मुंबई - तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी वालीव पोलिसांनी आरोपी शीजान खानविरुद्ध वसई न्यायालयात 524 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपी शीझान खानच्या जामीन अर्जावर उद्या मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
Breaking News : तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी शीजान खानविरुद्ध वसई न्यायालयात 524 पानी आरोपपत्र दाखल - Maharashtra political news
22:33 February 16
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी आरोपी शीजान खानविरुद्ध वसई न्यायालयात 524 पानी आरोपपत्र दाखल
21:21 February 16
सांताक्रुजमध्ये वरंड्यात महिला नग्न अवस्थेत फिरत होती; घरमालकासह महिलेवर गुन्हा दाखल
सांताक्रुज येथील वाकोला परिसरातील दत्त मंदिर रोड, गावदेवी येथे असलेल्या इमारतीत घरमालक एका महिलेस इमारतीत आणत असे. नंतर मजल्याच्या वरंड्यात संबंधित महिला नग्न अवस्थेत फिरत होती.
याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात घरमालक आणि महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी माहिती ई टीव्ही भारतशी बोलताना वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप मोरे यांनी दिली आहे.
21:14 February 16
विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे शिक्षकांचे कर्तव्य - न्यायालय
मुंबई - मुलींचे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी शिक्षकाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. यावर विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे असे, न्यायालयाने म्हटले आहे.
20:46 February 16
छत्रपती शिवाजी महाराजांची इतिहासात प्रथमच होणार महाआरती, शिववंदना
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरीवर राज्य सरकार इतिहासात प्रथमच महाआरती, शिववंदना करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन दिवस महोत्सव साजरा केला जाणार असल्याची माहिती, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. सरकारच्या निर्णयामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.
19:43 February 16
आयआयटीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या चौकशीसाठी एसआयटी नेमा - मेवाणी यांची मागणी
अहमदाबाद/मुंबई - गुजरात काँग्रेसचे आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
19:25 February 16
जेपीसी व्यतिरिक्त कोणतीही समिती ही अदानींना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्नच - काँग्रेस
नवी दिल्ली - अदानी प्रकरणाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जेपीसी व्यतिरिक्त कोणतीही समिती नेमणे म्हणजे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा करण्यासाठीचीच योजना असेल अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, सरकारने समिती स्थापन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेल्या प्रस्तावातून पारदर्शकता दिसून येत नाही.
18:44 February 16
सेल्फी नाकारल्याने क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या गाडीवर हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल
मुंबई - सांताक्रूझ येथील एका आलिशान हॉटेलबाहेर पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वाद झाला होता. त्यानंतर शॉच्या कारवर एका व्यक्तीने बेसबॉल बॅटने हल्ला केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. बुधवारी पहाटे घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी एका महिलेसह 8 जणांविरुद्ध दंगल आणि खंडणीच्या कलमान्वरे गुन्हा दाखल केला आहे.
18:19 February 16
संशोधन विद्यार्थ्याचे आमरण बेमुदत उपोषण, एका विद्यार्थ्याची खालावली तब्येत
पुणे : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती 2018 मधील पीएच डी च्या 214 विद्यार्थ्यांना युजीसी, सारथी, महाज्योतीच्या नियमानुसार पाच वर्ष फेलोशिप देण्यात यावी. तसेच एम फिलच्या संशोधक विद्यार्थ्यांना यूजीसी नियमानुसार 5 वर्ष फेलिशिप देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर आम्हा विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात यावी या मागणीसाठी बार्टीच्या कार्यालयाबाहेर गेल्या 4 दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणात एका विद्यार्थ्याची तब्येत देखील खालावली आहे.
18:14 February 16
नाशिक जिल्ह्यात उसाच्या शेतात सापडले बिबट्याचे दोन नवजात बछडे
नाशिक - मरळ गावात मंगळवारी सकाळी उसाच्या शेतात बिबट्याची दोन नवजात पिल्ले आढळून आली. वनविभाग आणि बचाव पथकाने या बछड्यांची सुटका केली,अशी माहिती एएनआयने दिली आहे.
18:05 February 16
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 80 ट्क्केपेक्षा जास्त मतदान
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी दुपारी ४ वाजेपर्यंत ८१ टक्के एवढी नोंद केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने ही माहिती दिली आहे.
