ETV Bharat / state

दहशतवादी कारवाई प्रकरण : मुंब्रातून आणखी एकास अटक - महाराष्ट्र एटीएस

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीत घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. 17 सप्टेंबर) नागपाडा परिसरातून एकास अटक केली होती. रविवारी आणखी एका मुंब्रा परिसरातून अटक करण्यात आली आहे. इम्रान उर्फ मुन्ना, असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

v
v
author img

By

Published : Sep 19, 2021, 5:04 PM IST

मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीत घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने शुक्रवारी (दि. 17 सप्टेंबर) नागपाडा परिसरातून एकास अटक केली होती. रविवारी आणखी एका मुंब्रा परिसरातून अटक करण्यात आली आहे. इम्रान उर्फ मुन्ना, असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) पाकिस्तानच्या हँडलरकडून चालविल्या जाणाऱ्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. या मॉड्यूलशी संबंधित सहा जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोन जण पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन आलेले होते. सणासुदीच्या कालावधी दरम्यान दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात स्फोट घडविण्याचा कट ते रचत होते. त्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना कळाले की, मुंबईचा रहिवासी झाकीरही त्यांच्यासोबत कटात सहभागी होता. यानंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी झाकीरला नागपाड्यातून ताब्यात घेतले होते.

झाकीरने जानला दिला होता स्फोटकांची डिलिव्हरी घेण्याचा टास्क

दिल्लीत अटक करण्यात आलेल्या मुंबईच्या जान मोहम्मदला हत्यार आणि स्फोटकांची डिलिव्हरी घेण्यास झाकीरने सांगितले होते. झाकीरने नेमके कोणाच्या आदेशावरून हत्यारे आणि स्फोटकांची डिलिव्हरी घेण्यास सांगितले होते, याचा खुलासा आता एटीएसच्या चौकशीतून होण्याची शक्यता आहे.

दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई लोकल, लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा कट

खास करून या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे. मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गर्दी असलेल्या वेळी मुंबईच्या लोकल मध्ये विषारी गॅस सोडून अधिकाधिक लोकांना मारण्याचा कट दहशतवाद्यांकडून रचला जात होता. या कटासाठी काही स्थानकांची रेकी केली गेली होती का? याबाबत देखील आता तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. गुप्तचर विभागाकडून याबाबत रेल्वे प्रशासनाला अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबईतील अनेक स्टेशनवर आता सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई मधील महत्त्वाच्या स्टेशनवर आत आणि बाहेर जाणाऱ्या मार्गांवर सुरक्षाव्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून वाढवण्यात आल्या आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांची सुरक्षा संदर्भात बैठक

14 सप्टेंबरला सहा दहशतवाद्यांना पकडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई लोकल असल्यास ते कळतात 15 सप्टेंबरला रेल्वे अधिकार्‍यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसराचे सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच रेल्वे परिसरात महत्त्वाच्या जागी सर्वांकडून तपासणी करणे, बॉम्बशोधक पथके, तसेच स्थानकावरील हमाल व बूटपॉलिश करणाऱ्या लोकांना संशयास्पद वस्तू आढळल्यास किंवा हालचाली आढळल्यास स्टेशन मास्तरांना याबाबत कळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईतील जान मोहम्मदच्या चौकशीनंतर कारवाई

दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित दहशतवादी जान मोहम्मद शेख यांच्या चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या चार जणांची टीम दिल्लीला पोहोचली आहे. जानची कसून चौकशी केली जात असून आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. जानच्या चौकशीतून अनेक प्रकरणांचा उलघडा होऊ शकतो, असे अशी माहिती पुढे आली आहे. दरम्यान या दहशत वाद्यांच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने संयुक्त रित्या कारवाई करत जोगेश्वरीमधून एकाला अटक केली आहे.

कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीतील घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावलेला आहे. पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख मुंबईत वास्तव्याला असून त्याने मुंबईची रेकी केली होती. त्यामुळे एटीएसने त्यांच्या पत्नीसह मुलीला आणि रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जान मोहम्मद दाऊसदसाठी वीस वर्षांपूर्वी करत होता काम

जान मोहम्मद शेख या संशयित आरोपीचे वीस वर्षापूर्वी दाऊद गॅंगशी संबंध होते. वीस वर्षांपूर्वी तो दाऊदसाठी काम करत होता. या लिंकमुळेच ही व्यक्ती महाराष्ट्र एटीएसच्या रडारवर होती. मात्र, सध्या दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्याच्याकडे कोणतीही स्फोटके किंवा हत्यार सापडले नाहीत. त्यानंतर त्याच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी एटीएसकडून केली जात आहे.

अशी केली जान मोहम्मदला अटक

जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएसकडून दाऊदच्या हस्तकांचा शोध घेतला जात होता. जान मोहम्मदला अटक केल्यानंतर एटीएस झाकीरच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी जाकीर शेख हा मुंब्रामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवले होते. याची माहिती मिळताच एटीएसने झाकीरच्या पत्नीला त्याला फोन करायला सांगून त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावले आणि त्याला ताब्यात घेतले. झाकीर हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. झाकीरचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो अनिस इब्राहिमचा उजवा हात असल्याचे म्हटले जात आहे.

कोण आहे जान मोहम्मद शेख..?

धारावीच्या एमजी रोडवरील सोशल नगरात मदिना मशिदीच्या पाठीमागे गेल्या काही वर्षांपासून जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया राहत होता. हा काही वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवत होता. अत्यंत चिंचोळ्या गल्लीत राहणार्‍या त्याच्या कुटुंबाचा अतिरेकी कारवायांशी संबंध अद्याप आढळला नसला तरी अत्यंत गुप्तपणे याच घरातून जान मोहम्मद शेख अतिरेक्यांसाठी स्लीपर सेल चालवत असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अडरवर्ल्डशी आणि खास करून दाऊद टोळीशी त्याचा सतत संपर्क असे. अधूनमधून तो गावी जाण्याचा बहाणा करून गायब व्हायचा. धारावीत तो राहतो. त्या भागात त्याचा कुणालाही त्रास नसल्याने त्याच्यावर कधी कुणी संशय घेतला नाही. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर जान मोहम्मद शेख या संशयित दहशतवाद्याचे पितळ उघडे पडले आहे.

बॉम्बस्फोट घडवण्याची तयारी

मुंबईत 1993 साली कुख्यात डॉन दाऊद इब्राहीमने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. भारतात अशाच प्रकारचा हल्ला करण्याची तयारी गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. यासाठी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले ओसामा आणि जीशान बॉम्बस्फोट घडवण्यासाठी लोकांना तयार करत होते. ज्यासाठी दोन ते अडीच किलो आरडीएक्स त्यांनी मिळवले होतं. तसेच मुंबईतील अनीस इब्राहिमचा जवळचा हस्तक जाम मोहम्मद शेख हा या दहशतवाद्यांना लागणाऱ्या पैशापासून ते इतर सर्व साहित्य पोहोचवत होता, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

काय होता कट

गुंड दाऊद इब्राहीम याच्या इशाऱ्यावर मुंबईसह देशभरात सणासुदीतीला घातपात घडवण्याचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावलेला आहे. पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख मुंबईत वास्तव्याला असून त्याने मुंबईची रेकी केली होती. त्यामुळे एटीएसने त्यांच्या पत्नीसह मुलीला आणि रेल्वेचे तिकीट काढून देणारा असगर शेखला ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - ...म्हणून कंगना राणौतने उद्धव ठाकरे यांना म्हटले 'जगातील सर्वोत्तम मुख्यमंत्री'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.