नागपूर - कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासून तब्बल ४३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. काल रात्री 44 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले होते, त्यामुळे गेल्या 24 तासात एकूण 87 रुग्णांची वाढ झाली आहे.
MAHA CORONA : राज्यात आज 1362 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 18 हजार 120 - कोरोना अपडेट
20:22 May 07
राज्यात आज 1362 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 18 हजार 120
20:00 May 07
सोलापूरात एकाच दिवशी तब्बल २९ रुग्णांची वाढ, एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 182 वर
19:04 May 07
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, कोरोनाबाधित 1 रुग्ण आढळला
19:04 May 07
पुणे विभागात कोरोनाबाधित 2 हजार 734 रुग्ण, तर जिल्हयात 2 हजार 395
17:47 May 07
गेल्या 24 तासात नागपुरात एकूण 87 रुग्णांची वाढ
17:34 May 07
पुण्यात गेल्या 7 दिवसात दररोज 50 पेक्षा जास्त जण कोरोनामुक्त
पुणे - राज्यातल्या कोरोना हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणामध्ये पुणे शहर प्रमुख आहे. पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा वेग चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाच्या निरीक्षणानुसार शहरातल्या कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 7 दिवसात दुप्पट होत असल्याचे नुकतेच स्पष्ट करण्यात आले होते. एकीकडे पुणे शहरातील ही चिंताजनक बाब असताना दुसरीकडे गेल्या काही दिवसात एक समाधानकारक बाबही समोर आली आहे. गेल्या 7 दिवसापासून पुण्यात दररोज 50 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे होत आहेत.
17:33 May 07
साताऱ्यात एका दिवसात 21 कोरोनाग्रस्तांची नोंद; एकूण रूग्णसंख्या 113वर
सातारा - जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज (गुरुवारी) जिल्ह्यातील तब्बल 21 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 113 वर पोहोचली आहे.
16:09 May 07
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात 20 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णांचा आकडा 253 वर
15:18 May 07
औरंगाबादेत 95 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, बळींची संख्या 12 वर
औरंगाबाद - शहरात एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सदरील महिला असेंफिया कॉलनीत वास्तव्यास होती. दहा दिवसांपूर्वी महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
12:25 May 07
नाशिकमध्ये आणखी 4 कोरोनाबाधितांची भर, एकूण रुग्णसंख्या 506 वर
नाशिक - जिल्ह्यातील मालेगावसह इतर भागांत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गुरुवारी सकाळी आणखी अहवाल प्राप्त झाले त्यात जिल्ह्यातील 4 जण कोरोना पॉझेटिव्ह आढळून आले आहेत. नाशिक शहरातील समता नगर येथील 1 तर येवल्यातील मौलाना रोड येथील 2 आणि सिन्नर मधील वेदांत पार्क येथील 1 आहे. तर मालेगावची रुग्ण संख्या 416 वर गेली असून जिल्हाची रुग्ण संख्या 506 वर जाऊन पोहचली आहे.
11:31 May 07
राज्यभरात 531 पोलीस कोरोनाग्रस्त, 51 पोलीस अधिकारी तर 480 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश
10:42 May 07
औरंगाबादेत कोरोनाचे 17 नवीन रुग्ण, एकूण संख्या 373 वर
औरंगाबाद - शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होताना दिसत आहे. बुधवारी औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 17 ने वाढली असून शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 373 वर पोहचली आहे. तसेच शहरातील अनेक भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत.
09:26 May 07
धुळे वैद्यकीय महाविद्यालयातील एका 38 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण
धुळे - येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका 38 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. या घटनमुळे रुग्णालय प्रशासनात खळबळ उडाली आहे.
09:26 May 07
धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून कोरोनाबाधित तरुणाने कुटुंबीयांसह काढला पळ, प्रशासकीय यंत्रणा हादरली
धुळे - कोरोनाबाधित परप्रांतीय तरुणाने आपल्या गर्भवती पत्नीसह चार वर्षाच्या मुलाला घेऊन पळ काढल्याची घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे हादरून गेली आहे.
09:22 May 07

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 16 हजार 758 झाली आहे. बुधवारी राज्यात नवीन 1 हजार 233 नवीन रुग्णांचे निदान झाले. तर 275 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 3 हजार 94 रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.