मुंबई - कोरोनामुळे गेल्या 2 दिवसात धारावीमध्ये एकही मृत्यू झाला नाही. धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 496 वर गेली आहे. आज नवीन 38 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मृतांची संख्या 18 आहे.
MAHA CORONA : राज्यात आज नवीन 790 रुग्णांची वाढ; कोरोनाबाधितांची संख्या 12 हजार 296 वर, दिवसभरात 36 मृत्यू - 17 मे पर्यंत लॉकडाऊन
19:49 May 02
धारावीमध्ये आज 38 कोरोनाबाधितांची वाढ, एकूण रुग्णांचा आकडा 496 वर
14:40 May 02
प्रवाशांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, रेल्वे प्रशासनाचे आवाहन
मुंबई - लॉकडाऊनमुळे देशात विविध ठिकाणी अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर व्यक्तींना हलविण्यासाठी रेल्वेतर्फे श्रमिक स्पेशल गाड्या सोडण्यात येत आहेत. परराज्यांमध्ये किंवा राज्याच्या अंतर्गत भागात ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांना शासकीय यंत्रणांकडून जोपर्यंत कळविले जाणार नाही, तोपर्यंत राज्यातील रेल्वे स्थानकांवर गर्दी करू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असे आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने केले आहे.
13:25 May 02
मुंबई पालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था आता हाॅटेलमध्ये
मुंबई - देशभरात लॉकडाऊन सुरू असताना मुंबईत रोज कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याना 'ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स'ने राहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याच धर्तीवर पालिकेच्या मुंबई बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हॉटेलमध्ये राहण्याची, खाण्याची, लॉन्ड्रीची व्यवस्था करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहतील, अशी पालिकेला अपेक्षा आहे.
11:51 May 02
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर;वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती
लातूर- कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत या सत्रातील 2020 च्या पदवी व पदव्युत्तर परीक्षा ह्या लांबणीवर गेल्या आहेत. परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाटी गठीत करण्यात आलेल्या शिफारशीनुसार या परीक्षा पुढील सुचनेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.
11:40 May 02
उत्तरप्रदेशच्या मजूरांसाठी नाशिकमधून विशेष ट्रेन रवाना
11:14 May 02
मुख्यमंत्र्यांच्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरील 3 पोलिसांना कोरोनाची लागण
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' बंगल्याबाहेरील 3 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या तीन पोलिसांना सांताक्रूझमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.
10:51 May 02
कोटा येथून 74 विद्यार्थी परतले पुण्यात
पुणे - राजस्थानमधील कोटा येथे लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यात आले आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील 74 विद्यार्थ्यांना देखील कोटा येथून शुक्रवारी मध्यरात्री पुण्यात आणण्यात आले.
10:33 May 02
नांदेडमध्ये आणखी २० रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर
नांदेड - शहरात अजून २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ते सर्व चालक आणि मदतनीस पंजाबहून परतलेले आहेत. नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता २६ वर पोहोचली असून आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह असलेले सर्व २४ रुग्ण हे पंजाबहून परतलेले आहेत. त्यामुळे नांदेड आता रेडझोनमध्ये जाण्याची शक्यता आहे.
10:32 May 02
आनंदाची बातमी...बारामती शहर कोरोनामुक्त; बारामती पॅटर्न यशस्वी
बारामती(पुणे)- शहरातील एका कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकाने कोरोना वर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आज बारामती 'कोरोनामुक्त' झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बारामतीमध्ये एकही अॅक्टिव्ह कोरोनाबाधित रुग्ण नाही, यामुळे बारामती पॅटर्न यशस्वी झाल्याचे चित्र आहे. शहरात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर ८ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले होते.
10:31 May 02
अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर, 8 जणांचा मृत्यू
अमरावती - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज सकाळी प्राप्त झालेल्या 24 कोरोनाच्या अहवालापैकी 4 जणांचे अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अमरावतीतील कोरोनाबाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे.
09:19 May 02
राज्यात नवीन १००८ रुग्णांची वाढ
मुंबई - राज्यात आज 106 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 1879 रुग्ण बरे झाले आहेत. आज कोरोनाबाधित 1008 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्णसंख्या 11 हजार 506 झाली आहे, तर एकूण 9148 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.