ETV Bharat / state

काँग्रेस-राष्ट्रवादीने सुरू केली वॉर रूम; विधानसभा निवडणूक मतमोजणीवर राहणार लक्ष

मुंबई येथील बेलॉर्ड पिअर या परिसरातील राष्ट्रवादीच्या  मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरू करण्यात आली आहे. काँग्रेसने मागील काही दिवसांपासून टिळक भवन येथे आपली वॉर रूम तयार केली आहे.

संपादित
author img

By

Published : Oct 23, 2019, 9:59 PM IST

मुंबई - राज्यात उद्या निवडणुकीची मतमोजणी आहे. मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाची माहिती घेण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाकडून वॉर रुम सुरू करण्यात आल्या आहेत. दोन्ही पक्षांना ११० हून अधिक जागांवर विजय मिळेल, अशा विश्वास आहे.

मुंबई येथील बेलॉर्ड पिअर या परिसरातील राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात वॉर रुम सुरू करण्यात आली आहे. वॉर रुममधून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवित असलेल्या ११७ मतदारसंघाची माहिती घेतली जाणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मागील काही दिवसांपासून टिळक भवन येथे आपली वॉर रूम तयार केली आहे. काँग्रसकडून राज्यातील प्रत्येक मतदारसंघाची माहिती आणि तक्रारींची दखल घेतली जाणार आहे.

हेही वाचा-MAHA VIDHANSABHA Big Fights : उद्या फैसला.. उमेदवारांचे देव पाण्यात, राज्यातील ५० लक्षवेधी लढती

राष्ट्रवादी काँग्रेसला ५१ हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतील कार्यालयात जल्लोष साजरा करण्याची राष्ट्रवादीने तयारी केली आहे. मतमोजणीच्या दिवशी वॉर रुमध्ये राष्ट्रवादीचे अनेक नेते दुपारनंतर उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे आपली बाजू माध्यमांमध्ये भक्कमपणे मांडण्यासाठी राष्ट्रवादीने उद्या तब्बल २४ प्रवक्ते मैदानात उतरविणार आहेत. हे प्रवक्ते राष्ट्रवादीच्या यश आणि अपयशाचे विश्लेषण करणार आहेत. काँग्रेसनेही आपली १५ जणांची फौज मैदानात उतरवली असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

हेही वाचा-भाजपची निकालाआधीच विजयी जल्लोषाची तयारी

Intro:काँग्रेस- राष्ट्रवादीची वॉर रूम देणार प्रत्येक क्षणाची माहिती
mh-mum-cong-ncp-warroom-7201153
(यासाठी फाईल फुटेज वापरावेत)
मुंबई, ता. २३ :
राज्यात उद्या होणाऱ्या मतमोजणीनंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला ११० हून अधिक जागा मिळण्याची अपेक्षा या दोन्ही पक्षांकडून केली जात आहे. त्यासाठी उद्याच्या मतमोजणीच्या प्रत्येक क्षणाची माहिती घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून वॉर रूम कार्यरत करण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादीची मतमोजणीची वॉर रूम ही राष्ट्रवादीच्या मुंबई येथील बेलॉर्ड पिअर या परिसरात मुख्य कार्यालयात सुरू करण्यात आली असून येथे राष्ट्रवादीचे राज्यभरातील उभे असलेल्या ११७ मतदार संघाची माहिती घेतली जाणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने मागील काही दिवसांपासून टिळक भवन येथे आपली वॉररूम तयार केली आहे. काँग्रसनेही राज्यातील प्रत्येक मतदार संघातील प्रत्येक क्षणाची माहिती आणि तक्रारींची दखल घेतली जाणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसला यावेळी आपल्याला ५१ हून अधिक जागा मिळण्याची शक्यता असल्याने त्यासाठी मुंबईतील कार्यालयात जल्लोष साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. या मतमोजणीच्या दिवशी ठिकाणी दुपारनंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठीच राष्ट्रवादीकडून उद्या या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आपली बाजू माध्यमांमध्ये भक्कमपणे मांडण्यासाठी राष्ट्रवादीने उद्या तब्बल २४ प्रवक्ते मैदानात उतरवले आहेत. हे प्रवक्ते राष्ट्रवादीच्या यश आणि अपयशाचे आणि त्याचे विश्लेषण करणार आहेत. काँग्रेसनेही आपली १५ जणांची फौज मैदानात उतरवली असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.

Body:काँग्रेस- राष्ट्रवादीची वॉर रूम देणार प्रत्येक क्षणाची माहिती
Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.