18:00 February 16
उच्च न्यायालयाने टिपण्णी केलेल्या प्रकरणातील सावकारांची टोळी दोन वर्षांसाठी तडीपार
सातारा - नवरा तुरुंगात असल्याने आर्थिक गरजेसाठी एका आईने पोटच्या मुलीची विक्री केली होती. मुलीला विकत घेतल्याचा आरोप असलेल्या महिलेला जामीन मंजूर करताना 'वस्तू मानून मुलीचा आर्थिक फायद्यासाठी वापर आक्षेपार्ह आहे. विक्री शब्द वापरतानाही अत्यंत वेदना होत आहेत', अशी टिपण्णी केली होती. त्याची गंभीर दखल घेत जामीन मिळालेल्या महिलेसह खासगी सावकारी करणाऱ्या टोळीला सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
17:17 February 16
महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी रमेश चेन्निथला यांची नियुक्ती - खरगे
नवी दिल्ली - काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रमेश चेन्निथला यांची महाराष्ट्रातील ताज्या राजकीय परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आणि त्यांना पुढील अहवाल देण्यासाठी नियुक्त केले आहे.
17:10 February 16
मालाड आगीत नुकसानग्रस्तांना 35 हजार रुपयांची विशेष बाब म्हणून मदत
मुंबई - मालाड येथील आगीत नुकसान झालेल्यांना 35 हजार रुपयांची विशेष बाब म्हणून मदत करण्यात येईल. आगीत 60 घरे जाळली होती. यातील प्रत्येकी 35 हजार रुपयांची मदत देण्यात आली याहे.
17:04 February 16
उस्मानाबादचे धाराशिव होणार, हायकोर्टात केंद्राची स्पष्टोक्ती, औरंगाबाद विचाराधीन
मुंबई : राज्यातील नामकरणासंदर्भात केंद्राने उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. त्याचवेळी औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्याबाबत केंद्रसरकार अजूनही विचार करत असल्याचे केंद्राच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात येत्या 27 फेब्रुवारीला पुढील सुनावणी होईल. तोपर्यंत याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल असे राज्यसरकारने स्पष्ट केले आहे.
16:59 February 16
आयआयटी विद्यार्थ्याचा मृत्यू: जबाबासाठी मुंबई पोलिसांचे पथक अहमदाबादमध्ये
मुंबई - आयआयटी कॅम्पसमध्ये कथितरित्या आत्महत्या केलेल्या विद्यार्थी दर्शन सोलंकीच्या पालकांचे जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी गुरुवारी गुजरातला भेट दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पवई पोलिसांचे तीन सदस्यीय पथक गुजरातला गेले आहे. सकाळी अहमदाबाद शहरातील मणिनगर येथे सोलंकी यांच्या घरी पोहोचले आणि त्यांचे जबाब ते घेतील.
16:43 February 16
अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी श्रीलंकेच्या अध्यक्षांवर मोदींचा दबाव - पृथ्वीराज चव्हाण
सातारा - श्रीलंकेतील एका कामाचे कॉन्ट्रॅक्ट अदानीला देण्यासाठी मोदींनी श्रीलंकेच्या अध्यक्षांवर दबाव आणल्याचा सनसनाटी आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेसच्या हात से हात जोडो अभियानात ते बोलत होते. नरेंद्र मोदींची जगभ्रमंती ही अदानीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठीच होती का, असा सवालही त्यांनी केला.
16:23 February 16
ठाण्यात एकाने 11 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून केला खून, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
ठाणे - पोलिसांनी अंबरनाथ येथून एका व्यक्तीला त्याच्या 11 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. 40 वर्षीय आरोपीने बुधवारी रात्री उशिरा हा गुन्हा केल्याचे त्यांनी सांगितले.
16:08 February 16
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी : शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.
16:04 February 16
खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे कसब्यात भाजपच्या प्रचारसभेत
पुणे - कुख्यात गुंड संदीप मोहोळ खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेले जामीनावर बाहेर असलेले आरोपी गिरीश महाजनांसोबत भाजपाच्या प्रचारात फिरत आहेत. भाजपाचे कसबा विधानसभेचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मोकातील जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्तीची उपस्थिती पाहून लोकांच्या भुवया उंचावत आहेत.
15:56 February 16
सहाय्यक आयुक्त मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांच्या समर्थकांना अटक
ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक अभिजीत पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर आणि विश्वंत गायकवाड यांना नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे सहाय्यक महापालिका आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी त्यांना ठाणे न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
15:38 February 16
शिंदे सरकारला दिलासा, सुप्रीम कोर्टाने शिंदे-ठाकरे खटल्याचा निकाल ठेवला राखून
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे-शिंदे वादावरील खटल्याचा निर्णय आज राखून ठेवला. या प्रकरणी दोन्ही बाजूचे युक्तीवाद आज संपले. न्यायालयाने निर्णय राखून ठेवताना, पुढील तारीख मात्र दिलेली नाही. त्यामुळे निकाल कधी लागणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. तसेच हे प्रकरण मोठ्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवायचे काय याचाही निकाल लागलेला नाही. विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची याचिकाही अनिर्णित आहे. या प्रकरणातील सर्व बाजू मात्र न्यायालयाने ऐकून घेतल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एमआर शाह, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि पीएस नरसिंहा यांच्या पाच सदस्यीय खंडपीठाने हा संपूर्ण खटला ऐकला आहे. मात्र पुढील कारवाई नेमकी काय करणार याचा निर्णय राखून ठेवला आहे.
15:14 February 16
याचिकांमुळे मेट्रो कारशेड प्रकल्पाला विलंब, एमएमआरसीएलची हायकोर्टात तक्रार
मुंबई - मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले की, आरे कॉलनीतील कारशेडच्या बांधकामास विलंब होत आहे. न्यायालयीन खटल्यांमुळे जनतेच्या पैशाचे नुकसान होत आहे.
15:03 February 16
सॉफ्टवेअर इंजिनियर पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी बनला हॅकर, मुंबई पोलिसांनी यूपीहून केली अटक
सॉफ्टवेअर इंजिनियर पत्नीला इम्प्रेस करण्यासाठी एक सॉफ्टवेअर इंजिनियरच हॅकर बनला होता. त्याने पोलिसांचीच वेबसाईट हॅक केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला यूपीहून अटक केली आहे.
14:46 February 16
ठाण्यात गोळीबार प्रकरणी गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डवर गुन्हा
ठाणे - लोकांना घाबरवण्यासाठी परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केल्याप्रकरणी एका गृहनिर्माण संकुलाच्या सुरक्षा रक्षकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका अधिकाऱ्याने गुरुवारी ही माहिती दिली.
14:40 February 16
एल निनोमुळे उपमुख्यमंत्रीही सतर्क, अधिकाऱ्यांना दुष्काळ निवारण नियोजनाच्या दिल्या सूचना
मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षी दुष्काळाच्या शक्यतेमुळे सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
14:35 February 16
कसबा निवडणुकीच्या प्रचारात स्वारगेट पोलिसांना मिळाली सहा लाखांची रोकड
पुणे - कसबा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वारगेट पोलिसांना पाच ते सहा लाखांची रोकड आढळली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये निवडणूक अधिकारी याची चौकशी करत आहेत. गाडी चालकाकडून योग्य उत्तर मिळत नसल्याने निवडणुकीसाठीच कॅश आणली असल्याचा संशय बळावला आहे.
14:30 February 16
भिवंडीतील स्लॅब कोसळल्या प्रकरणी इमारत मालकावर गुन्हा दाखल, अटक मात्र नाही
ठाणे - भिवंडी येथील एका इमारतीच्या महिला मालकावर 27 जानेवारी रोजी स्लॅब कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात एकाचा मृत्यू झाला आणि आठ दुकानांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी महिलेवर बुधवारी भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत मनुष्यवधाचा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही, असे निजामपुरा पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
14:26 February 16
पूर्वपत्नीचा खून प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा
ठाणे - न्यायालयाने एका 40 वर्षीय व्यक्तीला माजी पत्नीचा पाठलाग करून मारल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कल्याण न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस गोरवाडे यांनी मंगळवारी हा आदेश दिला. त्याचे वृत्त आज पीटीआयने दिले आहे. या आदेशात आरोपी नारायण नागो पारधी याला ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. त्याचा भाऊ गोविंद नागो पारधी (३७) याच्यावरही याच खटल्यात आरोप दाखल केले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
14:06 February 16
आसनगाव स्थानकाजवळ धावत्या लोकल ट्रेनच्या चाकाला आग
ठाणे - जिल्ह्यातील आसनगाव स्थानकाजवळ गुरुवारी सकाळी धावत्या लोकल ट्रेनच्या चाकाला आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एक प्रवासी थांबलेल्या ट्रेनमधून उडी मारताना दिसत आहे. सर्वांनाच या गाडीतून उतरवण्यात आले होते.
13:18 February 16
नागरिकांच्या घरात दूषित व घाणेरडे पाणी जात असल्याने राष्ट्रवादी आक्रमक
र्ध्याच्या आर्वी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने राडा केला. नागरिकांच्या घरात घाणेरडे पाणी व त्यात पडलेल्या अळ्या यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे.
13:15 February 16
सिलिंडरच्या स्फोटात जखमी झालेल्या नेपाळच्या खासदारावर मुंबईत होणार उपचार
एलपीजी सिलिंडरच्या स्फोटात नेपाळच्या खासदाराच्या आईचा होरपळून मृत्यू झाला आहे. खासदारांना उपचारासाठी विमानाने मुंबईला आणण्यात येणार आहे
12:56 February 16
राज्यातील माजी मंत्र्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
पुणे : युती शासनात 1995 ला राज्यमंत्री असलेल्या एक लोकप्रतिनिधी माजी आमदारावर पुण्यातील बिबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधीच असे करत असल्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे.
12:46 February 16
पृथ्वी शाॅ सोबत सेल्फी घेण्यावरून वाद, दोघांवर गुन्हा दाखल
मुंबई - क्रिकेटर पृथ्वी शाॅ सोबत सेल्फी घेण्यावरून झालेल्या वादातून बुधवारी पहाटे पृथ्वी शाॅच्या मित्राच्या गाडीवर हल्ला केला होता. यासंदर्भात आता ओशिवरा पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार व्यावसायिक हा त्याचा मित्र क्रिकेटर पृथ्वी शाॅ सोबत सहारा स्टार हाॅटेल मेन्शन क्लब डोमेस्टीक विमानतळ सांताक्रुझ येथे गेले होते. त्यावेळी आरोपी सना गिल व शोबित ठाकूर यांनी पृथ्वी शाॅ सोबत सेल्फी काढण्याचा आग्रह केला. पृथ्वी शाॅसोबत सेल्फी काढल्यानंतर पुन्हा सेल्फी काढण्यास दोघांनी आग्रह केल्याने हाॅटेल मॅनेजरने दोन्ही आरोपींना हाॅटेलबाहेर काढले.
12:21 February 16
शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद, वकील म्हणाले आमदारांना होता जिवाचा धोका
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात शिंदे-ठाकरे वादावर खटला सुरू आहे. त्यामध्ये आज शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला. त्यामध्ये ते म्हणाले की, आमदारांच्या जीवाला धोका होता. शिवराजसिंह चौहान यांच्या केसचा दाखला त्यांनी दिला. त्यानंतर शिंदे गटाच्या वतीने वकील मनिंदर सिंह युक्तीवाद करत आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेसंदर्भात ते शिंदे गटाची भूमिका मांडत आहेत.
12:16 February 16
बेवारस अफगाणी मुलाला पासपोर्ट जारी करण्यासंदर्भात केंद्राला हायकोर्टाची नोटीस
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने एक वर्षाच्या बेवारस मुलाला भारतीय पासपोर्ट जारी करण्याची मागणी करणाऱ्या पुण्यातील दत्तकपत्र करणाऱ्या संस्थेने दाखल केलेल्या याचिकेवर केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे या अफगाणी मुलाचा दत्तक घेण्याचा मार्ग मोकळा होईल.
11:46 February 16
शरद पवारांसदर्भात मी जे बोललो ते 100 टक्के खरे - देवेंद्र फडणवीस
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुतण्या अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याच्या आपल्या योजनेला पाठिंबा दिल्याच्या विधानावर ठाम असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठासून सांगितले आहे. आपले विधान १०० टक्के खरे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शरद पवार खोटे बोलत असल्याचेही फडणवीस म्हणाले.
11:41 February 16
ठाण्यातील इमारतीला आग, १३ जण बचावले
ठाणे - शहरातील एका चार मजली इमारतीच्या इलेक्ट्रिकल मीटर बॉक्सला आग लागल्याने दोन वर्षांच्या मुलासह 13 जणांना वाचवण्यात यश आले. चरई परिसरात असलेल्या इमारतीला सकाळी 7.30 च्या सुमारास लागलेल्या आगीत कोणीही जखमी झाले नाही, असे ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख अविनाश सावंत यांनी सांगितले.
