ETV Bharat / state

हिवाळी अधिवेशनात होणार विधानसभा अध्यक्षांची निवड? - Maharashtra Assembly Speaker to be elected in winter session

आता विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याने याबाबत निवडणूक कधी घ्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा निर्णय असला तरी सध्या विधानसभेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता याचबरोबर मागील पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन बघता, काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडून आणण्यात तशा काही अडचणी येताना दिसत नाही आहेत. तरीसुद्धा या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल, याबाबत काँग्रेस कडून शिक्कामोर्तब झाल्याचं सुत्रांकडून समजते आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या बातमीला स्पष्टपणे दुजोरा दिला नसला तरी या अधिवेशनात विधासभा अध्यक्ष निवडला जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

vidhan bhavan
विधानभवन
author img

By

Published : Oct 27, 2021, 5:30 PM IST

मुंबई - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले राज्य विधानसभेचे अध्यक्षपद अजूनही रिक्तच आहे. अगोदर अर्थसंकल्पीय नंतर पावसाळी या दोन्ही अधिवेशनात न झालेली विधानसभा अध्यक्षांची निवड आतातरी हिवाळी अधिवेशनात होते का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, यंदा या अधिवेशनात अध्यक्षांची निवड करण्याबाबत काँग्रेसकडून शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे.

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपदावर राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना या दोघांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी छुप्या मार्गाने दावा केला होता. मात्र, या मुद्द्यावर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर हे अध्यक्षपद काँग्रेसचे आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख शरद पवार यांनी या वादावर पडदा टाकला होता.

आता विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे असल्याने याबाबत निवडणूक कधी घ्यावी, हा सर्वस्वी काँग्रेसचा निर्णय असला तरी सध्या विधानसभेतील महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता याचबरोबर मागील पावसाळी अधिवेशनात भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन बघता, काँग्रेसला आपला अध्यक्ष निवडून आणण्यात तशा काही अडचणी येताना दिसत नाही आहेत. तरीसुद्धा या अधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष निवडला जाईल, याबाबत काँग्रेसकडून शिक्कामोर्तब झाल्याचं सुत्रांकडून समजते आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी या बातमीला स्पष्टपणे दुजोरा दिला नसला तरी या अधिवेशनात विधासभा अध्यक्ष निवडला जाण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा होती. दोघांपैकी एकाला अध्यक्षपद देऊन त्यांच्याकडे असलेले मंत्रीपद नाना पटोले यांसारख्या ज्येष्ठ नेत्याला प्रदेशाध्यक्ष पदाबरोबर दिले गेले पाहिजे, अशीही चर्चा रंगली होती. मात्र, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून भोरचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळत आहेत.

हेही वाचा - प्रकल्पग्रस्तांसाठीच्या पदभरतीत नियमांचे पालन करा; सामान्य प्रशासन मंत्र्यांचे निर्देश

अध्यक्षपद निवडणुकीबाबत महाविकासआघाडी चालढकल करत असल्याबद्दल मध्यंतरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी स्वतः तत्काळ अध्यक्ष निवडण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकारला सूचना दिली होती.

अध्यक्षपदासाठी कधी निवडणूक झाली?

अलीकडच्या काळात अरुण गुजराथी वगळता बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसे-पाटील, हरिभाऊ बागडे आणि नाना पटोले हे बिनविरोधच अध्यक्षपदी निवडून आले होते. तर १९९९मध्ये अध्यक्षपदासाठी अरुण गुजराथी विरुद्ध गिरीश बापट अशी लढत झाली होती. तेव्हा गुजराथी यांना १५४ तर बापट यांना १३२ मते मिळाली होती.

निलंबित आमदारांना मतदानाचा अधिकार नाही -

मागच्या अधिवेशनात विधानसभा सभागृहात गोंधळ व तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी १ वर्षासाठी निलंबित करण्यात आलेले भाजपचे १२ आमदार विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीचे पारडे जड आहे.

कोण आहेत भाजपचे निलंबित आमदार?

संजय कुटे, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, हरिश पिंगळे, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, नारायण कुचे, बंटी भांगडिया आणि योगेश सागर हे आमदार एक वर्षासाठी निलंबित झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.