ETV Bharat / state

MVA vs BJP सत्तांतरानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा, हे नेते आहेत भाजपच्या रडारवर - नेते आहेत भाजपच्या रडारवर

महाविकास आघाडीने सत्ता गमावल्यानंतर त्यांचे अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडावर आहेत. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडी आणि आयटी विभागाने छापेमारी केली आहे. त्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही सांगली बँक प्रकरणात नोटीस पाठवण्यात आली आहे. ठाकरे गटाचेही तीन आमदार केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर आगामी काळात कारवाईची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Maha Vikas Aghadi Leaders
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 13, 2023, 5:37 PM IST

Updated : Jan 13, 2023, 5:49 PM IST

मुंबई - राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना सरकारमधील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा होता. हा ससेमिरा राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतरही कायम आहे. नुकतेच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याघरी ईडी आणि आयटी अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. यानंतरही अशा कारवाया इतर नेत्यांवर होण्याची शक्यता महाविकास आघाडीकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध महाविकास आघाडीचा वाद आणखी पेटणार आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घराची 14 तास झाडाझडती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयटी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करत जवळपास 13 ते 14 तास त्यांच्या कागल पुणे येथील घरांची झाडाझडती घेतली. छापेमारी टाकण्याआधी ईडीकडून आपल्याला साधे समन्सही आले नाही. जर ईडीने आपल्याला समन्स बजावला असता तर आपण स्वतः चौकशीसाठी सहकार्य केले असते. मात्र या छापेमारी टाकून केवळ कुटुंबीयांना, नातेवाईकांना नाहक त्रास दिला जातो असा थेट आरोप हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षावर केला. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून पुन्हा एकदा विरोधी पक्षाच्या नेत्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जातो ? असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख नवाब मलिकांवर कारवाई महाविकास आघाडीचे सरकार असताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून थेट राज्यातील मंत्र्यांवर कारवाई करण्यात आली होती. सर्वात आधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यानंतर माजी मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. मात्र सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमीरा कमी होईल असे वाटत असताना, पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई झाली. हसन मुश्रीफ यांच्या सोबतच अनिल परब यांचीही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडीच्या काही नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेची गाज पडू शकते असा इशारा यातून मिळाला असल्याचे मत राजकीय विश्लेषक प्रवीण पूरो यांनी व्यक्त केले आहे.

हे नेते भाजपच्या रडारवर

जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगलीतील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने चौकशीचे आदेश जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले आहेत. या बँकेच्या अध्यक्षपदी असलेले दिलीप पाटील हे जयंत पाटील यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. मात्र त्यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकर भरतीत मोठा गैरव्यवहार आणि कर्ज वाटपात अनियमितता असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला होता. या सर्व प्रकरणात जयंत पाटील असल्याचा थेट आरोप आहे. सांगलीतील सुनील फराटे यांनी ही तक्रार केली होती.

ठाकरे गटाच्या तीन आमदारांना नोटीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आतापर्यंत तीन आमदारांना एसीबीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यामध्ये सर्वात आधी कोकणाचे आमदार राजन साळवी, वैभव नाईक आणि त्यानंतर नितीन देशमुख या आमदारांना एसीबीकडून संपत्तीच्या चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राजन साळवी, नितीन देशमुख आणि वैभव नाईक यांनी जमलेली संपत्तीबाबत एसीबीकडून तपास करण्यात येणार आहे.

माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट सातत्याने प्रयत्न करत आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी थेट लोकसभेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. दिशा सालियान या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून तरुणीचे फोन रेकॉर्ड तपासण्यात यावेत. दिशा सालियान यांच्या फोन रेकॉर्डमध्ये ए. यू. नावाच्या व्यक्तीबरोबर संभाषण झाले आहे, आणि ते ए. यू. म्हणजे आदित्य ठाकरे असल्याचा दावा शेवाळे यांनी लोकसभेत केला होता. त्यामुळे येणाऱ्या काळात आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देणे. त्यांच्यावर खोटे नाटे केसेस दाखल करणे, राजकीय दबाव आणणे अशी कामे सातत्याने सत्ताधारी पक्षाकडून सुरू आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा हाताशी धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्तेत असताना देखील त्रास देण्यात आला. आता सत्तांतर झाल्यानंतरही विरोधक नेत्यांनी आवाज उठवू नये यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही सांगलीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पुढेही अशा प्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो अशी शक्यता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

भ्रष्टाचार केला नसेल तर घाबरण्याचे कारण नाही हसन मुश्रीफ यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षावर या कारवाईचे खापर फोडले. केवळ महाविकास आघाडीच्या नेत्यांना नाहक त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षावर केला. मात्र केंद्रीय तपास यंत्रणा ह्या त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. त्यांच्याकडे ठोस पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कोणतीही चुकीचे काम केले नसेल तर त्यांनी घाबरायचे कारण काय? असा उलट प्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - Jayant Patil on BJP : जयंत पाटलांची भाजपवर टीका; म्हणाले, 'भाजपकडून सत्तेचा गैरवापर'

Last Updated : Jan 13, 2023, 5:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.