11:36 February 16
राहुल गांधींचे पंतप्रधानांवरील टिप्पणीवर हक्कभंग नोटीसला उत्तर
नवी दिल्ली - राहुल गांधींनी पंतप्रधानांवरील टिप्पणीवर हक्कभंग नोटीसला उत्तर पाठवले आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान केलेल्या भाषणावर विशेषाधिकार प्रस्तावावर त्यांनी लोकसभा सचिवालयाला उत्तर दिले आहे. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली.
11:32 February 16
गुजरातमधील जीपची ट्रकला धडक, अपघातात 7 जण ठार
गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील वाराहीजवळ आज झालेल्या अपघातात सात जण ठार झाले. त्यांची जीप ट्रकला धडकल्याने ही घटना घडली.
10:23 February 16
कांदिवली एकता नगर परिसरातून बांगलादेशीला अटक
मुंबईतील कांदिवली पश्चिम पोलिसांनी कांदिवली एकता नगर परिसरातून एका बांगलादेशीला अटक केली आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा बांगलादेशी भारतात बेकायदेशीरपणे दाखल झाला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक बांगलादेशी सतत फिरत असल्याची माहिती कांदिवली पोलिसांना मिळाली होती.
10:21 February 16
लातूर शहरात गूढ भूमिगत आवाजाची नोंद
लातूर शहरात गूढ भूमिगत आवाजाची नोंद झाली आहे. लातूर शहराच्या पूर्वेकडील भागात गूढ भूमिगत आवाजाची नोंद झाली आहे, परंतु भूकंपाची कोणतीही हालचाल झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
10:18 February 16
विळ्याने केलेल्या हल्ल्यात महिला, अल्पवयीन मुलगी व सुरक्षा रक्षक जखमी
ठाणे जिल्ह्यात एका व्यक्तीने विळ्याने हल्ला केल्याने एक महिला, तिची अल्पवयीन मुलगी आणि सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
10:01 February 16
जितेंद्र आव्हाड यांचे पोलिसांना पत्र, सहाय्यक आयुक्त आहेरवर गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड यांनी वर्तक पोलिसांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेरवर गंभीर आरोप केले आहेत.
08:58 February 16
निवृत्त सहसचिवाची १० लाखाची फसवणूक
महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातील एका निवृत्त सहसचिवाची १० लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. न्यूयॉर्कमधील आपल्या मुलाच्या बँक खात्यात पैसे पाठवण्यासाठी आर्थिक संस्थेचा संपर्क क्रमांक इंटरनेटवर शोधला असता हा प्रकार घडला आहे.
07:48 February 16
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू
त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू आहे. या निवडणुकीत चौरंगी लढत होत आहे.
07:34 February 16
जावयाने पेटवून दिल्याने सासऱ्याचा जळून मृत्यू
जावयाने पत्नी आणि पाच वर्षाच्या मुलासह सासऱ्याला गोंदिया जिल्ह्यात पेटवून दिले. यात सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर आई-मुलगा 80 टक्के भाजले आहेत.
07:09 February 16
सहायक आयुक्त मारहाणी प्रकरणात जितेंद्र आव्हाडांसह ७ जणांवर गुन्हा दाखल
सहायक आयुक्त मारहाणी प्रकरणात माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांसह ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
06:48 February 16
Maharashtra breaking News : तो आवाज महेश आहेर यांचाच आहे का, पोलिसांनी तपासावे-ऋता आव्हाड
मुंबई : राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील खळबळ उडाली आहे. आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आणि त्यांची मुलगी नताशा या वर्तक पोलीस ठाण्यात रात्री दाखल झाल्या होत्या. ऋता आव्हाड म्हणाल्या, की कुणी तरी नशेत या सत्तेच्या नशेत बोलत आहे. तो आवाज महेश आहेर यांचाच आहे का हे पोलिसांनी तपासावे. बाबाजी यांच्या जमिनीबाबत बोलले जात आहे. पोलिसांनी सर्व काही तपास करावा. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानते त्यांनी प्रकरणाची दखल घेतली असेही ऋता आव्हाड यांनी म्हटले आहे.