ETV Bharat / state

Maharashtra Bhushan Award : निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

maharshtra bhushan
निरूपणकार धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार
author img

By

Published : Feb 8, 2023, 2:27 PM IST

मुंबई : महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब करीत रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेवून त्याचा गैारवही केला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला महाराष्ट्र भुषण हा सरकारच्यावतीने देण्यात येतो. तर हा येणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आला आहे. राज्या सरकारने नेमलेल्या समितीच्या सिपाऱसीनंतर ही घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

कोण आहेत आप्पासाहेब धर्माधिकारी ?: 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा, बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या. आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले आहे. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.

प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक कार्य: डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले जातात. अलीकडेच्या काळात संस्थेने सर्वाधिक प्रमाणात वृक्षारोपण केले. त्याशिवाय वृक्षसंवर्धन, तलाव व स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिराचे आयोजनही नियमितरीत्या करण्यात येते. गणेशोत्सव व नवरात्रौत्सवनंतर निर्माल्यातून खतनिर्मिती करून एक पर्यावरणपूरक संदेशही त्यांनी समाजाला दिला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छतादूत म्हणूनही ओळखले जातात. पुरस्काराच्या घोषणेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा : Dr Raghunath Mashelkar: जात- धर्म विरहित संतुलित, सुरक्षित व सुसंस्कृत समाज घडावा: डॉ. रघुनाथ माशेलकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.