मुंबई - सोमवारी 12 ऑक्टोबरला मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच दोषींवर कारवाई करणार असल्याचेही ते म्हणाले. ते येथे माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले, 2011 ला जेव्हा अस घडले तेव्हा समिती नेमली होती त्यांनी जो अहवाल दिला होता त्यावर चर्चा करणार आहोत. तसेच यात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असेही ते म्हणाले.
ही टेक्निकल बाब आहे. आयलँडिंग होणे, मुंबई, नवी मुंबई अंधारात पाहणे ही साधीसुधी घटना नाही. यात घातपात शक्यता नाकारता येत नाही. काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करायचे, काम करत आहे हे पडताळून पाहणार आहोत. आयलँडिंग जे झालं, ते व्हायला नको हवे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच केंद्रीय समिती आज (बुधवारी) मुंबईत आहे. ते मला भेटण्याची शक्यता आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
तर या प्रकरणाची सिस्टीम ऑडिट होणार आहे. त्यातही समिती बनत आहे. त्या दिशेने काम होत आहे. टेक्निकल समिती एक आठवड्यात अहवाल देईल, जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले.
-
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
मुंबईत शहरात बेस्ट, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अदानी तर भांडुप व मुलुंड येथे एमएसईबी या कंपन्यांकडून वीजपुरवठा केला जातो. ही वीज मुंबईबाहेर बनवून या कंपन्यांच्या माध्यमातून ग्राहकांना पुरवली जाते. मात्र, सोमवारी 12 ऑक्टोबरला ग्रिडमध्ये बिघाड झाल्याने मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे मुंबईसह बाजूच्या भागांतही वीजपुरवठा खंडित झाला.
दरम्यान, मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीजपुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असा संशय राज्याचे ऊर्जामंत्रा डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे.
लोकल-रस्ते वाहतूक सेवेवर झाला होता परिणाम..
वीजपुरवठा खंडित झाल्याने मुंबईतील लोकलसेवेला याचा फटका बसला होता. सकाळी दहा वाजेपासून मुंबईतील लोकलसेवा ठप्प झाली होती. लोकल अचानक मधेच थांबल्यामुळे रुळांवरून चालत जाण्याची वेळ प्रवाशांवर आली. मुंबईतील रस्ते वाहतुकीवरही याचा परिणाम दिसून आला. रस्त्यांवरील सिग्नल सेवा बंद झाल्यामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होता.
यानंतर मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील खंडित झालेली वीज टप्पाटप्प्याने सुरू होत झाली. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. वीजपुरवठा खंडित प्रकरणी टेक्निकल ॲाडिट करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तर वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे भाजपाने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले.