मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) CSMI विमानतळावर अदिस अब्बा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडून 7.6 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आल्याचे मुल्य रु. 53 कोटी इतके असल्याचे सांगितले आहे.
Breaking News : नागपूरमध्ये महिला दिनालाच चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या - महाराष्ट्र लाईव्ह अपडेटस
21:51 March 08
Breaking News : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशाकडून 7.6 किलो हेरॉईन जप्त
21:38 March 08
Breaking News : नागपूरमध्ये महिला दिनालाच चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्या
नागपूर : एकीकडे सर्वत्र महिला दिवस अगदी उत्साहात साजरा केला जात असताना, दुसरीकडे नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाने पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ललिता भारद्वाज (४०) असे मृतक महिलेचे नाव आहे. अमर भारद्वाज असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने चारित्र्यावर संशय घेत वाद उकरून काढला, त्यातचं रागाच्या भरात आरोपीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने वार करुन तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून चौकशी सुरू केली आहे.
19:57 March 08
शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणाच जास्त - जयंत पाटील
मुंबई - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कामापेक्षा घोषणाच जास्त झाल्या आहेत. तसेच जाहिरातबाजीवर मोठा जास्त खर्च होत आहे. यामुळे महाराष्ट्राची आर्थिक अधोगती व्हायला लागली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
19:32 March 08
म्हाडाच्या इमारतींवर आता 665.50 रुपये नाही तर पूर्वीप्रमाणे 250 रुपये मासिक सेवाकर - फडणवीस
मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींवर आकारला जाणारा 665.50 रुपयांचा वाढीव मासिक सेवा कर रद्द करणार असल्याचे ते म्हणाले. पूर्वीप्रमाणेच 250 रुपये कर आकारला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
19:23 March 08
नागालँडमध्ये मुख्यमंत्र्यांना समर्थन, भाजपला नाही - शरद पवार
मुंबई - नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपबरोबर युती केल्याने शरद पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चौफेर टीका होत होती. त्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नागालँडमध्ये सर्वसमावेशक सरकार बनवण्यात आले आहे. त्यामध्ये या सरकारच्या मुख्यमंत्र्याला राष्ट्रवादी काँग्रेसने समर्थन दिले आहे. पक्षाने भाजपला समर्थन दिले नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
19:18 March 08
मुंबईत 3 पोलीस स्टेशनमधील पहिले हिरकणी कक्ष सुरू
मुंबई - पोलीस स्टेशनमधील पहिले हिरकणी कक्ष लोअर परळ येथील एन एम जोशी पोलीस ठाण्यात त्याचप्रमाणे आझाद मैदान पोलीस स्टेशन आणि प्रोटेक्शन ब्रँच येथे आजपासून सुरू करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याहस्ते या हिरकणी कक्षांचे उद्घाटन करण्यात आले.
19:06 March 08
आई-वडिलांना घाबरून 3 अल्पवयीन मुली गेल्या पळून, काही तासांतच सापडल्या रेल्वेत
ठाणे - मिरागाव येथील तीन मुली घरातून पळून गेल्या होत्या. त्यामुळे घरच्यांची तारांबळ उडाली. मात्र त्यांचा लगेच शोध घेण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे काही तासांतच ट्रेनमध्ये या तीन मुली सापडल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. रात्री उशिरापर्यंत खेळत बसल्याने आई-वडील रागावतील म्हणून या तिघी पळून जात होत्या.
19:01 March 08
हरित लवादाचा दणका, हायवे कन्स्ट्रक्शन फर्मला पर्यावरण हानीबद्दल 55.47 कोटी रुपयांचा दंड
मुंबई - राष्ट्रीय हरित लवादाने नाशिक आणि हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी दगड, वाळू आणि मुरमाचे अवैध उत्खनन करून पर्यावरणाची हानी केल्याबद्दल महामार्ग बांधकाम कंपनीला 55.47 कोटी रुपये भरण्याचे आदेश दिले आहेत. 22 फेब्रुवारी रोजी दोन वेगळ्या आदेशात, एनजीटीच्या पुण्यातील पश्चिम विभागीय खंडपीठाने राजेंद्रसिंह भांबू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला 36.35 कोटी आणि 19.12 कोटी रुपये एका महिन्यात भरण्याचे निर्देश दिले.
17:29 March 08
ठाण्यात केंद्रीय मंत्र्यांचे भाषण संपताच मंडप कोसळल्याने अनेक महिला जखमी
ठाणे : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) महिलांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. ठाणे जिल्हास्तरीय सरस प्रदर्शन व विक्री उद्घाटन सोहळा शहापूर तालुक्यातील आसनगाव भागात असलेल्या जोंधळे महाविद्यालयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरिराज सिंह यांच्याहस्ते महिला बचत गटाच्या विविध योजनेचे उदघाटन करण्यात आले. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर अचानक कार्यक्रमास्थळाचा मंडप कोसळल्याने अनेक महिला जखमी झाल्या आहेत. तर या घटनेमुळे दिवसभर असलेला कार्यक्रम अर्ध्यावरच गुंडाळावा लागला आहे.
17:19 March 08
महिलांना योग्य वागणूक दिली नाही असे देश मागे राहिले - अजित पवार
मुंबई - विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा अनोख्या शब्दात गौरव केला. जगात ज्या-ज्या देशाने महिलांना योग्य वागणूक दिली नाही असे देश मागे राहिले असे ते म्हणाले. ज्यांनी पुरुषांसोबत महिलांना मान दिला असे देशच प्रगतीपथावर गेले असल्याचे ते म्हणाले.
17:03 March 08
क्रिकेटर उमेश यादवला महिला दिनीच झाली मुलगी, ट्विट करुन दिली माहिती
नागपूर : क्रिकेटर उमेश यादवला मुलगी झाली आहे. महिला दिनाच्या दिवशीच कन्या रत्न प्राप्त झाल्याने उमेश यादव चांगलाच खूश झालेला दिसत आहे. त्याने ट्विटरवर मुलगी झाल्याची माहिती दिली आहे. उमेश यादवचे हे दुसरे आपत्य आहे.
16:51 March 08
वनवासमाचीत महिलेची हत्या, श्वान पथक घटनास्थळी दाखल
सातारा - कराडमध्ये गावाजवळच्या डोंगरात जळण आणण्यासाठी गेलेल्या महिलेची अज्ञाताने दगडाने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लता मधूकर चव्हाण (वय ४५), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वनवासमाची (ता. कराड) येथे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला (मंगळवारी) ही घटना घडली आहे. रात्री उशिरा महिलेचा मृतदेह डोंगरात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. श्वान पथकासही पाचारण करण्यात आले आहे.
15:40 March 08
छत्रपती संभाजीनगर नामकरणला विरोध, राष्ट्रवादीच्या 40 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
छत्रपती संभाजीनगर - औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. छत्रपती संभाजीनगर नामकरणला विरोध करत 40 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा दिला आहे.
15:37 March 08
आर्थिक पाहणी अहवालानुसार कृषी आणि संलग्न क्षेत्र प्रगतीपथावर
मुंबई - कृषी व संलग्न क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीत 11.4% वाढ पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 15.8 टक्के वाढ अपेक्षित आहे. तर उसाच्या उत्पादनात मागील वर्षीचा तुलनेत 24.6% वाढ अपेक्षित आहे. अन्नधान्याच्या उत्पादनात मागील वर्षाच्या तुलनेत फक्त एक पूर्णांक आठ टक्के वाढ अपेक्षित आहे. पशुसंवर्धन क्षेत्रात वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धीत मागील वर्षाच्या तुलनेत केवळ चार पूर्णांक एक टक्के वाढ आहे. मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य शेती क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी तेरा पूर्णांक दोन टक्के वाढ झाली असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात म्हटले आहे.
