:54 February 02
विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आज निकाल, दुपारनंतर निकाल येण्याची शक्यता
विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आज निकाल लागणार आहेत. सकाळी पाच ठिकाणी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
06:19 February 02
Maharashtra Breaking News : ठाण्यातील फुटीच्या भितीची अजित पवारांनी घेतली दखल!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा जोरदार सुरू असताना विरोधी पक्ष नेते दस्तुरखुद्द अजित पवार यांनी बुधवारी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठीकीत अजित पवारांनी नगरसेवकाची शाळा घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. बैठकीत अजित पवारांनी आपल्या भाषेत नगरसेवकाचे चांगलेच कान टोचले आहेत. दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक उपस्थित नसल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.