15:34 March 08
हक्कभंग प्रकरणी संजय राऊत म्हणाले 'ते' विधान शिंदे गटासाठी
मुंबई - हक्कभंग प्रकरणी ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी त्यांच्या अपमानास्पद टिप्पणी प्रकरणी पाठवलेल्या नोटीसला उत्तर दिले आहे. त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, मी राज्यसभेचा खासदार होतो आणि विधानसभेचे महत्त्व जाणतो. ते पुढे म्हणतात, त्यांची विधाने केवळ एका विशिष्ट गटाकडे (शिंदे कॅम्प) होती आणि सर्वच आमदारांसाठी नाही. दरम्यान यासंदर्भात लेखी म्हणणे ते लवकरच सादर करणार आहेत. त्यासाठी त्यांनी मुदत मागितली आहे. ही मुदत त्यांना देण्यात आली आहे.
15:19 March 08
अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड
अहमदनगर : जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा त्यांनी पराभव केला आहे.
14:46 March 08
महिलांना संपत्तीवर अधिकार आहे का, यशोमती ठाकूर यांचा भावनिक सवाल
मुंबई - माजी महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना अश्रू अनावर. महिलांवरील प्रश्नासंदर्भात भाषण करताना झाल्या भावूक. पती निधनानंतर अठरा वर्षानंतरही करावा लागतोय संघर्ष. आमदार आणि मंत्री राहिलेल्या महिलेला संघर्ष चुकत नाही. सामान्य महिलांची काय असेल स्थिती. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांचा अधिकार सिद्ध करताना अडचणी. सातबारावर अजूनही मुलांची लागली नाहीत नावे. महिलांना संपत्तीवर अधिकार आहे का, यशोमती ठाकूर यांचा सभागृहात सवाल.
14:43 March 08
100 कोटी भ्रष्टाचार प्रकरणी आरोपी सचिन वाझे आज न्यायालयात
मुंबई - 100 कोटी भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपी सचिन वाझेला आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची सुनावणी होत आहे. इतरांप्रमाणे मला देखील जामीन मिळावा यासाठी केला अर्ज, असा युक्तीवाद. सचिन वाझेला सध्या तळोजा तुरुंगातुन मुंबई सत्र न्यायालयात आणले. याआधी माजी मंत्री अनिल देशमुख यांची झाली जामिनावर सुटका.
14:29 March 08
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार - सरकारची ग्वाही
मुंबई - छत्रपती संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली.
14:19 March 08
खासदार धैर्यशील माने यांचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अडवला ताफा
कोल्हापूर - शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांचा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी अडवला ताफा. इचलकरंजी मधील चंदुर येथे कार्यक्रमासाठी जात असताना शिवसैनिकांनी ताफा रोखला. गद्दारी का केली असा जाब विचारला. ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक. पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना घेतले ताब्यात.
13:22 March 08
विरोधकांचा सभात्याग म्हणजे मगरीचे अश्रू - देवेंद्र फडणवीस
मुंबई - विरोधकांचा सभात्याग म्हणजे मगरीचे अश्रू देवेंद्र फडणवीस यांचा आरोप. हे सरकार अवकाळी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार आहे. नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू आहे. विरोधकांना त्याबाबतची आकडेवारी दिलेली आहे. शेतकऱ्यांनाही हे चांगलेच ठाऊक आहे की हे सरकार निश्चित मदत करणार आहे. केवळ राजकारणासाठी विरोधक आव आणत आहेत. अवकाळी पाऊस काल झाला आणि आज मदत असे होत नाही. त्यासाठी पंचनामे करावे लागतात आणि ते करण्याचे काम सुरू आहे.
13:16 March 08
आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा
नाशिक - आमदार बच्चू कडूंना दोन वर्षांची शिक्षा झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने निकाल
13:13 March 08
नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईत किनार्याजवळ कोसळले, पायलट सुरक्षित
मुंबई: नौदलाचे हेलिकॉप्टर उड्डाण करत असताना किनार्याजवळ कोसळले. त्यानंतर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. नौदलाच्या गस्ती पथकाद्वारे तीन सदस्यांची सुटका केली आहे. प्रवक्त्याने सांगितले की, अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. नौदलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.
13:01 March 08
विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर- कृषी क्षेत्रात १०.२ टक्के वाढ अपेक्षित
विधानसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात १०.२ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे अहवालात म्हटले आहे.
12:35 March 08
विरोधकांचा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभात्याग
अवकाळीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सभात्याग केला आहे.
11:23 March 08
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका-देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करू नका. शेतकऱ्यांना मदत दिली जाईल अशी घोषणा आणि कालच केली आहे. अवकाळीमुळे आठ जिल्ह्यातील 13 500 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड तालुक्यातील नुकसान झाल्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
11:22 March 08
महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी-छगन भुजबळ
महाराष्ट्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. गुजरात सरकारही त्यांना मदत करत आहे. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली असल्याचा दावा केला जात असेल, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत का दिली जात नाही?: राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी सवाल केला आहे.
10:48 March 08
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन करण्यात आले आहे.
10:47 March 08
साताऱ्यात दोन गटातील तुफान राड्यात १० जण जखमी, जनावरांच्या शेडसह वाहने पेटवली
फलटण तालुक्यातील मिरेवाडी येथे दोन गटात तुफान राडा झाला आहे. रस्त्याच्या आणि घराच्या बांधकामाच्या कारणावरून झालेल्या तुंबळ हाणामारीत दहा जण जखमी झाले आहेत. एका गटाने घर, पिकअप, दुचाकी, दोन ट्रॅक्टर, धान्य आणि जनावरांचे शेड पेटवून दिले तर दुसऱ्या गटाने घराचे नवीन बांधकाम पाडून टाकले. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून पोलिसांनी एकूण ४२ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
10:46 March 08
उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता विधान भवनात येणार
शिवसेना पक्ष प्रमुख आणि विधान परिषद आमदार उद्धव ठाकरे आज दुपारी १ वाजता विधान भवनात येणार आहेत. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघीडीच्या नेत्यांसोबत बैठकही करणार आहेत.
10:13 March 08
मित्रांना भांग कुणी फडणवीसांनीच पाजलीच का-संजय राऊत
मित्रांना भांग कुणी फडणवीसांनीच पाजलीच का, असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांची भांग कसब्यामधूनच उतरली आहे. सरकारविरोधात बोलणे देशद्रोह ठरत असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
09:15 March 08
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही-अजित पवार
राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. ही महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही, काय अडचण आहे, ही मला समजत नाही, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
09:01 March 08
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांना ईडीने बजावले समन्स
दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कविता यांना समन्स बजावले आहे. त्यांना उद्या, 9 मार्चला चौकशीसाठी बोलावण्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले
08:25 March 08
माणिक साहा सलग दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री पदाची घेणार शपथ
माणिक साहा आज आगरतळा येथील स्वामी विवेकानंद मैदानावर सलग दुसऱ्यांदा त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे प्रमुख जेपी नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
07:32 March 08
भारतीयाचा मान जगात आणखी उंचावला, अरुण सुब्रमण्यन अमेरिकेत होणार जिल्हा न्यायाधीश
मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन अरुण सुब्रमण्यन हे न्यूयॉर्कच्या दक्षिण जिल्ह्यासाठी युनायटेड स्टेट्सचे जिल्हा न्यायाधीश असणार आहेत. खंडपीठावर काम करणारे ते पहिले दक्षिण आशियाई न्यायाधीश आहेत.
07:15 March 08
Maharashtra Breaking News : मरीन लाइन्समधील बडा कब्रस्तान येथे शब-ए-बारात साजरी
मुंबई: मरीन लाइन्समधील बडा कब्रस्तान येथे शब-ए-बारात साजरी करण्यात आली आहे. शब-ए-बारात'माफीची रात्र' म्हणूनही ओळखले जाते, इस्लामिक कॅलेंडरमधील आठव्या महिन्याच्या शाबानच्या 14 व्या आणि 15 व्या रात्री पाळली जाते.